5 February 2025 8:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PPF Scheme | सरकारी PPF योजना ठरेल फायद्याची, अवघी 100 रुपयांची गुंतवणूक 10 लाख रुपयांचा परतावा देईल SBI Car Loan | एसबीआय बँकेकडून 5 वर्षांसाठी 8 लाखांचे कार लोन घेतल्यानंतर किती EMI हप्ता भरावा लागेल, रक्कम जाणून घ्या TATA Punch EV | धमाका ऑफर, 19,500 रुपयांच्या मासिक EMI वर घरी घेऊन या 'टाटा पंच EV, संधी सोडू नका Rent Agreement | सावधान, भाड्याने घर घेताना ॲग्रीमेंटमधील 'ही' कलमे अवश्य वाचा, अन्यथा मोठं नुकसान होईल IRB Infra Share Price | 54 रुपयाचा शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB Tata Mutual Fund | जबरदस्त फंड, 2000 च्या SIP बचतीवर 2 कोटी रुपये मिळतील, तर एकरकमी 1 लाखावर 3.5 कोटी मिळतील Old Vs New Tax Regime | पगारदारांसाठी कोणती टॅक्स प्रणाली फायदेशीर ठरेल, तुमचा फायदा कुठे सोप्या शब्दांत जाणून घ्या
x

Covid 19 in India | खरंच कोरोना डोकं वर काढतोय की तेच आरोग्य यंत्रणेतील घोटाळे सुरु झाले? | अधिक जाणून घ्या

Covid 19 India

Covid 19 in India | विमा कंपन्यांसाठी भारत ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. भारतातील आरोग्य विमा उद्योग कोविड १९ आपत्तीनंतर वेगाने विस्तारत असून, त्याबरोबर काही इस्पितळं देखील अनेक लॅब्ससोबत संगनमत करून फसव्या रिपोर्टच्या आधारावर उपचारांच्या नावाखाली स्वतःचे खिसे भरत असल्याचे यापूर्वीच अनेक राज्यांमध्ये समोर आलं आहे.

लोकल डॉक्टर्स, लॅब्स आणि इस्पितळांचे संगनमत?
फक्त सन २०१९ मध्ये भारतात विमा उद्योगात सुमारे ४५,००० घोटाळे झाले असं आकडेवारी सांगते. या परिस्थितीमुळे विमा कंपन्या सामान्यत: १० ते १५ टक्के व्यवसाय गमावतात. फसव्या आरोग्य विम्याच्या दाव्यांचे प्रमाण ३५ टक्क्यांपर्यंत असू शकते, ज्यामुळे आरोग्य विम्याची फसवणूक ही भारतातील पहिल्या १० फसवणुकींपैकी एक आहे.

सर्वेक्षणानुसार काय आकडेवारी :
एका सर्वेक्षणानुसार, प्राप्त झालेल्या दहा दाव्यांपैकी एक दावा फसवा असतो, ज्याची तपासणी आवश्यक आहे. भारतातील विमा फसवणूक किंवा भारतातील वैद्यकीय घोटाळे हे एखाद्या फसव्या व्यक्तीला हवे असलेले आरोग्य फायदे मिळविण्यासाठी विमा कंपनीला चुकीची माहिती देऊन केलेले दावे आहेत. यामध्ये इस्पितळं, ठराविक स्थानिक डॉक्टर्स आणि लॅब्स सामील असतात असं देखील निरीक्षण नोंदविण्यात आले होते.

भारतातील विमा फसवणूक :
फसवणूक करणारे अधिक पैसे कमावत आहेत. विमा कंपन्यांची फसवणूक करण्याच्या नवीनतम पद्धती जवळजवळ दररोज वापरल्या जात आहेत. विमा कंपनीला फसवण्याची सर्वात लोकप्रिय पद्धत म्हणजे अत्यवस्थ रुग्णाच्या नावाने विमा पॉलिसी खरेदी करणे. जे डॉक्टर रुग्णांना आधीपासून असलेल्या आजारांसाठी तपासतात, त्यांना लाच दिली जाते किंवा बनावट अहवाल तयार करण्यास सांगितले जाते.

उदाहरणार्थ :
उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीस कोविडचे निदान झाल्यास, डॉक्टर त्या विशिष्ट व्यक्तीसाठी विमा दाव्याच्या देयकाची आवश्यकता मान्य करणारे मूल्यांकन लिहितात. मग, कोविडमुळे पेशंटचे निधन झाले की, इन्शुरन्स क्लेमची रक्कम फसवणूक करणाऱ्याला दिली जाते. ग्रामीण भारतात तंत्रज्ञानाविषयी कमी जागरूकता असल्याने रुग्णांना आरोग्य विमा संरक्षण मिळावे यासाठी अशा प्रकारच्या आरोग्य विमा फसवणुकीचे प्रकार त्या त्या भागात सहजपणे योजले जातात.

कोरोना साथीच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेच्या काळात :
कोरोना साथीच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेच्या काळात शहरातील काही खासगी रुग्णालये बनावट रुग्णांना दाखल करून विमा कंपन्यांना गंडा घालत होती आणि विम्याच्या पैशांवर हक्क सांगण्यासाठी रुग्णालयांच्या बिलांसह त्यांचे दाखले बनवून त्याचा काही भाग ‘अॅक्टिंग’ रुग्णांना देत होती. बंगळुरू शहरात काही खासगी रुग्णालयांमधील कर्मचारी आणि डॉक्टरांच्या संभाषणाच्या ऑडिओ क्लिप्स त्यावेळी समोर आल्या होत्या आणि त्याबाबत अनेक वृत्त झळकली होती. तसेच प्रकार देशभरातील अनेक शहरांमध्ये घडल्याचं उघड झालं होतं. त्यामुळे सध्या सुद्धा तीच शंका समोर येत आहे.

भीती निर्माण करण्यासाठी :
त्यामुळे सामान्य लोकांनी अशा लोकांच्या मागे स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची फरफट न करता स्वतःवर आत्मविश्वास ठेवत आरोग्य सुधृढ ठेवावे. कारण भीती निर्माण करण्यासाठी काही माध्यमांना देखील हाताशी धरलं जाऊ शकतं अशी देखील शंका उपस्थित होऊ लागली आहे. कारण भीती पसरते तेव्हा लोकं लहान सहान गोष्टींमध्ये स्थानिक डॉक्टर्स, नंतर लॅब्स आणि नंतर इस्पितळाच्या कचाट्यात अडकतात. तसेच भीती वाढल्याने आरोग्य विम्याचाही खप वाढू लागतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Covid 19 India check details on insurance history 09 June 2022.

हॅशटॅग्स

#Covid 19(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x