23 November 2024 3:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप
x

राजकीय विरोधातून आयकर विभागाची धाड, विरोधकांना जशास तसं उत्तर दिलं जाईल | अभिजित पाटील आक्रमक

DVP Group Abhijeet Patil

DVP Group Abhijeet Patil | धाराशिव साखर कारखान्याचे आणि डीव्हीपी ग्रुपचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या कार्यालयासह कारखान्यातील आयकर विभागाची झाडाझडती तीन दिवसानंतर संपली. अभिजित पाटील यांच्या पंढरपूर येथील घर, कारखाना आणि उस्मानाबाद येथील कारखान्यावर ३ दिवसांपूर्वी आयकर विभागाने धाडी टाकल्या. त्यानंतर आता अभिजित पाटील यांनी विरोधकांना इशारा दिलाय.

अभिजित पाटील काय म्हणाले :
आयकर विभागाची छापेमारी संपल्यानंतर आज अभिजित पाटील यांनी मौन सोडलं. “आयकर विभागाला चुकीची माहिती दिली गेली. कारखाने कुठून एका मागून एक आले? इतका पैसा कुठून आला?, असं विचारलं गेलं. त्यावर आम्ही सांगितलं की, काही कारखाने हे कर्ज घेऊन भाडेतत्वावर घेतले आहेत. त्यामुळे त्याला भांडवलाची गरज नाही. जे काही होते ते सगळे रेकॉर्डवर होते. धाडीत कुठेही अवैध पैसा, सोनं किंवा इतर मालमत्ता सापडली नाही.

मागणी प्रमाणे कागदपत्रांची पूर्तता केली :
त्यांना दिलेल्या माहितीमुळे आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांचं समाधान झालं. त्यांनी मागणी केल्याप्रमाणे कागदपत्रांची पूर्तता केली व काही कागदासाठी १५ दिवसांचा अवधी दिला आहे. त्यात ती दिली जातील”, अशी माहिती अभिजित पाटील यांनी आयटीच्या छापेमारीनंतर दिली.

मी गेल्या दोन महिन्यांपूर्वी पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी कारखान्याची निवडणूक लढावली. त्यात मला यश आलं. त्यामुळे माझा वारू रोखला पाहिजे, यासाठी विरोधकांनी षडयंत्र रचले”, असा आरोप अभिजित पाटील यांनी केला आहे.

मला विठ्ठल पावला :
विठ्ठल कारखाना माझ्याकडे शेतकरी सभासदांनी दिला. त्यानंतर आयकर विभागाच्या कारवाईत काही न सापडल्यानं मी आता उजळ माथ्यानं फिरू शकतो. त्यामुळे माझ्यावर ‘विठ्ठल’ या कारवाईने कोपला नाही, तर विठ्ठल पुन्हा एकदा पावला. मी जे काही केलं. कमावलं ते प्रामाणिकपणे केलं”, अशा शब्दात अभिजित पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

राजकीय विरोधातून हे सगळं केलं गेलं. विरोधकांना जशास तसं उत्तर दिलं जाईल. विरोधकांचं नाव सगळ्यांना माहित आहे, ते योग्य वेळी जाहीर करू. जे झालं आहे, ते चांगलं झालं. येणाऱ्या काळात मी चौपट ताकदीनं काम करेल आणि या भागातील लोकांना रोजगार, उसाचा प्रश्न मार्गी लावेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: DVP Group Abhijeet Patil reaction after income tax raid check details 29 August 2022.

हॅशटॅग्स

#DVP Group Abhijeet Patil(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x