5 February 2025 1:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | श्रीमंत करणार हा स्वस्त शेअर, पाच दिवसांत 65 टक्के परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 51259 RVNL Share Price | रेल्वे शेअर्स तेजीत, RVNL शेअर फोकसमध्ये आला, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Post Office Scheme | महिना खर्च भागेल, दरमहा 9,250 रुपये देईल ही पोस्ट ऑफिस योजना, नक्की फायदा घ्या EPFO Passbook | खाजगी पगारदरांनो इकडे लक्ष द्या, EPF रक्कमेवर मिळणार अधिक व्याज, ईपीएफओ अपडेट जाणून घ्या IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, पटापट प्राईस बँड सह इतर डिटेल्स जाणून घ्या MTNL Share Price | सरकारी कंपनीचा स्वस्त शेअर तुफान तेजीत, आज 19 टक्क्यांचा अप्पर सर्किट, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: MTNL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग सह टार्गेट प्राईस जाहीर - NSE: TATAPOWER
x

शिंदे दुसऱ्या राज्यात ऑफलाईन लपून, ऑनलाईन सरकार पाडण्यात व्यस्त | पण म्हणाले त्यांच्या पायाखालची वाळू सरकली

Eknath Shinde

Eknath Shinde | एकनाथ शिंदे गटाच्या 12 आमदारांना निलंबित करण्याची शिफारस शिवसेनेने विधानसभेच्या उपसभापतींकडे केली आहे. तसेच आणखी पाच आमदारांना निलंबित करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. शिवसेनेच्या या हालचालीवर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कुणाला घाबरवता? आम्ही घाबरणारे नाहीत, असं सांगतानाच त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, म्हणूनच ते ती कारवाई करायला निघाले आहेत, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

विधानसभा नियम 179 :
विधानसभा नियम 179 अन्वये नरहरी झिरवळ यांना हटविण्यासंदर्भात यापूर्वीच पत्र दिले असल्याने आमदारांच्या अपात्रतेचे अधिकार नाहीत. 2016च्या सर्वोच्च न्यायालयाचा दिला पत्रात दाखला घटनेच्या दहाव्या परिशिष्टाप्रमाणे अध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव दाखल असेल तर त्यावर निर्णय होईस्तोवर त्यांना आमदारांच्या अपात्रतेचे अधिकार राहत नाहीत.

अविश्वास प्रस्ताव भाजपने दोन दिवांपूर्वीच दाखल केला :
नरहरी यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव भाजपने दोन दिवांपूर्वीच दाखल केला आहे. त्यामुळे कोणत्याही आमदारांचे निलंबन ते करू शकत नाही. या तारखेनंतर कितीही प्रस्ताव दाखल झाले तरी आधी अविश्वास प्रस्ताव वर निर्णय घ्यावा लागेल. मग आमदारांचे निलंबन, ही एक मोठी राजकीय खेळी आहे जी भाजपने खेळली आहे.

ऑनलाईन भूमिका आणि ऑनलाईन सरकार पाडणे :
मागील २ दिवसापासून एकनाथ शिंदे केवळ ऑनलाईन विषय हाताळत आहेत. त्यांचं ट्विटर हॅण्डल सुद्धा विरोधक हॅण्डल करत आहेत अशी चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे एक एक आमदाराचे भावनिक ड्राम्याचे व्हिडिओ रेकॉर्ड करून ते माध्यमांकडे पोहोचवले जात आहेत. त्यामुळे हे अजून किती दिवस चालणार हे पाहावं लागणार आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Eknath Shinde allegations on Shivsena over disqualifying MLAs check details 24 June 2022.

हॅशटॅग्स

#Eknath Shinde(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x