5 February 2025 1:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | श्रीमंत करणार हा स्वस्त शेअर, पाच दिवसांत 65 टक्के परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 51259 RVNL Share Price | रेल्वे शेअर्स तेजीत, RVNL शेअर फोकसमध्ये आला, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Post Office Scheme | महिना खर्च भागेल, दरमहा 9,250 रुपये देईल ही पोस्ट ऑफिस योजना, नक्की फायदा घ्या EPFO Passbook | खाजगी पगारदरांनो इकडे लक्ष द्या, EPF रक्कमेवर मिळणार अधिक व्याज, ईपीएफओ अपडेट जाणून घ्या IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, पटापट प्राईस बँड सह इतर डिटेल्स जाणून घ्या MTNL Share Price | सरकारी कंपनीचा स्वस्त शेअर तुफान तेजीत, आज 19 टक्क्यांचा अप्पर सर्किट, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: MTNL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग सह टार्गेट प्राईस जाहीर - NSE: TATAPOWER
x

Eknath Shinde Camp | राजकीय मित्र पक्षांना संपवणं हाच भाजपचा इतिहास, प्रथम ठाण्यातून शिंदेंचं अस्तित्व संपविण्याची भाजपाची तयारी?

Highlights:

  • Eknath Shinde Camp
  • भाजपकडून कल्याण बरोबर पालघर-ठाणे लोकसभा मतदारसंघावरही दावा
  • काही महिन्यांपासून ठाणे जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये संघर्ष
  • ठाण्याचे भाजपचे आमदार संजय केळकर काय म्हणाले?
Eknath Shinde Camp

Eknath Shinde Camp | सध्या भाजप-शिवसेनेतील नेते एकमेकांना उत्तर प्रतिउत्तर देताना दिसत आहेत. राज्यातील जागावाटपाचा बाजूला पडून ठाण्यातीलच वाद शिगेला पोहोचला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अस्तित्व असलेल्या ठाणे जिल्ह्यातच भाजप-शिवसेना युतीतील संघर्ष आता चव्हाट्यावर आला आहे.

भाजपकडून कल्याण बरोबर पालघर-ठाणे लोकसभा मतदारसंघावरही दावा

ठाणे स्थानिक पातळीवरील हा संघर्ष इतका वाढला असून, कल्याणचे खासदार आणि मुख्यमंत्री शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी थेट राजीनामा देण्याचीच तयारी दर्शवली. दुसरीकडे भाजपकडून कल्याण बरोबर पालघर-ठाणे लोकसभा मतदारसंघावरही दावा करण्यात आला असून, भाजपचे ठाण्यातील आमदार संजय केळकर यांनी थेट ऑन कॅमेरा तसं विधान केलं आहे. त्यामुळे राजकीय मित्र पक्षांना संपवणं हाच भाजपचा इतिहास असताना आता प्रथम ठाण्यातून शिंदेंचं अस्तित्व संपविण्याची भाजपाची तयारी सुरु झाली आहे असं म्हटलं जातंय.

काही महिन्यांपासून ठाणे जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये संघर्ष

गेल्या काही महिन्यांपासून ठाणे जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये सुप्त संघर्ष सुरू आहे. मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मुद्द्यावरून हा वाद पहिल्यांदाच बाहेर आला. या प्रकरणावरून भाजपने शिवसेनेला सहकार्य न करण्याचा ठराव केला आणि राजकीय संघर्ष आणखी वाढला.

खासदार श्रीकांत शिंदे आणि भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण आणि ठाण्यातील भाजपचे आमदार, नेते, पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेविरोधात थेट भूमिका घेताना दिसत आहे. आणि त्यामुळेच शिंदे पिता-पुत्रांची कोंडी करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू असल्याचे सांगितलं जात आहे.

ठाण्याचे भाजपचे आमदार संजय केळकर काय म्हणाले?

भाजपचे आमदार संजय केळकर यांनी भाजपच्या प्रमुख नेत्यांसमोरच एक विधान केले. “2014 च्या निवडणुकीत या जिल्ह्यातील अनेक लोक मोदी ट्रेनमध्येच बसून गेले. ते आपल्या पक्षाचे असो वा मित्रपक्षाचे असो. मोदींच्या नावाखाली ते निवडून आले आणि आता अनेक प्रकारचे दावे केले जातात. मला आश्चर्य वाटतं, कीव करावी वाटते. भाजपशिवाय या जिल्ह्यातून कुणीही निवडून जाऊ शकणार नाही, अशा प्रकारची ताकद भाजपमध्ये आहे. एवढे मोठे काम केले आहे. सेवेचे व्रत घेऊन काम केले आहे”, असे ते म्हणाले.

संपूर्ण ठाणे जिल्हा भारतीय जनता पक्षाचा होता. कल्याण असेल पालघर असेल आणि असेल, भारतीय जनता पार्टीचेच जिल्हे होते. कल्याण लोकसभा तर आहेच ठाणे देखील भारतीय जनता पक्षाचा आहे. असेल तर हात वर करा, कल्याण लोकसभा ही भारतीय जनता पक्षाचे आहे की नाही? रामभाऊ म्हाळगी, राम भाऊ कापसे, जगन्नाथ पाटील हे भारतीय जनता पार्टीचे आहेत. या नेत्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे, असंही ते म्हणाले.

News Title : Eknath Shinde Camp Thane Politics check details on 12 June 2023.

हॅशटॅग्स

#Eknath Shinde Camp(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x