22 April 2025 3:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vikas Lifecare Share Price | शेअर प्राईस 2 रुपये 66 पैसे, पेनी स्टॉक जबरदस्त तेजीत, टार्गेट नोट करा - NSE: VIKASLIFE Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, चॉईस ब्रोकिंग फर्मने दिली अपडेट - NSE: SUZLON Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: YESBANK NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN Rattan Power Share Price | एक दिवसात 12 टक्क्यांनी वाढला पेनी स्टॉक, स्टॉक खरेदीला गर्दी, फायदा घ्या - NSE: RTNPOWER
x

Eknath Shinde | शिंदे गटाला 'दिलासा' मिळावा म्हणून थेट सुप्रीम कोर्टात जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे?

Eknath Shinde

Eknath Shinde | शिवसेनेचा गट हा आसाममध्ये गेला आहे. सत्ता परिवर्तनाचा हा प्रयोग आहे. पण शिवेसेनेला मदत करणारे सरकारमधील सर्व पक्ष हे त्यांच्या बाजूने खंबीरपणे उभे आहेत. त्यांचा शिवसेनेला पाठिंबा आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून नवीन आघाडी तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय. पण आजच्या आघाडीला आमचा पाठिंबा आहे”, असं शरद पवार म्हणाले.

राज्यपालांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज :
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज होताच ते भाजपसाठी कामाला लागल्याचं चित्र आहे. या सगळ्या घडामोडींवर शरद पवार यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली.

शिंदे गट सुप्रिम कोर्टात जाण्याच्या तयारीत :
शिवसेनेने बंडखोर आमदारांच्याविरोधात कायदेशीर लढाई लढण्याचे ठरवले असतानाच एकनाथ शिंदे यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. गटनेते पदावरुन हटवने आणि झिरवाळ यांच्या निलंबनाच्या नोटीवरुन शिंदे गट सुप्रिम कोर्टात जाण्याच्या तयारीत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे हे मुंबई आणि दिल्लीतील वरिष्ठ वकिलांच्या सतत संपर्कात आहेत. शिंदे हे प्रत्यक्षात उपसभापतींच्या नोटीसला आव्हान देण्याच्या तयारीत आहेत.

बंडखोर आमदारांची संख्या जास्त :
एकनाथ शिंदे गटाने महत्त्वाचा आक्षेप हा घेतला आहे की आपल्याकडे दोन तृतीयांश आमदारांचे बहुमत असतानाही उद्धव ठाकरे शिंदेंच्या जागी दुसऱ्या कोणत्या व्यक्तींला गटनेते कसे बसवू शकतात?. बंडखोर आमदारांची संख्या जास्त आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याच गटाला नोटीस दिली गेली पाहिजे असे मत शिंदे गटातील आमदारांचे आहे. अपात्रता ही उद्धव ठाकरेंच्या गटातील आमदारांची व्हायला हवी असे मतही बंडखोरांनी व्यक्त केले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Eknath Shinde group may move to supreme count check details 26 June 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Eknath Shinde(97)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या