23 February 2025 9:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

भाजपच्या सांगण्यावरून शिंदेंचा समर्थक आमदारांनाविरुद्धही गेम प्लॅन | सेनेतच असल्याचं सांगून भीषण प्लॅन रचला आहे

Eknath Shinde

Eknath Shinde | एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या बंडात सामिल असलेले आमदारा आसाममधील गुवाहाटीमध्ये आहेत. मागील पाच दिवसांपासून राज्यात मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या आमदारांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. सुरुवातीला 12 आमदार शिंदे यांच्यासोबत होते. त्यानंतर आता ही संख्या 38 हून अधिक झाली आहे. शिवसेनेत झालेल्या बंडाळीमुळे राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. शिवसेनेकडूनही डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत दोन तृतीयांशपेक्षा अधिक आमदार असल्याचा दावा केला आहे. हा गट भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदारांसोबत चर्चा करताना एक महाशक्तिचे पाठबळ असल्याचे सूचक वक्तव्य केले होते. मात्र एकनाथ शिंदेचा हे जरी आम्ही मूळ शिवसेना आहोत असो वारंवार सांगत असले तरी त्यामागील मूळ हेतू अत्यंत संतापजनक आहे. त्याला कारण कायदा आहे असं म्हटलं जातं. याचा त्यांनी आधीच फडणवीसांसोबत अभ्यास केला होता असं समजतंय. उपाध्यक्षांविरोधात आधीच अविश्वास ठराव देणे हा त्याच रणनीतीपैकी एक पाहिलं पाऊल होतं, ज्यामध्ये बंडानंतरच्या हालचालींनाच आधीच विचार करण्यात आला होता.

भाजपच्या सांगण्यावर शिंदेंनी बंडखोर आमदारांना सुद्धा अंधारात ठेवलंय :
बंडखोर आमदार आपला स्वतंत्र गट स्थापन करणार, भाजपसोबत जाणार की खरी शिवसेना आपणच असल्याचा दावा करणार, याबाबत अनेक प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. पहाटे पाच वाजेपर्यंत एकनाथ शिंदे यांनी चर्चेसाठी एक बैठक घेतली. यानंतर प्रत्येक बंडखोर आमदाराच्या खोलीत जाऊन शिंदे यांनी त्यांची भेट घेतली. त्यांना आपण शिवसेनेत आणि मूळ शिवसेना आपणच असल्याचं सांगत आहेत. आमदारांना वेगवेगळे भेटण्यामागे त्यांना एकमेकांबद्दल काही समजू नये याची काळजी घेतली जातेय. तसेच एका एक सांगायचं आणि दुसऱ्याला दुसरं हा त्यामागचा हेत असल्याचं कळतंय. तसेच हे आमदार आपण सेनेत असल्याचं आणि राहणार आहोत असा समज करून बसले आहेत. मात्र शिदें भाजपच्या सांगण्यावर एक भीषण योजना आखली आहे आणि त्यांनी यापासून त्यांच्या समर्थक आमदारांना सुद्धा भाजपच्या सांगण्यावर अंधारात ठेवलं आहे.

सेनेतील वरिष्ठ आमदारांची सुद्धा फसवणूक :
एकनाथ शिंदे यांच्यासह भरत गोगावले, दादा भुसे, गुलाबराव पाटील यांनीही सर्व आमदारांची एक एक करून भेटली घेतली. यावेळी सर्व आमदारांना आपल्या कुटुंबीयांसोबत बोलायला सांगितलं. तसंच सांगण्यात आलं की, ‘कार्यकर्त्यांना सांगा आजही आम्ही शिवसेनेतच आहोत. बाळासाहेबांचे विचार सोडलेले नाहीत’. यासोबतच ‘विधानसभा उपसभापतींना तो अधिकार नसल्याने आपल्यावर अपात्र कारवाई करता येणार नाही, असं आश्वासन सर्व आमदारांना देण्यात आलं.

कायद्यामुळे शिंदेंनी भाजपच्या सांगण्यावर हे केल्याचं म्हटलं जातंय :
कायद्यामुळे प्रचंड अडचणी आहे. एक-दोन गोष्टी त्यांच्या बाजूने आहेत तर काही गोष्टी महाविकास आघाडीच्या म्हणजे मूळ शिवसेनेच्या बाजूने आहेत. त्यामुळे न्यायालयातील वाद अडथळे वाढवेल. बंडखोर आमदार त्यांच्या मतदारसंघात धनुष्यबाण चिन्हाने ओळखले जातात. त्यामुळे सर्व आमदारांना आपण मूळ शिवसेना आहोत आणि राहणार आहोत असं वारंवार सांगत आहेत. मात्र भाजपनेच तसं सांगितलं असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. तास सांगून आमदारांना थांबवायचं आणि सत्ता त्यांच्या बळावर सत्ता स्थापून नंतर संपूर्ण पक्ष (शिवसेना) भाजपत विलीन करायचा अशी योजना आहे. त्याची संपूर्ण जवाबदारी आपल्यावर टाकायला एकनाथ शिंदे तयार झाले आहेत. अशा प्रकारे शिवसेना संपविण्याचा पूर्ण प्लॅन भाजपच्या मदतीने शिंदेंनी आखल्याचे सूत्रांच्या माहितीतून समोर आले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Eknath Shinde plan to get closer to BJP party check details 25 June 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Eknath Shinde(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x