18 November 2024 5:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Eknath Shinde | भाजपात न जाता सेनेचा गट स्थापन करण्यामागे फडणवीस? | शिंदेंच्या अडचणी आणि फडणवीसांचा प्लॅन वाचा

Eknath Shinde

Eknath Shinde | अखेर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. ३३ आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांनी मोठ्या बंदोबस्तामध्ये मध्यरात्रीच सुरत सोडले आहे. आपण आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचं हिंदुत्व सोडलं नाही. हेच हिंदुत्व घेऊन राजकारण करणार, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी नवीन इनिंग सुरू करण्याचे संकेत दिले आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत पडद्याआड असलेला भाजप आता समोर आला आहे.

आमदारांना एअरलिफ्ट केले – गुवाहाटीला रवाना :
एकनाथ शिंदे आपल्यासह ३३ आमदारांना घेऊन सुरतमध्ये दाखल झाले होते. पण सुरत हे मुंबईपासून जवळ असल्यामुळे मध्यरात्रीच गुवाहाटीला जाण्याचा प्लॅन रचला त्यानुसार मध्यरात्रीच सुरतमध्ये असलेल्या बंडखोर आमदारांना एअरलिफ्ट केल्याचं समोर आलं आहे. काही तासांपूर्वीच सुरतच्या विमानतळावर तीन स्पाइसजेटच्या विमानाने गुवाहाटीला रवाना झाले आहे. आमदारांपर्यंत कोणी पोहोचू नये यासाठी त्यांना सुरतहून आसामच्या गुवाहाटीमध्ये एअरलिफ्टकरण्यात येणार असल्याची माहिती समोर आली होती.  मात्र या प्रकरणात एक महत्वाची माहिती समोर येते आहे आणि ती थेट फडणवीसांशी संबंधित आहे. एकूण घटनेच्या क्रमापासून पाहिल्यास यामागे फडणवीस असल्याशिवाय ते सर्व अशक्य असल्याचं म्हटलं जातंय.

आम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर नाराजीची स्क्रिप्टही भाजपाची अशी शंका :
प्रसार माध्यमांनी प्रश्न विचारल्यावर कोणत्या प्रतिक्रिया द्यायच्या आणि शिवसेना हा ‘शब्द प्रयोग’ स्वतःकडे ठेवून नाराजीचा रोख काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे ठेवायचा अशा सूचना फडणवीसांनी दिल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळेच आमदार प्रतिक्रिया देताना आमची राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर नाराजी असून नेतृत्वावर नारजी नाही. आता भाजपसोबत जायचं की आणखी काही याचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील असे आमदार सांगत आहेत. त्यामुळे मुख्य गट (शिवसेना) स्वतःच्या ताब्यात ठेवण्याची संपूर्ण व्यूहरचना फडणवीसांनी आखल्याचे राजकीय विश्लेषक सांगत आहेत.

ईडी रडारवरील नेत्यांवरील प्रश्नांना बगल देता येईल :
या आमदारांच्या यादीत ईडीच्या रडारवर असलेले आमदार आणि संजय राठोड यांच्यासारखे विवादित आमदार देखील सामील आहेत. भाजपच्या नेत्यांनी याच आमदारांवरवरून मोठं राजकारण केल्याचा देशाने पाहिला आहे. त्यामुळे भविष्यात प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी शिंदे यांच्यावर ढकलण्यात येईल. मात्र या विषयात पुढे काहीच होणार नाही हे देखील तितकंच सत्य असेल. त्याचंच कारण म्हणून कालपासून किरीट सोमय्या अत्यंत शांत झाले आहेत. कारण त्यांचं राजकीय टार्गेट पूर्ण झाले आहे.

महानगरपालिकेतून शिवसेनेचा आर्थिक कणा मोडून काढणे :
राज्यातील प्रमुख महानगरपालिकेतून शिवसेनेला हद्दपार करणे आणि शिवसेनेचा पूर्ण आर्थिक कणा मोडून काढणे हा त्यामागील फडणवीसांचा मुख्य उद्देश आहे. त्यासाठी ठाणे आणि कोकण पट्ट्या ला विशेष स्थान देण्यात आला आहे. त्यामुळेच येथील आमदारांची संख्या मोठी पाहायला मिळते. याच महानगरपालिकातील आगामी निवडणुकीत प्रति शिवसेना उभी करून शिवसेनेच्या उमेदवारांना जिंकण्या पासून रोखता येईल आणि त्यासाठी एकनाथ शिंदे यांना खास रसद पुरवली जाईल.

मुंबई महानगरपालिका निवडणूक :
मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेची सत्ता गेल्यास संपूर्ण राज्यातील शिवसेना पुरती कोलमडून पडेल याची फडणवीसांना पूर्ण जाणीव आहे. त्यासाठी मुंबईतील आमदारही गळाला लावण्यात आले आहेत. परिणामी शिंदे गटाचे नगरसेवक सुद्धा फडणवीसांच्या पायावर लोटांगण घालतील. मुंबई महानगरपालिकेतील गुजराती-मारवाडी मत तर शंभर टक्के भाजप कडे असतील, परंतु उत्तर भारतीयांची मते लक्षात घेऊन शिवसेनेतील प्रकाश सुर्वे यांच्या सारखे आमदार गळाला लावण्यात आले आहेत. कारण भोजपुरी कलाकारांची या आमदारांसोबत आणि एकनाथ शिंदे सोबत चांगली मैत्री आहे.

कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना शिंदे यांच्यामार्फत आमिष – स्वप्नं दाखवणं :
सध्या शिवसेनेकडे असलेल्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदे यांच्यामार्फत आमिष दाखवून त्यांच्याच गटात सामील करून घेणे आणि भाजपाला त्यापासून दूर ठेवून स्वतःचा राजकीय हेतू साधने हा फडणवीसांचा प्लान आहे. आहे त्यामुळे हळूहळू संपूर्ण शिवसेनाच या गटाच्या मार्फत फडणवीस यांच्या ताब्यात येईल याची संपूर्ण काळजी घेतली जात आहे.

शिंदे राज्याचा चेहरा नाहीत आणि लोकांना हवस व्यक्तिमत्व नाहीत :
कितीही नाकारलं तरी प्रति शिवसेना म्हणून काम करताना आणि यश संपादन करण्यासाठी एक नेतृत्व लागते. तसेच संबंधित नेतृत्व हे सामान्य लोकांच्या आवडीचे आणि भावनिक साद घालणारे असावे लागते. एकनाथ शिंदे या कोणत्याच गणितात बसत नाहीत. त्यामुळे त्यांना बाळासाहेबांचं नाव घेण्यापलीकडे दुसरा पर्याय नाही. याची संपूर्ण जाणीव एकनाथ शिंदे यांना आहे, अन्यथा त्यांची राजकीय व्यवस्था सुद्धा नारायण राणे यांच्या पक्षासारखीच होईल. त्यामुळेच त्यांच्याकडेही फडणवीस सांगतील तसं करण्याशिवाय कोणताच पर्याय नाही.

धनुष्य बाण गेल्यास शिंदेही पराभूत होतील :
एकनाथ शिंदे यांची ओळख ही गटातटाचे राजकारण करणारा नेता अशीच आहे. हे राज्यातील एखादा दिग्गज नेता किंवा सामान्य लोकांना हवा असणारा चेहरा अशी त्यांची मतदारांपुढे ओळख अजिबात नाही. तसे पारंपारिकरित्या ज्या चिन्हावर आपण निवडून आलो, त्याला वगळून इतर चिन्हांवर निवडून येणे कठीण असते हे एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांनाही ठावूक आहे आहे. लोकांमध्ये या आमदारांची निवडणुकीतील ओळख धनुष्यबाण अशीच आहे. म्हणजे अगदी कमळाच्या चिन्हावर जरी उद्या हे उभे राहिले तरी अनेकजण पराभूत होतील. कारण कितीही नाकारलं तरी त्याची थेट ओळख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे जाते. त्यामुळे बाळासाहेबांच्या नावाला आणि धनुष्यबानाला चिटकून राहणं हा देखील फडणवीसांचा प्लान आहे. अन्यथा या सर्वांना भाजपमध्ये अधिकृत प्रवेश देणे फडणवीस यांना सहज शक्य होतं.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Eknath Shinde political plan against Shivsena check details here 22 June 2022.

हॅशटॅग्स

#Eknath Shinde(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x