23 February 2025 8:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

ठाण्याचा रिक्षाला आज करोडपती झालाय | त्यांच्या गावात गावकऱ्यांसाठी सोयी सुविधा नाहीत, पण स्वतःसाठी 2 हेलिपॅड

Eknath Shinde

Eknath Shinde | एकनाथ शिंदे आणि आमदारांनी केलेल्या बंडानंतर राज्यात नवनव्या नाट्यमय घडामोडी घडत आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेनेचे अधिकाधिक आमदार गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू असतानाच शिवसेनेनं तब्बल १६ बंडखोर आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्यासाठी पाऊल उचललं आहे. या आमदारांना नोटीस बजावण्याचा निर्णय विधानसभा उपाध्यक्षांनी घेतला असून, बंडखोर आमदारांच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे.

एकनाथ शिंदे कशाची वाटतेय भीती :
सध्या शिवसेना बंडखोर आमदारांचा मुक्काम सध्या गुवाहाटीतील हॉटेलमध्ये आहे. तेथून बंडखोर आमदार पत्र आणि व्हिडीओतून भूमिका मांडण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्याकडून दोन तृतीयांशपेक्षा जास्त आमदार आपल्याकडे असल्याचा दावा केला जात. मात्र, अपेक्षित आमदार सोबत असूनही शिंदे यांच्याकडून कोणतंही पाऊल का उचललं जात नाही, अशी चर्चा होत आहे.

एकनाथ शिंदे यांच्याकडून ४० पेक्षा जास्त आमदार असल्याचा दावा केला जात असला, तरी मुंबईत परतल्यानंतर त्यातील आमदार फुटले, तर काय? अशी भीतीही त्यांना असल्याचं बोललं जात आहे. कारण, शिवसेनेकडूनही हॉटेलमध्ये असलेले आमदार संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे.

शिंदें भाजपच्या गळाला लागल्याने संपत्तीची चर्चा :
मात्र सध्या चांगलेच चर्चेत असलेले एकनाथ शिंदे यांच्याकडे किती संपत्ती आहे, याबाबत तुम्हाला माहिती आहे का? 2019 साली दिलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडील संपत्तीची माहिती दिली होती. यामध्ये त्यांनी घर, गाडी, मालमत्ता, सोनं, गुंतवणूक आणि इतर माहिती जाहीर केली होती.

एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर 28 लाख रुपयांची शेतजमीन आहे. हे जमीनमूल्य 2019 च्या बाजारभावाप्रमाणे लावण्यात आलेलं आहे. यात आता काही प्रमाणात वाढ झालेली असू शकते. महाबळेश्वरमध्ये एकनाथ शिंदे यांची 12 एकर जमीन आहे. याशिवाय चिखलगाव, ठाण्यात पत्नीच्या नावे 1.26 हेक्टर जमीन असल्याचीही माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्रातून दिलेली.

ठाण्यात लँडमार्क को ऑप. हौसिंग सोसायटीमध्ये एक आलिशान फ्लॅटही आहे. या फ्लॅटचं क्षेत्रफळ 2370 स्केअर फिट आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या पत्नीच्या नावेही असाच एक फ्लॅट याच सोसायटीमध्ये आहे. तर शिवशक्ती भवन इथेही एक फ्लॅट पत्नीच्या नावे घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली होती. घरं आणि गाळ्याांचा आताचं मूल्य 9 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचं सांगितलं जात आहे. 2019 साली सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार एकनाथ शिंदे यांच्यावर 3 कोटी 74 लाख रुपयांचं कर्ज होतं. आता गेल्या अडीच वर्षातील एकनाथ शिंदे यांच्या संपत्तीत नेमकी किती वाढ झाली, हे कळू शकलेलं नाही.

गावात नियमित रोजगाराच्या संधी नाहीत :
‘इंडियन एक्स्प्रेस’नं दिलेल्या बातमीनुसार डेरे गावात फक्त 30 घरं आहेत. महाबळेश्वपासून सुमारे 70 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. अभयारण्य आणि कोयना नदी यांच्यामध्ये हे गाव वसलंय. या गावातील बहुतेक नागरिक हे प्रवासी मजूर असल्यानं अनेक घरं ही बंद आहेत. गावात नियमित रोजगाराच्या संधी नसल्यानं अनेकांना मुंबई किंवा पुण्यात जावून काम करावं लागतं.

गावात स्वतःसाठी दोन हेलिपॅड बनवले आहेत :
शिंदेंच्या या गावात शाळा, हॉस्पिटल या आवश्यक सोयी नाहीत. गावकऱ्यांना शिक्षणासाठी रस्त्यानं 50 किलोमीटर किंवा नावेनं 10 किलोमीटर प्रवास करावा लागतो. असं असलं तरी शिंदे यांनी या गावात दोन हेलिपॅड बनवले आहेत. कारण, शिंदे हे नेहमी हेलिकॉप्टरनंच आपल्या गावी येतात. यामधील एक हेलिपॅड शिंदे यांनी यापूर्वीच बनवले असून ते कोयना नदीच्या किनारी आहे, तर दुसरे त्यांच्या गावातील घरापासून काही मीटर दूर असलेल्या डोंगरावर बनवण्यात आले आहे.

आज दुपारी एक वाजता शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्याकारिणीची महत्त्वाची बैठक शिवसेना भवनात आयोजित करण्यातल आली आहे. या बैठकीत शिवसेनेच्या घटनेत महत्त्वाचे बदल केले जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांना नेतेपदावरून हकालपट्टी करण्याचा निर्णय या बैठकीत होऊ शकतो. आम्हीच शिवसेना असे म्हणून पुढचा प्रस्ताव देऊ पाहणाऱ्या एकनाथ शिंदेंचे शिवसेना नेते म्हणून अनेक अधिकार कापले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जवळपास 51पेक्षा जास्त आमदारांचं पाठबळ घेऊन भाजपसोबत चूल मांडण्याच्या तयारीत असलेल्या एकनाथ शिंदेंसाठी पुढची लढाई म्हणावी तेवढी सोपी ठरणार नाही.

शिंदे गटातर्फे आज पत्रकार परिषद :
दरम्यान, गुवाहटीतील एकनाथ शिंदे गटातर्फे आज पत्रकार परिषद घेतली जाण्याची शक्यता आहे. कालपासून येथील आमदारांच्या बैठकांवर बैठका सुरु आहेत. नेमकी कोणती रणनिती घेऊन महाराष्ट्रात पाऊल ठेवायचं, यावर विचारमंथन आणि कायद्यांचा अभ्यास सुरु आहे. आज या प्रक्रियेचा पुढचा टप्पा गाठला जाऊन एकनाथ शिंदे गट राज्यपालांकडे दोन तृतीयांश आमदारांच्या पाठिंब्यानं पक्षावर दावा ठोकण्यासंदर्भात पत्र देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Eknath Shinde Royal Life check details 25 June 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Eknath Shinde(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x