18 November 2024 5:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Eknath Shinde | फडणवीसांसोबत उपमुख्यमंत्री बनण्यापेक्षा तुला मुख्यमंत्री बनवतो | उद्धव ठाकरेंची ऑफर

Eknath Shinde

Eknath Shinde | एकनाथ शिंदे 21 आमदारांना घेऊन सुरतमधील हॉटेलमध्ये थांबले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे एकच शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. अखेरीस एकनाथ शिंदे यांची समजूत काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकर हे सुरतमध्ये पोहोचले आहे. मिलिंद नार्वेकर यांनी हॉटेलवर जाऊन शिंदे यांची भेट घेतली. पण एकनाथ शिंदे यांची अट आहे की ते थेट मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे.

उद्धव ठाकरेंनी यावर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली :
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यासमोर काही अटी ठेवल्या होत्या. मात्र आता उद्धव ठाकरेंनी यावर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. ‘एकनाथ शिंदे यांनी फडणवीस यांच्यासोबत जाऊन उपमुख्यमंत्री पद घेण्यापेक्षा मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतो. त्यांनी शिवसेनेत परत येऊन मुख्यमंत्री बनावं, अशी ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली आहे.

शिंदेंचा भाजपासोबत जाण्याचा हट्ट :
शिवसेना आणि भाजपची आघाडी व्हावी असं एकनाथ शिंदे यांचं सुरुवातीपासूनचं मत होतं. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाण्याचा निर्णय घेतला. शिवसेना आणि भाजपची युती ही स्वाभाविक युती आहे, असं त्यांचं मत होतं. मात्र, एका मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेने युती तोडली. त्यामुळे शिंदे यांच्यासह अनेकजण नाराज होते. त्यामुळेच त्यांनी बंड पुकारल्याचं सांगितलं जातंय.

आजवरचे हे सर्वात मोठं बंड :
शिवसेनेतील आजवरचे हे सर्वात मोठं बंड असणार आहे. एकाच वेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत 35 आमदार असल्याची चर्चा आहे. या आमदारांची भूमिकाही आता समोर आली असून त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरचं सरकार अमान्य असल्याचं कळत आहे. भाजपबरोबर गेल्यास आम्ही अजूनही शिवसेनेसोबत असल्याची भूमिका बंडखोर आमदारांनी घेतल्याची माहिती मिळत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Eknath Shinde sent proposal to Uddhav Thackeray check details 21 June 2022.

हॅशटॅग्स

#Eknath Shinde(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x