15 January 2025 8:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉकमध्ये तुफान तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल Reliance Power Share Price | 39 रुपयाच्या पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RPOWER Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025 Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
x

Eknath Shinde | एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार | फडणवीस बाहेरून नियंत्रण ठेवतील

Eknath Shinde

Eknath Shinde | विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेविरोधात बंडाचा झेंडा फडकवणारे एकनाथ शिंदे दहा दिवसांनंतर मुंबईत दाखल झाले. विमानतळावर उतरल्यानंतर शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि आता हे दोन्ही नेते राजभवनात पोहोचले आहेत.

शिवसेनेच्या ३९ आमदारांनी बंडखोरी :
महाविकास आघाडीतून माघार घेण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या ३९ आमदारांनी बंडखोरी केली. गेल्या 10 दिवसांपासून हे आमदार राज्याबाहेर आहेत. बुधवारी सर्व आमदार गुवाहाटीहून गोव्यात पोहोचले. त्यानंतर राज्यातील ठाकरे सरकार पडले.

उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदे आज मुंबईत दाखल झाले. मुंबई विमानतळावर आल्यानंतर एकनाथ शिंदे थेट आदित्य ठाकरे यांच्या संसदीय मतदारसंघातील वरळी येथील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर गेले.

दोन्ही नेत्यांनी राजभवनात प्रवेश केला :
सागर बंगला येथे आशिष शेलार यांनी एकनाथ शिंदे यांचे स्वागत केले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी राजभवनात प्रवेश केला. दोन्ही नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे.

आज संध्याकाळी साडेसात वाजता शिंदे यांचा एकट्याचा शपथविधी :
आज संध्याकाळी साडेसात वाजता एकनाथ शिंदे यांचा एकट्याचा शपथविधी होईल. लवकरच पुढची कारवाई करुन आम्ही मंत्रिमंडळ विस्तार करु. यामध्ये शिवसेना आणि भाजपचे आमदार येतील. मी स्वत: बाहेर असेन, पण हे सरकार चाललं पाहिजे ही जबाबदारी माझी असेल”, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Eknath Shinde will become Chief Minister of Maharashtra check details 30 June 2022.

हॅशटॅग्स

#Eknath Shinde(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x