21 April 2025 3:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

भाजप आणि फडणवीसांचा दिलदारपणा? | थांबा! राजकीय गेम पुढे आहे | शिंदेंच्या खांद्यावर बंदूक का? | काय आहे संपूर्ण योजना

Eknath Shinde

Eknath Shinde | महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट आलाय. कारण एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होतील असं देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं. तसंच मी सरकारच्या बाहेर असणार आहे असंही त्यांनी सांगितलं तोच हा ट्विस्ट समोर आला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये सहभागी व्हावं तसंच उपमुख्यमंत्री व्हावं याकरिता आम्ही आग्रही आहोत असं जे. पी. नड्डा यांनी म्हटलं आहे.

काय म्हणालेत जे. पी. नड्डा :
महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीनंतर त्या राज्यातले नेते देवेंद्र फडणवीस यांनी हे जाहीर केलं की एकनाथ शिंदे हे या सरकारमध्ये मुख्यमंत्री व्हावं. भाजपचं स्थान या सरकारमध्ये राहावं म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं असं म्हटलं आहे.”

देवेंद्र फडणवीस यांनी आमची विनंती मान्य केली आहे. देवेंद्र फडणवीस हे या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होतील हे जे. पी. नड्डा यांनी सांगितलंय. देवेंद्र फडणवीस यांनी मोठं मन दाखवत मंत्रिमंडळात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राच्या जनतेबाबत वाटणारं त्यांचं प्रेमच य़ा निर्णयातून दिसून येतं आहे असंही जे. पी. नड्डा यांनी म्हटलं आहे.

पण संपूर्ण गेमप्लॅन राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारा आहे… शिंदें गट आणि त्याच गटाचा मुख्यमंत्री ही त्याची सुरुवात असल्याचं समोर येतंय. काय आहे दीर्घकालीन राजकीय गेम प्लॅन समजून घ्या.

आम्ही शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं आणि उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री झाले :
शिवसैनिकांमध्ये संदेश जावा की आम्ही शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं आणि उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री झाले. त्यातून त्यांच्याबद्दलची भावनिक लाट हळहळू ओसरू लागेल. तसेच सामान्य शिवसैनिक सुद्धा एकनाथ शिंदेंच्या गटात अपेक्षेने सामील होऊ लागतील. कारण निवडणूक जिंकायच्या म्हटल्यावर कार्यकर्त्यांच्या फौजा सोबत असाव्या लागतात.

2024च्या विधानसभा आणि लोकसभा शतप्रतिशत :
मागील इतिहास पाहता भारतीय जनता पक्षात प्रथम सहज वाटणाऱ्या गोष्टी भविष्यातील मोठी खेळी असतात. त्यात त्याग वगरे काहीच नसतं, पण असतो तो मोठा स्वार्थ आणि राजकीय हेतू . २०२४ मधील निवडणूक जी नरेंद्र मोदींची शेवटची निवडणूक असेल असं म्हटलं जातंय. म्हणजे २०२४ मध्ये नरेंद्र मोदी हे शेवटची टर्म पंतप्रधान होतील आणि त्याच टर्म मध्ये अनेक राज्यांसंबंधित अनेक धक्कादायक निर्णय होऊ शकतात. त्यासाठी शतप्रतिशत म्हणजे, सर्वत्र भाजप असणं गरजेचं आहे. अगदी ते महाराष्ट्रालाही लागू होतं. त्याचा थेट संबंध मुंबई आणि विदर्भ असा सुद्धा असू शकतो. तोच छोट्या राज्यांचा अजेंडा आरएसएसचा कायम राहिला आहे.

तीव्र विरोध होणारच हे साहजिकच :
मुंबई आणि वेगळा विदर्भ करण्याचं ठरल्यास त्याला तीव्र विरोध होणारच हे साहजिकच आहे. तो विरोध असेल राजकीय आणि त्यात आघाडीवर असतील शिवसेना आणि ठाकरे बंधू. त्यासाठी शिवसेना राजकीय दृष्ट्या संपणं अत्यंत गरजेचं आहे. तसेच मनसेचे राजू पाटील यांना राज्य मंत्रिपद देऊन राज ठाकरेंना खिशात घातलं जाणार आहे ही १०० टक्के बातमी आमच्या सोर्सेसनी दिली आहे. तसेच राज ठाकरे आणि त्यांचे बिझनेस पार्टनर यांच्या विरोधातील ईडीच्या केसेस देखील मागे घेतल्या जाणार आहेत. त्यासाठीच राज ठाकरे या ‘गेम प्लॅन’ मध्ये सामील होते ही खात्रीलायक माहिती आहे. फडणवीस हे राज ठाकरेंचा नवीन बंगला बघण्यासाठी गेले होते असं ज्यांना वाटतं त्यांना खरंच राजकारणाचा ‘र’ सुद्धा कळत नाही असं म्हणावं लागेल.

दुसरीकडे स्वतः देवेंद्र फडणवीस हे वेगळ्या विदर्भाच्या विचारातील नेते आहेत आणि त्यांनी जाहीरपणे त्यासंबंधित मतदान केलं आहे हे राज्याने पाहिलं आहे. त्यातील पहिला डाव हा ‘मिशन एकनाथ शिंदे’ होता हे सिद्ध होतंय. त्यांना वर्ष दीडवर्ष मुख्यमंत्री पद देऊन प्रथम मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन जोडून इथला व्यापार गुजरातशी वेगाने जोडायचा. तसेच अनेक विवादित म्हणजे आरे मेट्रो सहित अनेक मुंबईकरांचा विरोध असलेले विषय एकनाथ शिंदे यांच्या माथी मारायचे असा प्लॅन असण्याचा अंदाज लावण्यात आला आहे.

vidarbh

शिंदेंच्या एक दीड वर्षाच्या कालावधीत :
एकनाथ शिंदेंच्या एक दीड वर्षाच्या कालावधीत शिवसेनेचे सर्व आमदार, खासदार, नगरसेवक, जिल्हाध्यक्ष आणि संपर्क प्रमुख यांना सत्तेच्या जोरावर ‘शिंदे गटात’ जोडायचं. त्यानंतर २०२४ मधील निवडणुकीच्या काही महिने आधी फडणवीसांना विराजमान करून संपूर्ण शिवसेना (शिंदे गट) भाजपामध्ये विलीन करून टाकायचा. आणि उद्धव ठाकरेंची मूळ शिवसेना केवळ नावाला जिवंत ठेऊन आणि उद्धव ठाकरेंवर टीका न करता संजय राऊतांना लक्ष करून पुढील १८ महिने लोकांमध्ये संभ्रम कायम ठेवायचा की ते पुन्हा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी किंवा काँग्रेससोबत जाऊ शकतात. हे मुद्दे शिवसेनेला शेवटपर्यंत वर येऊ देणार नाहीत आणि तेच भाजपाला हवं आहे.

भाजपचे प्लॅन नेहमी शॉर्ट टर्मचे नसतात. ते लाँग टर्मचेच असतात. शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यामागेही तोच हेतू आहे. 2024च्या विधानसभेच्या तयारीसाठी भाजपने हा मोठा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातं. 2024च्या निवडणुकीत स्वबळावर सत्तेत येण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यासाठी त्यांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. म्हणूनच त्यांनी स्वत: सत्तेत जाण्याऐवजी शिंदे यांना सत्तेची सूत्रे दिल्याचंही सांगितलं जात आहे.

थेट भाजपमध्ये आमदार जाणार नाहीत म्हणून…
शिवसेनेचे सध्या एकनाथ शिंदे गटात सामील झालेल्या आमदारांना अजून माहिती नाही, की पुढे काय वाढून ठेवलंय. या आमदारांच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव त्यांना खूप महत्वाचं आहे. थेट भाजपमध्ये जाण्यास त्यांचा प्रचंड विरोध आहे. परिणामी ते बंड केल्यानंतर शिंदेंसोबत अधिक दिवस थांबले नसते. त्यामुळे सध्या त्यांना अंधारात ठेऊन नंतर त्यांच्याकडे दुसरा परतीचा पर्याय नसेल याची भाजपने शिंदेंना मुख्यमंत्रीपद देऊन काळजी घेतली आहे. त्यानंतर निवडणुकीच्या आधी या आमदारांना भाजपमध्ये सामील करून आणि आर्थिक मदतीचं आश्वासन देऊन हा गट भाजपमध्ये विलीन केला जाईल. त्यामुळे राज्यातील जवळपास २०० विधासनसभा मतदारसंघ आणि ४० लोकसभा मतदारसंघ भाजपच्या प्रभावाखाली येतील.

लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत राज्यातील लोकांना महागाई – बेरोजगारीच्या मुद्यापासून दूर ठेवणं :
सध्याच्या कृत्रिम राजकीय परिस्थितीतून सामान्य लोकांना महागाई – बेरोजगारीच्या मुद्यापासून दूर ठेवणं आणि प्रसार माध्यमांच्या केंद्रस्थानी धार्मिक मुद्दे म्हणजे हिंदुत्व, मुस्लिम विरोधातील वातावरण आणि जातीचे म्हणजे मराठा आणि ओबीसीचे विषय पेटवत ठेवणं. त्यामुळे हेच मुद्दे २०२४ मध्ये राज्यातील लोकांना महागाई – बेरोजगारीच्या मुद्यापासून दूर ठेवतील आणि भाजपचा २०२४ मधील लोकसभा आणि विधानसभेचा मार्ग सोपा होईल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Eknath Shinde will become Chief Minister of Maharashtra is plan for importing Shivsena into BJP details 30 June 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Eknath Shinde(97)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या