22 February 2025 3:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या कृत्याने टाळ्यांचा कडकडाट, शरद पवारांसोबत कार्यक्रमात हजेरी Bonus Share News | 1 वर 1 फ्री बोनस शेअर देणार ही कंपनी, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड डेट पूर्वी गुंतवणूकदारांची धावपळ UPI ID | आता UPI द्वारे पेमेंट करताना मोजावे लागतील एक्सट्रा चार्जेस, या गुगल-पे ने केली सुरुवात, अपडेट जाणून घ्या Railway Ticket Booking | ऑनलाइन की काऊंटर रेल्वे टिकीट, दोघांमधील स्वस्त तिकीट कोणते, हे माहित असु द्या Home Loan with SIP | पगारदारांनो, होम लोन EMI सह 15% एसआयपी करा, लोन फिटताच संपूर्ण व्याज वसूल होईल
x

जयपूर एक्स्प्रेस घटना! मोदी-योगींचं नाव घेत RPF जवान प्रवाशांना गोळ्या झाडू लागल्याने यापुढे RPF जवानांना AK-47 घेऊन रेल्वेत जाण्यास बंदी

Jaipur Express firing

Jaipur Express Firing | जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये एका जवानाने केलेल्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाल्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) मोठा निर्णय घेतला आहे. आता आरपीएफ जवानांना प्रवासादरम्यान एके-47 रायफल बाळगण्याची परवानगी मिळणार नाही. त्याऐवजी ते आता पिस्तूल बाळगणार आहेत. सध्या रेल्वेच्या दोन झोनने हा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने रेल्वे एस्कॉर्ट पार्टीला यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. विशेष म्हणजे यावेळी संबंधित जवानाने थेट मोदी-योगीचं नाव घेत हा धक्कादायक प्रकार केल्याचा व्हिडिओ एकाप्रवाशानेच व्हायरल केल्यानंतर केंद्र सरकार तसेच गोदी मीडियावर देखील प्रचंड टीका झाली होती.

३१ जुलै रोजी झालेल्या हृदयद्रावक घटनेनंतर रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. जयपूर-मुंबई सेंट्रल सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये कॉन्स्टेबल चेतन सिंह यांनी आपल्या स्वयंचलित असॉल्ट रायफलने चार जणांची हत्या केली.

मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ऋषीकुमार शुक्ला म्हणाले, ‘मध्य रेल्वेच्या मुंबई विभागासाठी आम्ही आदेश जारी केला आहे. त्यानुसार एस्कॉर्ट पार्टी आता एके-४७ ऐवजी पिस्तूल सोबत ठेवणार आहे. पश्चिम रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, स्वयंचलित असॉल्ट रायफल देण्याविरोधात ही आदेश जारी केले आहेत. आता एस्कॉर्ट पार्टीला पिस्तूल घेऊन प्रवास करावा लागत आहे.

भारतीय रेल्वेच्या सर्व विभागांसाठी तशा सूचना जारी केल्या जाऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र, दहशतवादी हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी आरपीएफच्या पथकांना स्थानकांवर आणि नक्षलवादी भागासारख्या अतिजोखमीच्या मार्गावर धावणाऱ्या गाड्यांमध्ये एके-४७ सारखी शस्त्रे घेऊन प्रवास करण्याची परवानगी देण्यात येणार आहे.

जयपूर-मुंबई सेंट्रल सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये एस्कॉर्टिंग पार्टीत तैनात असलेल्या चेतन सिंह यांच्यासह चार जवानांपैकी दोन जवानांकडे आधुनिक रायफल आणि २० गोळ्या होत्या. सहायक उपनिरीक्षक टिकलसिंग मीणा यांच्यासह अन्य दोघांकडे पिस्तूल होते. या घटनेमुळे अधिकाऱ्यांना आपल्या धोरणाचा फेरविचार करावा लागला.

अवजड शस्त्रांसह प्रवास करण्यासाठी एस्कॉर्ट पार्टीची गरज यावर चर्चा करण्यासाठी रेल्वे पोलिस आणि आरपीएफ यांच्यात बैठक झाली. रेल्वे बोर्डाने स्थापन केलेल्या पाच सदस्यीय समितीला ही समस्या सोडवावी लागणार आहे. गर्दीच्या ठिकाणी कोणत्या प्रकारची शस्त्रे द्यावीत, याचीही तपासणी ही समिती करणार आहे.

News Title : Escort Party will not carry AK 47 Guns inside running trains railway department orders after Jaipur Express firing 04 August 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Jaipur Express firing(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x