21 November 2024 10:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

50 Khoke Ekdam Ok | शिंदे समर्थक मंत्री दादा भुसेंच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांची '50 खोके एकदम ओके' घोषणाबाजी, काळे झेंडे दाखवले

50 Khoke Ekdam Ok

50 Khoke Ekdam Ok | कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांना आज शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागले. धुळे दौऱ्यावर असलेल्या दादा भुसे यांना काळे रुमाल दाखवत आणि ५० खोके एकदम ओके म्हणत शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले आहेत.

बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे हे आज म्हणजे शनिवारी धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्ते जिल्ह्यातील कासारे गावात विकास कामांचं उद्घाटन करण्यात आलं. याच कार्यक्रमात दादा भुसे हे व्यासपीठावर आल्यानंतर काही शेतकऱ्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. यावेळी शेतकऱ्यांनी विविध मागण्यांकडे लक्ष वेधलं आणि ५० खोके आणि एकदम ओकेच्या घोषणाही दिल्या.

एकीकडे शेतकरी मंत्री दादा भुसे यांच्याविरोधात जोरजोरात घोषणा देत होते. त्यांना काळे झेंडे दाखवत होते. या शेतकऱ्यांच्या विरोधादरम्यान यावेळी मंत्री भुसे यांनी काळे झेंडे दाखवणार्‍या शेतकर्‍यांना समजूत घालण्यासाठी जवळ बोलावले. मात्र, या शेतकऱ्यांनी मंत्री दादा भुसे यांना कोणताच प्रतिसाद दिला नाही.

शेतकरी का चिडले :
राज्यात सत्तांतर होण्याआधीच अनेक भागात प्रचंड पाऊस झाला होता. धुळे, नाशिक जिल्ह्यातही पावसांमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. त्यावेळी दादा भुसे हे राज्याचे कृषी मंत्री होते. झालेल्या पिक नुकसानीचे पंचनामेही करण्यात आले होते. मात्र, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालीच नाही.याच मुद्द्यावरून काही शेतकरी आक्रमक झाले आणि त्यांनी दादा भुसे यांच्याविरोधात घोषणा दिल्या.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Farmers protest against Dada Bhuse in Dhule chant 50 Khoke Ekdam ok check details 03 September 2022.

हॅशटॅग्स

#CM Eknath Shinde(90)#DadaBhuse(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x