2024 मध्ये भाजपचा मोठा पराभव होणार, 6 महिन्यानंतर भाजपचे अनेक बडे नेते ED, CBI, NIA कारवाईत तुरुंगात असतील - सत्यपाल मलिक

Lok Sabha Election 2024 | मागील दोन महिने मुख्यमंत्री नितीश कुमार देशभरात फिरले आहेत. या भेटीचा उद्देश स्पष्ट करताना ते स्पष्ट सांगतात की, भाजपचा विजय रथ रोखायचा असेल तर विरोधी पक्षांना एकत्र यावे लागेल. त्यासाठी मोठ्या राजकीय पक्षांबरोबरच छोट्या प्रादेशिक पक्षांनाही एका व्यासपीठावर आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या भेटी आणि बैठकांमध्ये नितीश कुमार यांनी घेतलेल्या मेहनतीची पाटण्यातील बैठकीनंतर लिटमस टेस्ट असणार आहे. अनेक अडथळ्यांनंतर काल (23 जून) पटना येथे विरोधी पक्षांची भविष्यातील राजकारणाला वेगळी दिशा देण्याची शक्यता असलेली बैठक होत आहे.
१९७७ नंतर पहिल्यांदाच विरोधकांच्या एकजुटीबाबत असे चित्र पाहायला मिळाले आहे. याआधीही अनेकदा विरोधी पक्षांची बैठक झाली, युतीही झाली. परंतु, एकाच व्यासपीठावर एकत्र येण्यास इतक्या पक्षांनी सहमती दर्शविण्याची ही पहिलीच वेळ आहे. विरोधकांमधील हे सामंजस्य खूप आत्मविश्वास दाखवणारं आहे. सर्वांनी मिळून लढा दिला तर आपले ध्येय अशक्य नाही, असा संदेश देण्यात विरोधक यशस्वी झाले आहेत.
दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपल्या नव्या टीमचा आराखडा तयार केला आहे. उदयपूर नवसंजीवनी आणि रायपूर महाधिष्ठीत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करून अनेक युवा नेत्यांवर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्याची काँग्रेस पक्षाची तयारी आहे. त्याचबरोबर संघटनेला नवसंजीवनी देण्यासाठी अनेक प्रदेशाध्यक्षही बदलण्यात येणार आहेत असे खात्रीलायक वृत्त आहे. काँग्रेसने दक्षिण भारतात कर्नाटक भाजपकडून खेचल्यानंतर तेलंगणात सुद्धा काँग्रेस सत्तेत येईल असे संकेत मिळाल्याने तेलंगणाचे मुख्यमंत्री KCR सुद्धा विरोधकांच्या आघाडीपासून दूर गेल्याचे म्हटले जातेय. त्यामुळे राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये काँग्रेस अत्यंत भक्कम स्थितीत असल्याने काँगेसचा आत्मविश्वास दुणावला आहे.
२०२४ मध्ये भाजपची सत्ता जाणार आणि भाजपचे नेते तुरुंगात असतील – सत्यपाल मलिक
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि जम्मू-काश्मीर तसेच गोव्याचे माजी गव्हर्नर सत्यपाल सिंग यांनी नुकताच गौप्यस्फोट करताना CRPF जवानांच्या मृत्यूला मोदी सरकार कसे जवाबदार होते आणि या घटनेचा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी कसा फायदा घेतला गेला ते उघड केलं होतं. त्यानंतर त्यांच्या घरावर देखील CBI रेड पडली आहे.
जाट समाजातील असलेले सत्यपाल मलिक हे आता हरियाणा आणि पंजाबमध्ये अनेक मेळावे घेत असून या समाजाचा शेतकरी आंदोलनात महत्वाचा सहभाग राहिला आहे. तसेच महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनावरून त्यांनी भाकीत केले आहे की, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा हरयाणातील सर्व १० जागांवर दारुण पराभव तर होतीलच, पण देशातही मोदींचा मोठ्या फरकाने पराभव होईल असं भाकीत केलं आहे. वरिष्ठ पत्रकार दीपक शर्मा यांना दिलेल्या मुलाखतीत अनेक उलघडे केले असून आगामी निवडणूक ऐतिहासिक ठरेल असे म्हटले आहे. विरोधकांनी न डगमगता पुढचे ५-६ महिने ED, CBI आणि आयटी विभागाचा त्रास सहन करावा. कारण हे लोकसभा निवडणुकीपूर्वी हे विरोधकांना घाबरविण्यासाठी नव्हे तर स्वतः मोदी भाजपच्या अंतर्गत सर्व्हेमुळे घाबरले असल्याने करत आहेत असं ते म्हणाले. तसेच पुढच्या ६ महिन्यानंतर सत्तांतर होईल आणि भाजपचे अनेक बडे नेते तुरुंगात असतील असे देखील त्यांनी ठामपणे सांगितले आहेत.
ती मुलाखत तुम्ही येथे पाहू शकता :
News Title : Former Jammu Kashmir governor and BJP leader Satyapal Malik talked on lok Sabha Election 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Suzlon Share Price | 57 रुपयाच्या सुझलॉन शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, या बातमीचा परिणाम - NSE: SUZLON
-
IRFC Share Price | सरकारी कंपनीच्या मल्टिबॅगर शेअरबाबत फायद्याची अपडेट, मोठी अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IREDA Share Price | इरेडा शेअर देईल 27 टक्के परतावा, मल्टिबॅगर PSU शेअरची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरबद्दल महत्वाची अपडेट, ग्लोबल फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL