21 November 2024 7:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

शिंदे-फडणवीस सरकारची पोलिसांमार्फत हिंदू सणांविरुद्ध संतापजनक कारवाई | थेट गेणेश मंडळाचा देखावा हटवण्याचं पाप

Ganesh Chaturthi 2022

CM Eknath Shinde | गणपती हा आपल्या सर्व देवांपैकी आराध्य देव म्हणून मानला गेला आहे. कोणतंही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी पूजेचा मान मिळतो, तो आपल्या लाडक्या बाप्पालाच! भाद्रपद महिन्यातल्या चतुर्थीला घरोघरी बाप्पा विराजमान होतात. यंदा कोरोनाचा काळ सरल्यानंतर पहिल्यांदाच थाटामाटात गणेश उत्सव साजरा केला जात आहे. गेली दोन वर्षे कोरोनाचं सावट असल्यानं गणेश उत्सवासह सगळ्याच सण साधेपणाने साजरे केले गेले. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात उत्साहपूर्ण वातावरण आहे. मात्र हिंदूंच्या या सणाला शिंदे फडवणवीस सरकारच्या काळात गालबोट लागल्याचं पाहायला मिळत आहे.

गणेशोत्सवात गणरायाच्या मूर्तीबरोबर एका गोष्टीची हमखास चर्चा होते, ती म्हणजे देखावे. वेगवेगळे विषय घेऊन गणेश मंडळांकडून देखावे साकारले जातात. यंदा महाराष्ट्रात झालेल्या राजकीय घडामोडींनंतर गणरायाचं आगमन झालं. त्यामुळे कल्याणमधील विजय तरुण मित्रमंडळाने शिवसेनेतील बंडखोरीबद्दलचा चलचित्र देखावा साकारला. या देखाव्यावर कल्याण पोलिसांनी कारवाई केली असून, साहित्य जप्त केलं आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर विजय तरुण मंडळाने गणेश मूर्तीची स्थापना न करण्याचा निर्णय घेतलाय.

राजकीय घडामोडींवर चलचित्र देखावा :
कल्याणमध्ये विजय तरुण मंडळाने यंदा शिवसेनेतील राजकीय घडामोडींवर चलचित्र देखावा साकारला होता. ‘पक्ष निष्ठा’ असा विषय घेऊन चलचित्र देखावा साकारण्यात आला. ‘मी शिवसेना बोलतेय’ इथून या चलचित्र देखाव्याची सुरूवात करण्यात होती.

देखाव्यावर कल्याण पोलिसांनी आक्षेप घेतला :
या देखाव्यात शिवसेनेला मोठा वृक्षाच्या स्वरूपात दाखवण्यात आलेलं आहे. या वृक्षाला फळे लागल्यानंतर ती इतर पक्ष खातात, अशा आशयाचा हा देखावा आहे. या देखाव्यावर कल्याण पोलिसांनी आक्षेप घेतला. कल्याण पोलिसांनी देखाव्यावर आज (३१ ऑगस्ट) पहाटेच्या सुमारास कारवाई केली. पोलिसांनी देखाव्याची सगळं साहित्य जप्त केलं.

देखावा जप्त करण्याच्या कारवाई :
देखावा जप्त करण्याच्या कारवाईबाबत विजय तरुण मंडळाचे विश्वस्त विजय साळवी म्हणाले, “मंडळतर्फे प्रत्येक वर्षी वर्षभरातील महत्त्वाच्या घडामोडीवर देखावा साकारला जातो. यंदाच्या देखाव्यात काहीच आक्षेपार्ह नव्हतं. पहाटेच्या सुमारास कारवाई केली. ही हिटलरशही आहे. मंडळाने काहीही वादग्रस्त दाखवलं नव्हतं. ताज्या विषयावर भाष्य केलं होतं, तरी देखील देखावा जप्त करण्यात आला आहे”, साळवी यांनी सांगितलं. आम्ही या कारवाई विरोधात न्यायालयात दाद मागणार असून, या कारवाईचा निषेध म्हणून आम्ही यंदा गणेश मूर्तीची स्थापना करणार नाही”, असं विजय साळवी यांनी सांगितलं.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Ganesh Chaturthi 2022 Police action against Ganesh Mandal Ganpati Dekhava in Kalyan 31 August 2022.

हॅशटॅग्स

#Ganesh Chaturthi 2022(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x