5 November 2024 2:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका - GMP IPO SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा SBI फंडाच्या खास योजनेत, मिळेल 1,05,60,053 रुपये परतावा - Marathi News
x

Jan Samarth Portal | सरकार लवकरच 'जन समर्थ' पोर्टल सुरू करणार | एकाच प्लॅटफॉर्मवर सर्व सरकारी योजना

Jan Samarth Portal

Jan Samarth Portal | आपल्या विविध योजना एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यासाठी सरकार ‘जन समर्थ’ पोर्टल सुरू करणार आहे. सर्वसामान्यांचे जीवन सुसह्य करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. याच्या मदतीने विविध मंत्रालये आणि विभागांमार्फत चालविल्या जाणाऱ्या विविध योजनांपर्यंत पोहोचणे सामान्यांना सहज शक्य होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या पोर्टलमध्ये सुरुवातीला 15 क्रेडिट लिंक्ड सरकारी योजनांचा समावेश असणार आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या किमान सरकारच्या जास्तीत जास्त कारभाराच्या दृष्टीकोनाचा एक भाग म्हणून या निर्णयाकडे पाहिले जात आहे.

सरकारी योजना अडचणीशिवाय सुरु करणे :
केंद्राच्या काही योजनांमध्ये अनेक एजन्सींचा वाटा असल्याने हळूहळू या सुविधेचा विस्तार करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. उदाहरणार्थ, प्रधानमंत्री आवास योजना आणि क्रेडिट लिंक्ड कॅपिटल सबसिडी स्कीम (सीएलसीएस) सारख्या योजना वेगवेगळ्या मंत्रालयांद्वारे चालवल्या जात आहेत. सरकारच्या विविध योजना एकाच व्यासपीठावर उपलब्ध व्हाव्यात, जेणेकरून सर्वसामान्यांना कोणत्याही अडचणीशिवाय त्या सहज उपलब्ध होऊ शकतील, हा या पोर्टलचा उद्देश आहे.

पायलट टेस्टिंग सुरू :
मात्र, सध्या ते भारतीय स्टेट बँक (एसबीआय) आणि इतर लेंडर्सद्वारे चालविले जात आहे. सूत्रांनी सांगितले की, पोर्टलमध्ये एक ओपन आर्किटेक्चर असेल जेणेकरून भविष्यात राज्य सरकारे आणि इतर संस्थादेखील या व्यासपीठावर त्यांच्या योजनांचा समावेश करू शकतील. कर्जदारांच्या सोयीसाठी सरकारने 2018 मध्ये एमएसएमई, गृह, वाहन आणि वैयक्तिक कर्जासह विविध प्रकारच्या क्रेडिट उत्पादनांसाठी एक पोर्टल http://psbloansin59minutes.com सुरू केले होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Jan Samarth Portal will be launch soon check details here 29 May 2022.

हॅशटॅग्स

#Jan Samarth Portal(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x