15 January 2025 2:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN
x

जे शिंदे गट फोडताना घडवलं तेच झारखंड राज्यात | गुवाहाटीतूनच हालचाली, काँग्रेसच्या बंडखोर आमदारांकडून गाडीभर कॅश पकडली

Jharkhand Political crisis

Jharkhand Cash | महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पडताना शिंदे गटातील सर्व बंडखोर आमदारांचं वास्तव्य गुवाहाटीतील पंचतारांकित हॉटेल मध्ये होतं. आता तेच गुवाहाटी हॉटेल आणि तिथून सुरु झालेल्या हालचाली पुन्हा प्रकाशझोतात आल्या आहेत. झारखंड कॅश स्कँडलमध्ये एकापाठोपाठ अजून नवे आरोप समोर येत आहेत. झारखंडमधील काँग्रेसच्या एका आमदाराने लेटर बॉम्ब फोडला आहे. बेरमो विधानसभा मतदारसंघाचे आमदार कुमार जयमंगल सिंह यांनी हावडामध्ये पकडलेल्या आमदारांना जबाबदार धरलं आहे. यासोबतच झारखंडमधील सरकार पाडण्याचा कट आणि त्यात आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचा सहभाग याबद्दलही जयमंगल सिंह यांनी पत्रात लिहिलं आहे.

विशेष म्हणजे हे तेच आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा आहेत जे गुवाहाटीला शिंदेंसोबत बैठक घायचे आणि त्याच्यावर भाजपने महाराष्ट्रातील सरकार पडताना मोठी जवाबदारी सोपवली होती. तेच आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा आता झारखंड सरकार पडताना देखील प्रकाशझोतात आल्याने भाजपविरोधात संताप वाढताना दिसत आहे.

गुवाहाटीला घ्यायला बोलावले होते :
कुमार जयमंगल सिंह यांनी आपल्या पत्रात लिहिले की, तिन्ही आमदारांनी त्यांना भेटण्यासाठी प्रथम कोलकाता येथे बोलावले होते. जयमंगल यांच्या म्हणण्यानुसार, यानंतर या तिघांनाही त्यांना गुवाहाटीला घेऊन जायचं होतं आणि मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांची भेट घेण्याची योजना होती. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी या लोकांना काही खास आश्वासनं दिली होती, असं या पत्रात काँग्रेस आमदाराने लिहिलं आहे. त्यानुसार झारखंडमध्ये काँग्रेस आणि जेएमएमचे सरकार पाडण्याचे षडयंत्र होते. त्यानंतर आलेल्या नव्या सरकारमध्ये संबंधित आमदारांना मंत्रिपद आणि १० कोटी रुपये देण्यासही सांगण्यात आले असं उघड झालं आहे.

हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितले :
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही या प्रकरणी वक्तव्य केलं आहे. ‘काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वातील लोकही आमच्या संपर्कात असतात. पण आम्ही राजकारणाबद्दल बोलत नाही. ‘मी २२ वर्षे त्या पक्षात असल्याने आमचे संपर्क कायम आहेत. कुमार जयमंगल यांच्या आरोपांवर ते म्हणाले की, “मला माहित नाही की, यावर एफआयआर का दाखल करण्यात आला आहे.

काँग्रेसने या तीनही आमदारांना निलंबित केले :
झारखंड काँग्रेसच्या 3 आमदारांच्या ताब्यातून रोकड जप्त केल्यानंतर आता पक्षाने कडक कारवाई केली आहे. रोख रकमेवरून विरोधकांच्या प्रश्नांनी घेरलेल्या काँग्रेसने आता या तीनही आमदारांना निलंबित केले आहे. झारखंड काँग्रेसचे प्रभारी अविनाश पांडे यांनी शनिवारी रोख रक्कम घेऊन पकडलेल्या आमदारांना तात्काळ निलंबित करण्यात आल्याची माहिती माध्यमांना दिली आहे.

निलंबित केलेल्या आमदारांमध्ये कोण :
काँग्रेसने निलंबित केलेल्या तीन आमदारांमध्ये रांचीच्या खिजरीचे आमदार राजेश कच्छप, कोंगारी सिमडेगा येथील कोलेबिरा येथील आमदार नमन व्हिक्सेल आणि इरफान अन्सारी यांचा समावेश आहे. जाणून घेऊया पश्चिम बंगालमधील हावडामध्ये काँग्रेसच्या या तीन आमदारांना मोठ्या प्रमाणात रोख रक्कम घेऊन पकडण्यात आलं. ही रक्कम इतकी जास्त होती की नोटा मोजण्याच्या मशिनद्वारे त्याची मोजणी करावी लागत होती.

एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले होते की, गुप्तचर माहितीच्या आधारे आमदार इरफान अन्सारी, राजेश कच्चप आणि नमन बिक्सल कोंगरी ज्या वाहनातून प्रवास करत होते, ते वाहन राष्ट्रीय महामार्ग -16 वर पाचला पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राणीहट्टी येथे अडविण्यात आले. त्यांच्या गाडीत मोठ्या प्रमाणात कॅश मिळाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Jharkhand Political crisis check details 31 July 2022.

हॅशटॅग्स

#Jharkhand Political crisis(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x