कर्नाटक विधानसभा निवडणूक, सलग 10 दिवस तळ ठोकूनही नरेंद्र मोदी यांचा राहुल गांधींकडून दारुण पराभव, काँग्रेसचा ऐतिहासिक विजय

Karnataka Assembly Election Result २०२३ | कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 मध्ये 224 जागांचे निकाल लागण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत काँग्रेसने ८ जागांवर विजय मिळवला आहे. तर जवळपास 138 जागांवर आघाडीवर आहे. तर ट्रेंडमध्ये ८० च्या जवळपास पोहोचलेला भारतीय जनता पक्ष आता घसरला असून त्याने ६६ जागांवर आघाडी घेतली आहे. भाजप नेते आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीही आपला पराभव स्वीकारला आहे आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पुनरागमन करण्याविषयी बोलू लागले आहेत.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील मतमोजणीच्या ताज्या कलानुसार राज्यात काँग्रेस पुन्हा सत्तेवर येणार असून सत्ताधारी भाजपचा पराभव होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. 11.45 वाजेपर्यंत 224 सदस्यीय विधानसभेत काँग्रेस 120 जागांवर आघाडीवर आहे, तर भाजप 74 जागांवर, जेडीएस 24 जागांवर आणि इतर 6 जागांवर आघाडीवर आहेत.
राहुल गांधींनी जाहीर केलेल्या काँग्रेसच्या पाच हमी योजना विजयामागे :
काँग्रेसच्या पाच हमी योजना विजयामागे महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसने घोषणा केली होती की, आपले सरकार स्थापन झाल्यास पहिल्या कॅबिनेट बैठकीत पाच हमी लागू केल्या जातील. यामध्ये गृह ज्योती, गृह लक्ष्मी, अनन्या भाग्य युवा निधी आणि शक्ती योजनेचा समावेश आहे. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात गृह ज्योती योजनेअंतर्गत कर्नाटकातील सर्व घरांना २०० युनिट मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले आहे.
गृहलक्ष्मी योजनेच्या माध्यमातून सर्व कुटुंबातील महिला प्रमुखांना दरमहा दोन हजार रुपयांची मदत देण्याचे आश्वासन पक्षाने दिले आहे. त्याचप्रमाणे अन्न भाग्य योजनेच्या माध्यमातून सर्व बीपीएल कुटुंबांना दरमहा १० किलो धान्य देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
‘फ्री-बीज’ फायदे :
याशिवाय बेरोजगार पदवीधरांना दोन वर्षे दरमहा तीन हजार रुपये आणि बेरोजगार पदविकाधारकांना दरमहा दीड हजार रुपये देण्याचे आश्वासनही काँग्रेसने दिले आहे. याला युवानिधी योजना असे नाव देण्यात आले आहे. शक्ती योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिलांना कर्नाटक सरकारच्या बसेस म्हणजेच केएसआरटीसी आणि बीएमटीसी बसमध्ये मोफत प्रवास करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात सरकारी कर्मचाऱ्यांना खूश करण्यासाठी जुनी पेन्शन प्रणाली (ओपीएस) लागू करण्याचे आश्वासन दिले आहे.
हिमाचलमध्ये हा प्रयोग यशस्वी झाला:
फेब्रुवारीमध्ये हिमाचल प्रदेशातही काँग्रेसने विजय मिळवला होता. हिमाचल प्रदेशनिवडणुकीतही काँग्रेसने ओपीएस लागू करण्याचे आश्वासन दिले होते, ज्याला प्रचंड पसंती मिळाली आणि काँग्रेस स्वबळावर पाच वर्षांनंतर राज्यात पुनरागमन करू शकली. काँग्रेसने कर्नाटकात आरक्षण ५० टक्क्यांवरून ७५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे आणि महिलांसाठी मोफत बससुविधा देण्याचे आश्वासन दिले आहे. कर्नाटकातील सरकारी खात्यांमधील मंजूर पदे लवकरच भरण्याची आणि स्थानिकांना सरकारी नोकऱ्यांमध्ये ८० टक्के आरक्षण देण्याची घोषणा काँग्रेसने केली आहे.
भाजपने खिल्ली उडवली होती, पण काँग्रेस फोकस राहिली :
या आश्वासनांना भाजप मोफत म्हणत काँग्रेसची खिल्ली उडवत राहिला, पण काँग्रेस आपल्या आश्वासनांवर ठाम राहिली. किंबहुना दिल्लीत दरमहिन्याला २०० युनिट वीज आणि दरमहा २० हजार लिटर पाणी मोफत करून मोहल्ला क्लिनिक उभारून ‘आप’चीच सत्ता आली होती. अरविंद केजरीवाल सरकारने दिल्लीतील महिलांसाठी डीटीसी बसमधून प्रवास मोफत केला आहे. काँग्रेसनेही त्याच धर्तीवर राज्यातील निवडणूक जाहीरनामे तयार केले.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Karnataka Assembly Election Result 2023 big achievement for Rahul Gandhi check details on 13 May 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर तुमच्या पोर्टफोलिओसाठी फायदेशीर आहे का? ही आहे लॉन्ग टर्म टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IREDA Share Price | शेअरमध्ये जबरदस्त घसरगुंडी, गडगडतेय शेअर प्राईस, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: IREDA