8 March 2025 1:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
TATA Motors Share Price | 853 रुपये टार्गेट प्राईस, अशी संधी सोडू नका, मॉर्गन स्टेनली बुलिश - NSE: TATAMOTORS Nippon India Growth Fund | पैशाने पैसा वाढवा, तो सुद्धा 28 पटीने, एसआयपीचे 8.47 कोटींच्या फंडात रूपांतर Cheque Bounce Alert | चेकने पेमेंट करणाऱ्या 90% लोकांना माहित नाही, ही चुका करू नका, सर्वकाही गमावून बसाल Post Office Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी, प्रत्येक महिन्याला मिळणार 6150 रुपये, इथे पहा फायद्याची अपडेट BEL Share Price | डिफेन्स कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: BEL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्समध्ये घसरण होणार, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: YESBANK Horoscope Today | 08 मार्च 2025, कसा असेल तुमच्यासाठी शनिवारचा दिवस, तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

अंबाबाई देवी आणि श्री हनुमान आशीर्वाद महाविकास आघाडीच्या उमेदवाराला | भाजपच्या धार्मिक प्रचाराला कोल्हापुरात धक्का

Kolhapur By Poll Election

मुंबई, 16 एप्रिल | कोल्हापूर उत्तरेच्या अटीतटीच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांनी भाजपच्या उमेदवाराला निकालामध्ये धोबीपछाड दिल्याचं आकडेवारीतून सिद्ध झालं आहे. भाजप उमेदवार सत्यजीत कदम यांचा महाविकास आघाडीने दणदणीत पराभव घडवून आणताना भाजपच्या धार्मिक प्रचाराला मोठा धक्का दिला आहे. इथल्या मतदाराने मोठ्या प्रमाणावर महाविकास आघाडीच्या उमेदवारावरील विश्वास मतपेटीतून व्यक्त केला आहे.

Kolhapur North constituency by election voters have given their decision in favor of Congress. Congress candidate Jayashree Jadhav has won by 18,800 votes lead :

एकूण 26 फेऱ्यांमध्ये कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी पार पडली. जयश्री जाधव पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होत्या. मधल्या काही फेऱ्या वगळता त्यांनी आपली आघाडी कायम राखली. अखेर त्यांचा मोठा मताधिक्याने विजय झाला.

काँग्रेसच्या चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर महाविकास आघाडीकडून जयश्री जाधव यांनी निवडणूक लढवली तर भाजपकडून सत्यजीत कदम निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. राज्यात एकच पोटनिवडणूक असल्याने दोन्ही बाजूंनी प्रचाराचा सर्वोच्च बिंदू गाठला. राज्यातील जवळपास सर्व नेत्यांनी कोल्हापुरात येऊन प्रचार केला. त्यामुळे निकालाची उत्सुकता होती.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही अनेक दिवसांपासून कोल्हापुरात ठाण मांडलं होतं. शिवाय विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही इथे प्रचार केला होता. त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजप यांच्या प्रचारामध्ये जोरदार चुरस पाहायला मिळाली. विशेष म्हणजे येथे भाजपने मोठ्या प्रमाणावर धार्मिक मुद्दे प्रचारात उचलले होते. मात्र या मुद्यांना मतदारांनी नाकारलं आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या अंबाबाई देवीचे आणि आज हनुमान जयंतीच्या दिवशी श्री हनुमान आशीर्वाद महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळाले आहेत हे निकालावरून स्पष्ट होते आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा.

News Title: Kolhapur By Poll Election result Congress Candidate victory with majority check details 16 April 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Politics(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x