17 April 2025 2:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

राज्यात निवडणुकीपूर्वी दंगलीची मालिका! MIM आणि भाजप नेत्यांचे चार्टर्ड विमान ते घरोब्याचे संबंध आणि औरंगजेब स्क्रिप्टची राजकीय चर्चा रंगली

Kolhapur Crisis

Kolhapur Crisis | अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील समनापूर गावात मंगळवारी दोन गटात वाद झाला. संगमनेरमध्ये मंगळवारी सकाळी मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्च्यानंतर घरी परतत असताना संगमनेर तालुक्यापासून 5 ते 6 किमी अंतरावर असलेल्या समनापूर गावात दोन गटात वाद झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर बुधवारी कोल्हापूर शहरातील सात तरुणांच्या मोबाईलमध्ये औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचा स्टेटस ठेवल्याचा प्रकार समोर आला. यामुळे बुधवारी कोल्हापुरात तणाव होता. आता गुरुवारी कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीत तणाव निर्माण झाला आहे.

तत्पूर्वी, औरंगाबादच्या नामांतराचा वाद देखील पुन्हा पेटला होता. त्यावेळी औरंगाबादच्या नामांतराविरोधात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील चांगलेच आक्रमक झाले होते आणि त्यांनी थेट आंदोलनाचे हत्यार उपसले होते. नामांतराला विरोध करण्यासाठी शहरात MIMचं आंदोलन सुरू केलं होतं. त्यावेळी संभाजीनगरमध्ये MIMच्या आंदोलनात औरंगजेबाचे फोटो झळकल्याने वादाला तोंड फुटले होते. विशेष म्हणजे MIM च्या खासदार आणि आमदारांसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे संबंध आहेत.

त्यामुळे आता महत्वाची राजकीय चर्चा रंगली आहे. म्हणजे हिंदू मतांसोबत मुस्लिम मतं सुद्धा महाविकास आघाडीकडे झुकत असल्याने आणि मुस्लिम मतदार MIM पासून दुरावल्याने MIM सुद्धा चिंतेत असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे MIM ने काहीतरी पडद्याआड घडवून आणायचं आणि त्यावर भाजपने तीव्र प्रतिक्रिया देत राजकीय वातावरण तापवायचं अशी ‘राजकीय स्क्रिप्ट’ रचली गेल्याचं म्हटलं जातंय. विशेष म्हणजे भाजप पुरस्कृत टीव्ही वृत्तवाहिन्या आणि भाजपचे राष्ट्रीय नेते देखील सर्व विषयांना बगल देत कोल्हापूरवर बोलू लागल्याने शंका अधिक बळावत आहेत. यापूर्वी असेच प्रयोग झाल्याचा इतिहास आहे. देवेंद्र फडणवीस यांचं तर MIM च्या खासदार आमदारांच्या घरी भेटी गाठी झाल्याचे फोटो अनेकदा झळकले आहेत. एवढंच नव्हे तर विशेष विमानातही MIM चे माजी आमदार देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांसोबत दिसले होते. त्यामुळे राज्यात घडणारे दंगलीचे प्रकार हे भाजप आणि MIM चं स्क्रिप्ट आहे का याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

यापूर्वी राज ठाकरे काय म्हणाले होते?
भाजप सध्या राज्यात व देशात सत्तेत असले तरी पुन्हा सत्तेत येण्यासाठी ते देशात दंगली घडवून आणतील किंवा शेजारील राष्ट्रांसोबत छोटसं युद्धही छेडले जाईल असे भाकीत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी या पूर्वीच्या निवडणुकीच्या आधी वर्तविले होते. आपण वर्तवत असलेल्या भाकीताबाबत अधिक स्पष्टीकरण देताना राज यांनी दिल्लीतील एका भाजपच्या बड्या नेत्याने माझ्या भाकीताला दुजोरा दिल्याचेही सांगितले होते. गुलाम अली महान गायक आहेत.

नाशिक त्र्यंबकेश्वर मंदिर वादावर काय म्हटले होते राज ठाकरे यांनी?
महाराष्ट्रात अनेक मशिदी आणि मंदिरे आहेत. तिथे हिंदू-मुस्लिम एकत्र दिसतात. माहीमच्या दर्ग्यात माहीम पोलीस स्टेशनचा कॉन्स्टेबल चादर चढवतो. माझ्याकडे अशी अजून उदाहरण आहेत. ही परंपरा सुरू ठेवली पाहिजे. एखादा माणूस दर्ग्यात आला म्हणजे धर्म भ्रष्ट कसा होतो? इतका कमकुवत धर्म आहे का? अनेक मुसलमान मंदिरात येतात. आपल्याच मंदिरात काही जातींना मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊ देत नाही. मानसाची बघण्याची वृत्ती कोती आहे. छोटी आहे, अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती.

News Title : Kolhapur Crisis Politics of BJP and MIM social takes check details on 08 June 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Kolhapur Crisis(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या