15 November 2024 7:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News
x

बारसूमध्ये आंदोलक कोकणी माणसाविरोधात शिंदे-फडणवीस सरकारची दडपशाही, कोकणी महिलांवरही लाठीचार्ज आणि अश्रूधुराचा वापर

Konkan Barsu Refinery

Lathi Charge at Barsu | कोकणात शिंदे-फडणवीस सरकारची प्रचंड दडपशाही सुरु झाल्याचं पाहायला मिळतंय. शिंदे सरकारमधील शिंदे समर्थक कोकणातील मंत्र्यांना तर कोकणी लोकांच्या जीवाशी आणि निर्सार्गाशी काहीही देणं घेणंच नसल्याचं पाहायला मिळतंय. आज पुन्हा शिंदे सरकारच्या पोलिसांनी कोकणी आंदोलक जनतेवर लाठीचार्ज केल्याचं समोर आलं आहे.

आता बारसू रिफायनरी प्रोजेक्टचा वाद आणखी चिघळला आहे. सर्वेक्षण करण्यासाठी आलेले कर्मचारी आणि आंदोलक यांच्यामध्ये झटापट झाली, तसंच पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोपही केला जात आहे. दरम्यान, सकाळीच ठाकरे गटाचे स्थानिक खासदार विनायक राऊत यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

बारसू रिफानरी प्रकल्पासाठी मातीचे सर्वेक्षण सुरु असताना आता दुपारी मोठ्या प्रमाणावर आंदोलक सर्वेक्षणाच्या ठिकाणी दाखल झाले होते.यामध्ये महिला,पुरुष आणि तरूणांचा समावेश होता. पोलिस आणि आंदोलक एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे काही वेळापुर्वीचे दृष्य होते. या आंदोलकांना घटनास्थळावरून हटविण्यासाठी पोलीसांचा मोठा फौजफाटा देखील होता.या पोलिसांनी आंदोलकांना घटनास्थळावरून हटवण्यासाठी लाठीचार्ज आणि अश्रूधुरांचा वापर केला होता. या लाठीचार्ज आणि अश्रूधुरांच्या आंदोलकांवरील वापरानंतर वातावरण चांगलेच तापले होते.

ठाकरे गटाने स्थानिकांना पाठिंबा दर्शवला होता. त्यामुळे बारसू येथे आंदोलकांची भेट घेण्यासाठी निघालेल्या ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्यासह सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहेत. गेल्या अनेक तासांपासून राऊत आणि कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात आहेत. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशध्यक्ष, सोलापूर जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Konkan Barsu refinery women protesters were lathi charged by police check details on 28 April 2023.

हॅशटॅग्स

#Konkan Barsu Refinery(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x