23 November 2024 4:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती
x

बेंगळुरू मधील विरोधकांच्या बैठकीपुर्वीच उत्तर प्रदेशातून काँग्रेससाठी आनंदाची बातमी, अखिलेश यादव काँग्रेसप्रती नरमल्याचे वृत्त...कारण?

Lok Sabha Election 2023

Lok Sabha Election | समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव उत्तर प्रदेशातील बदलत्या राजकीय समीकरणांमुळे काँग्रेसप्रती नरमल्याचे वृत्त आहे. त्यांचा पक्ष विरोधी पक्षांच्या एकतेच्या दुसऱ्या फेरी पूर्वीच नरमल्याने बेंगळुरूमध्ये आयोजित बठकीपुर्वी काँग्रेसमध्ये अजून जोश झाल्याचं म्हटलं जातंय. पश्चिम उत्तर प्रदेशातील बहुतांश जागांवर प्रभाव असलेले राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष जयंत चौधरी यांच्या राजकीय निर्णयामुळे दबावाखाली आलेले अखिलेश यादव आता काँग्रेसला अधिक चांगल्या म्हणजेच लोकसभेच्या अधिक जागा देण्याच्या मानसिक स्थितीत आहेत अशी माहिती पुढे आली आहे.

यापूर्वी ममता बॅनर्जी यांच्या भूमिकेवरून अखिलेश यादव यांची भूमिका स्पष्ट होत होती. ममता बॅनर्जी आणि अखिलेश म्हणत होते की, राज्यात जो पक्ष मजबूत आहे, त्याला नेतृत्व करण्याची परवानगी दिली पाहिजे. म्हणजे उत्तर प्रदेशात सपा मजबूत असेल तर इथे सपाच आघाडी घेईल आणि भाजपला हटवायचे असेल तर काँग्रेसने उत्तर प्रदेशात जास्त जागा मागू नयेत, सपा जेवढी देईल तेवढी त्यांनी लढवावी असं त्यांचा हट्ट होता, मात्र आता परिस्थिती बदलल्याने काँग्रेसला अधिक फायदा झाला आहे.

पण अखिलेश यांच्या सपा आघाडीतील प्रभावी भागीदार असलेले रालोदप्रमुख जयंत चौधरी यांना २०२४ ची निवडणूक काँग्रेसशिवाय लढवायची नाही. जयंत चौधरी यांच्याशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे की, एकतर सपा-काँग्रेस-रालोद आणि इतर पक्षांनी या बाजूने राहावे अन्यथा भाजपशी हातमिळवणी करून एनडीएत सामील होण्याची त्यांना अमित शहा यांची खुली ऑफर आहे.

जयंत यांचा मूड आणि जयंत चौधरी एनडीएत सामील होण्याच्या अटकळांमुळे अखिलेश प्रचंड राजकीय दबावाखाली असल्याचं वृत्त आहे. अखिलेश यांना माहित आहे की, पश्चिम उत्तर प्रदेशात भाजपविरोधात एक जागा मिळविणे सपासाठी अवघड ठरू शकते. कर्नाटक निवडणुकीत मुस्लीम मते काँग्रेसकडे वळल्यामुळे जयंत चौधरी यांच्यासारख्या नेत्यांना काँग्रेसशिवाय विरोधकांची लढाई कमकुवत होईल, असे वाटायला भाग पाडले आहे. तसेच राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे देशभरातील अल्पसंख्यांक मतदार काँग्रेसकडे झुकल्याने नमतं घेणं भाग असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

२३ जून रोजी पाटण्यात झालेल्या विरोधी पक्षांच्या पहिल्या बैठकीपासून अखिलेश यांनी काँग्रेसवर हल्लाबोल करणे बंद केले आहे. ४ जुलै रोजी अयोध्येतही अखिलेश म्हणाले की, विरोधकांच्या ऐक्यासाठी काँग्रेस आणि इतर पक्षांशी बोलणी सुरू आहेत, सपा आणि मित्रपक्ष मिळून उत्तर प्रदेशात भाजपला पराभूत करतील. महाआघाडीतील अद्याप कोणताही फॉर्म्युला झालेला नाही, पण जो निर्णय होईल तो महाआघाडीतील सर्व पक्ष मान्य करतील, असे अखिलेश यांनी म्हटले होते.

उत्तर प्रदेशात कॉंग्रेस भले वाईट अवस्थेत पोहोचली असली, तरी सन्मानजनक जागा न मिळाल्यास महाआघाडीसाठी तयार होणार नाही. कारण उत्तर प्रदेशात देखील राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा प्रभाव पडल्याचं अनेक सर्व्हेत समोर आलं आहे. अखिलेश यांच्या पहिल्या भूमिकेवरून काँग्रेसला ५ जागा देऊन काम करून घ्यायचे आहे असे वाटत होते, पण काँग्रेसला सोबत घेऊन जाण्याच्या जयंत यांच्या ठाम भूमिकेमुळे अखिलेश आता काँग्रेसला १०-१५ जागा देण्याच्या मनःस्थितीत आहेत. म्हणूनच अखिलेश यांनी अशा ५० लोकसभेच्या जागा निवडल्या आहेत, ज्यावर सपा कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार आहे. यापैकी अनेक जागांवर अखिलेश यांनी उमेदवारांना मैदानात उतरण्याचे संकेतही दिले आहेत. अखिलेश यांनी आघाडीच्या चर्चेसाठी ३० जागा राखून ठेवल्या असून त्यात काँग्रेस, जयंत चौधरी, अपना दलाचा कृष्णा पटेल गट आणि इतर छोट्या पक्षांना सन्मानाने सामावून घेतले जाऊ शकते.

News Title : Lok Sabha Election 2023 Uttar Pradesh SP Political stand on congress 17 July 2023.

हॅशटॅग्स

#Lok Sabha Election 2023(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x