15 January 2025 4:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी
x

Loksabha Election | विरोधकांच्या ऐक्याला उत्तर देण्यासाठी भाजप हायकमांडचा 'प्लस प्लॅन', पण आपल्याच राजकीय कर्मात अडकले मोदी-शहा

Loksabha Election 2024

Loksabha Election | काँग्रेस, आप आणि टीएमसीसह सुमारे २० विरोधी पक्षांचे नेते २३ जून रोजी पाटण्यात एका व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपशी एकत्रितपणे लढण्यासाठी हे पक्ष एकमत तयार करण्यात गुंतले आहेत. मात्र, या विरोधी पक्षनेत्यांमध्ये एकमेकांबाबत वाद सुरू आहेत.

दुसरीकडे, 23 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेच्या दौऱ्यात लोकसभा निवडणुकीपूर्वी स्वतःचं मार्केटिंग करणार आहेत. याचा अर्थ असा नाही की, अलीकडच्या काळातील मोदीविरोधी सर्वात मोठ्या ऐक्याकडे भाजपची नजर नाही. विरोधकांच्या ऐक्याच्या संभाव्य परिणामांकडेही भाजप अजिबात दुर्लक्ष करत नाही. विरोधी पक्षांनी एकत्र येण्याचा प्रयत्न सुरू असताना भाजप हायकमांडही ‘प्लस प्लॅन’वर काम करत आहे.

एकीकडे विरोधक ऐक्यासाठी झटत असताना भाजपप्रणीत एनडीएमध्येही अशीच परिस्थिती आहे. भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत नुकतीच महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी पंतप्रधान मोदींच्या सूचनांचे पालन करण्यावर भर देण्यात आला. भाजपच्या प्रयत्नांचे परिणामही आता दिसू लागले आहेत.

आंध्र प्रदेश – बुडत्याला काठीचा आधार अशी भाजपाची स्थिती
आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यास केंद्राने नकार दिल्याने २०१८ मध्ये एनडीएतून बाहेर पडलेला चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील तेलुगू देसम पक्ष आता भाजपप्रणित आघाडीत परतण्याची योजना आखत आहे. मात्र आंध्र प्रदेशाच्या राजकारणात चंद्राबाबू नायडू यांचं राजकीय वजन घटलं आहे, पण बुडत्याला काठीचा आधार अशी भाजपाची स्थिती झाली आहे. तेलंगणा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चंद्राबाबू नायडू यांनी दिल्लीत भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. यावेळी युतीबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

बिहारच्या राजकारण नगण्य झालेल्या एलजेपी सोबत चर्चा
बिहार मधील असाच एक पक्ष म्हणजे लोकजनशक्ती पार्टी (चिराग पासवान यांचा गट). मात्र चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीची अवस्था राजकीय अवस्था अत्यंत दयनीय आहे. रामविलास पासवान यांनी 2000 मध्ये लोजपाची स्थापना केली होती. पासवान यांच्या निधनानंतर 2020 मध्ये चिराग आणि त्यांचे काका पशुपति पारस यांच्यात पक्षाच्या नैतृत्वावरून वाद झाला होता. अखेर 2021 मध्ये पशुपति पारस लोकसभेत लोजपाचे नेते म्हणून निवडून आले आणि ते मोदी मंत्रिमंडळात मंत्री झाले.

दरम्यान, गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये नितीश यांनी पुन्हा एकदा भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. जदयूने विरोधकांच्या महाआघाडीशी (राजद, काँग्रेस आणि डाव्या पक्षांव्यतिरिक्त इतर काही पक्ष) युती केल्यावर बिहारमध्ये परिस्थिती बदलू लागली. गेल्या वर्षी चिराग यांनी बिहारमधील मोकामा, कुऱ्हानी आणि गोपालगंज पोटनिवडणुकीसाठी भाजपसाठी प्रचार केला होता. पासवान यांनी दलित नेत्यांना मतभेद विसरून एनडीएला मजबूत करण्यास भाजपने सांगितल्याचे समजते. मात्र बिहारच्या राजकारणात नगण्य झालेल्या चिराग पासवान यांची भाजपसोबत गेल्याने उरली सुरली वोट बँक सुद्धा संपुष्टात येईल असं म्हटलं जातंय.

आम्ही नितीश यांच्याविरोधात बंड पुकारले
दरम्यान, नितीश कुमार यांचे मंत्री संतोष कुमार सुमन यांनी बिहार सरकारशी संबंध तोडले आहेत. वडिलांच्या हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे (एचएएम) जेडीयूमध्ये विलीनीकरण करण्यासाठी त्यांच्यावर दबाव होता, असे संतोष यांनी सांगितले. मात्र सीएम नीतीश कुमार म्हणाले संतोष कुमार निघून गेले ते बर झालं कारण असाही त्यांचा कल भाजपाकडे होता. तत्पूर्वी २०१५ मध्ये पक्षाचे संस्थापक जीतनराम मांझी यांनी जेडीयू सोडल्यानंतर ‘हम’ची स्थापना झाली होती. तेव्हापासून ते वारंवार पक्षबदल करत आहेत. बिहारमध्ये विश्वासहर्ता संपलेल्या अशा पक्षांना सोबत करण्याशिवाय भाजपकडे दुसरा पर्याय देखील नाही असं चित्र आहे.

News Title : Loksabha Election 2024 NDA alliance check details on 17 June 2023.

हॅशटॅग्स

#Loksabha Election 2024(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x