15 January 2025 4:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी
x

Loksabha Election 2024 | आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या एकजुटीसमोर एनडीए अत्यंत कमकुवत, भाजपचं मिशन 2024 फेल होणार

Loksabha Election 2024

Loksabha Election 2023 | विरोधकांची एकजूट आणि हिमाचल प्रदेश, कर्नाटकमधील निवडणुकीतील पराभवानंतर लोकसभा निवडणुकीसाठी एनडीए मजबूत करण्याचे आव्हान भाजपसमोर असणार आहे. देशात जवळपास डझनभर मोठी राज्ये अशी आहेत जिथे प्रादेशिक पक्षांचा राजकारणावर मोठा प्रभाव आहे आणि विशेष म्हणजे ते पक्ष निकाल ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात आणि त्यांच्याशिवाय सत्ता स्थापन करणं जवळपास अशक्य आहे.

एनडीएमध्ये जवळपास २८ छोटे-मोठे पक्ष असले तरी प्रभावी भूमिकेत आणि मोठ्या पक्षांमध्ये शिवसेना (शिंदे गट- असून नसल्यात जमा), अण्णाद्रमुक (जयललिता यांच्या निधनानंतर अत्यंत कमजोर झालाय), लोजपा आणि अपना दल हे दोन्ही गट काही खास ताकदीचे राहिलेले नाहीत. आगामी लोकसभेपूर्वीच भाजपने मित्र पक्षांना संपविण्याचा सत्तापिपासूपणा दाखवला जेडीयू, ठाकरे तसेच अकाली दल असे जुने मित्र पक्ष गमावले आहेत. त्यामुळे त्यांच्या पारंपरिक मतदारांशिवाय भाजप सत्तेत येणं अशक्य आहे.

देशातील प्रादेशिक पक्षांची भूमिका असलेल्या सुमारे डझनभर राज्यांमध्ये कर्नाटक, झारखंड, हरयाणा, पंजाब, पश्चिम बंगाल, बिहार, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिशा, महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश आणि दिल्ली यांचा समावेश आहे. दिल्ली सहित या राज्यांमध्ये असलेल्या ३९० जागांपैकी भाजपकडे केवळ १९० जागा आहेत. मात्र, गेल्या निवडणुकीत बिहारमध्ये जदयू, महाराष्ट्रात शिवसेना आणि पंजाबमध्ये अकाली दलासह भाजपने हे यश मिळवले होते. हे पक्ष आता विरोधी गटात आहेत. या तिन्ही राज्यांमध्ये भाजपने ४२ जागा जिंकल्या होत्या.मात्र आता ते भाजपने स्वतःच अशक्य करून ठेवलं आहे.

मजबूत भागीदार आणि प्रादेशिक समीकरणे प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जाईल
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीतील यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी भाजप एनडीएला मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे. पण मोदी-शहांचा मित्र पक्षांना संपविण्याचा इतिहास पाहता सर्वच प्रादेशिक पक्ष स्वतःच्या अस्तित्वासाठी भाजपाला दूर ठेवत आहेत. भाजपचा पण सर्वात मोठा अडथळा विरोधकांची एकजूट आहे. विरोधी आघाडी झाल्यास भाजपऐवजी ही प्रादेशिक आघाडीचं काँग्रेसच्या मदतीने सर्वाधिक जागा जिंकेल अशी भाजपाला भीती आहे.

शिवसेना (शिंदे गट) हा सध्या एनडीएतील सर्वात मोठा पक्ष असला तरी मतं ठाकरेंमुळेच मिळत होती याची भाजपाला जाणीव झाली आहे, उलट शिंदे जितका भाजपसोबत प्रचार करतील तेवढ्या अधिक जागा भाजप गमावले अशी भाजपाला भीती आहे. याशिवाय अपना दल, लोजपा, अण्णाद्रमुक, आरपीआय, आजसू, पीएमके हे पक्ष भाजासोबत असले तरी ते सुद्धा भाजपवर अवलंबून आहेत, पण त्यांचा भाजपाला काहीच उपयोग नाही अशी सत्य परिस्थती आहे.

आतापर्यंतचा सर्वात कमकुवत एनडीए
एकप्रकारे एनडीएच्या स्थापनेनंतरचा हा सर्वात कमकुवत पक्ष दिसतो, ज्यात भाजपशिवाय दुसरा कोणताही प्रभावी पक्ष एनडीए मध्ये दिसत नाही. शिवसेना शिंदे यांनी आपणच खरी शिवसेना आहोत हे अद्याप सिद्ध केलेले नाही आणि शिवसेना म्हणजे ठाकरे तर शिंदे हे केवळ ठाण्याचे आमदार एवढंच जमिनीवरील वास्तव आहे. एआयएडीएमके स्वबळावर संघर्ष करत असून इतर पक्ष भाजपवर अधिक अवलंबून आहेत. अशा तऱ्हेने २०२४ मध्ये संभाव्य विरोधी ऐक्यासह एनडीएला बळकटी देण्याचे आव्हान भाजपसमोर असेल, जेणेकरून राज्यांची समीकरणेही आखता येतील.

दक्षिणेत भाजपकडे स्थानिक नेतेच नाहीत
दक्षिनेतील कर्नाटकात (२८ जागा), तामिळनाडूत द्रमुक आणि अण्णाद्रमुक (३९ जागा), आंध्र प्रदेशात वायएसआरसीपी आणि तेलुगू देसम (२५ जागा), तेलंगणामध्ये बीआरएस (१७ जागा) या प्रमुख राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष मजबूत आहेत. इथे अण्णा द्रमुक फक्त तामिळनाडूत एनडीएमध्ये भाजपसोबत आहे. तामिळनाडू आणि आंध्रातील काही प्रादेशिक पक्षही एनडीएत असले तरी त्यांची ताकद राज्यभर नव्हे तर काही जागांपुरती मर्यादित आहे. अशा परिस्थितीत भाजपला या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी भक्कम मित्रपक्षाची गरज आहे. मात्र दक्षिणेतील राज्य स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणार नाहीत. तसेच दक्षिण भारतासह काही राज्यांमध्ये भाषेचीही मोठी अडचण असल्याने मोदी-शहांची अडचण होतं आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक मोदीशहांसाठी अत्यंत बिकट असल्याचं सध्याचं चित्र आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Loksabha Election 2024 NDA in week condition check details on 16 May 2023.

हॅशटॅग्स

#Loksabha Election 2024(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x