25 December 2024 7:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडियाचा पेनी शेअर अजून घसरणार, कंपनीबाबत अपडेट आली - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत महत्वाचे संकेत, तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: YESBANK Post Office Scheme | महिलांना भरघोस व्याज देणारी योजना, पहा 50,000, 100000, 150000 वर किती परतावा मिळेल Suzlon Share Price | सुझलॉन सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 93 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 4 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 57 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: TATAMOTORS Bonus Share News | 1 शेअरवर 4 फ्री बोनस मिळवा, कंपनीची घोषणा, 4 पटीने वाढवा संपत्ती, फायदा घ्या - NSE: GARFIBRES SBI Mutual Fund | फंड असावा तर असा, अनेक पटीने मिळेल परतावा, मार्ग श्रीमंतीचा आहे ही SBI फंडाची योजना
x

भाजपला मध्य प्रदेश निवडणुकीत मोठ्या पराभवाची भीती, विरोधकांचे आव्हान त्यात अंतर्गत कलह, केंद्रीय मंत्री ते खासदारांना आमदारकीचे तिकीट

Madhya Pradesh Assembly Election 2023

Madhya Pradesh Election 2023 | मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या ३९ उमेदवारांची दुसरी यादी सोमवारी जाहीर केली. केंद्रीय नेतृत्वाने अनेक दिग्गजांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्यानंतर यावर बरीच चर्चा सुरू आहे. त्यातून अनेक अर्थ काढले जात आहेत.

२०१८ मध्ये पराभवाला कारणीभूत ठरलेली अंतर्गत गटबाजी संपविण्याचा पक्षाचा प्रयत्न असल्याचे भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांचे मत आहे. तसेच विरोधकांचे आव्हान अत्यंत तंगड असून भाजपच्या सभांमध्ये खाली खुर्च्या दिसत आहेत, तर दुसरीकडे राहुल गांधी आणि प्रियांका गांधींच्या सभांना तुफान गर्दी होतं असल्याचं स्पष्ट दिसतंय. विशेष म्हणजे मध्य प्रदेश भाजपमधील अनेक विद्यमान आमदार तसेच दिग्गज नेत्यांचा काँग्रेस प्रवेशाचा सपाटा लागला आहे.

दोन दशकांच्या सत्ताविरोधी लहरीचा फायदा घेऊन सत्तेत येण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेससाठी दुसऱ्या यादीमुळे काहीच फरक पडल्याचं दिसत नसून उलट भाजपमध्येच कलह वाढल्याचं चित्र आहे. निवडणूक अवघड झाल्याचे भाजपच्या नेत्यांचे मत आहे. पहिल्या यादीमध्ये भाजपने 2018 मध्ये ज्या जागांवर पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले होते, त्या जागांवर उमेदवार जाहीर केले होते.

दुसऱ्या यादीतही प्रामुख्याने त्या जागांवर ‘केंद्रीय वॉरियर्स’ना मैदानात उतरवण्यात आले आहे, जे गेल्या वेळी जिंकले नव्हते. 39 उमेदवारांच्या यादीत 11 नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

केंद्रीय मंत्र्यांसह सात विद्यमान खासदारांना आमदारकी तिकीट देण्याची वेळ
मध्य प्रदेशच्या राजकारणात पहिल्यांदाच भाजप नेतृत्वाने तीन केंद्रीय मंत्र्यांसह सात विद्यमान खासदारांना विधानसभा निवडणुकीत रिंगणात उतरवले आहे. नरेंद्र सिंह तोमर, फग्गन सिंह कुलस्ते आणि प्रल्हाद पटेल यांना मोदी सरकारमध्ये तिकीट देण्यात आले आहे.

याशिवाय खासदार राकेश सिंह यांना गजबलपूरमधून, उदय प्रताप सिंह यांना गदरवारातून, रिती पाठक यांना सीधीतून आणि गणेश सिंह यांना सतना मधून निवडणूक लढवण्यास सांगण्यात आले आहे. ही यादी पाहिली तर पक्षानेही सिंधिया फॅक्टरवर विश्वास व्यक्त केल्याचे दिसून येते. सिंधिया यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या ३९ पैकी किमान ५ नावे आहेत.

News Title : Madhya Pradesh Assembly Election 2023 BJP in danger zone 26 September 2023.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x