5 February 2025 2:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Income Tax on Salary | नवीन टॅक्स प्रणालीनुसार 1,275,000 रुपयांचे पॅकेज आणि अतिरिक्त इन्सेन्टिव्ह वर किती टॅक्स लागेल Penny Stocks | वडापाव पेक्षा स्वस्त किंमतीचा पेनी शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SARVESHWAR Penny Stocks | श्रीमंत करणार हा स्वस्त शेअर, पाच दिवसांत 65 टक्के परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 51259 RVNL Share Price | रेल्वे शेअर्स तेजीत, RVNL शेअर फोकसमध्ये आला, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Post Office Scheme | महिना खर्च भागेल, दरमहा 9,250 रुपये देईल ही पोस्ट ऑफिस योजना, नक्की फायदा घ्या EPFO Passbook | खाजगी पगारदरांनो इकडे लक्ष द्या, EPF रक्कमेवर मिळणार अधिक व्याज, ईपीएफओ अपडेट जाणून घ्या IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, पटापट प्राईस बँड सह इतर डिटेल्स जाणून घ्या
x

भाजप खासदारांच्या देखील विजयाची शाश्वती नाही, भाजपचे असे प्रयोग आधीच फासल्याचा इतिहास, गुजरात लॉबीला नेमकी भीती कोणती?

Madhya Pradesh Assembly Election 2023

Madhya Pradesh Assembly Election 2023 | मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी काल जाहीर केली आहे. विधानसभेच्या ३९ जागांसाठी जाहीर झालेल्या उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत ३ केंद्रीय मंत्र्यांसह ७ खासदारांना तिकीट देण्यात आले आहे.

मुरैनाच्या डिमनी मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, सतना मधून गणेश सिंह, सीधीतून रिती पाठक, जबलपूर पश्चिममधून राकेश सिंह, गडरवारा मधून उदय प्रताप सिंह, नरसिंहपूरमधून केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल आणि निवास मतदारसंघातून केंद्रीय मंत्री फग्गन सिंह कुलस्ते यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.

ही पहिलीच वेळ नाही
ही पहिलीच वेळ नसली तरी याआधीही भाजपने विधानसभा निवडणुकीत हा फॉर्म्युला आजमावला आहे. 2021 च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपने आपले पाच विद्यमान लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार उभे केले होते. पण भाजपचे दोनच खासदार जगन्नाथ सरकार आणि निसिथ प्रमाणिक यांना आपापल्या मतदारसंघात विजय मिळवता आला. अन्य खासदार स्वपन दासगुप्ता, लॉकेट चॅटर्जी आणि बाबुल सुप्रियो पराभूत झाले.

केरळमध्ये त्रिशूरमधून निवडणूक लढवणारे अभिनेते आणि तत्कालीन राज्यसभेचे खासदार सुरेश गोपी यांना मैदानात उतरविण्यात आलं पण अंतिम मतमोजणीत ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. त्याचप्रमाणे तत्कालीन राज्यसभेचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री केजे अल्फोन्स कांजिरापल्ली मतदारसंघातून निवडणूक हरले होते.

त्यामुळे भाजपने टाकलेला डाव जिंकण्यासाठी नव्हे तर मध्य प्रदेशातील निवडणुकीत स्वतःची राजकीय लाज राखण्यासाठी केलेली धडपड असल्याचं म्हटलं जातंय. तसेच पराभव होतं असला तरी पराभवांनंतर या प्रमुख राज्यांमध्ये गुजरात लॉबीला स्वतःचे राजकीय समर्थक हवे असल्याचं म्हटलं जातंय आणि त्याचाच भाग म्हणून मोदी विरोधी गटातील म्हणजे शिवराज सिहं चौहान आणि वसुंधराराजे या मात्तबर नेत्यांचं राजकीय आयुष्य संपुष्टात आणण्याची रणनीती देखील गुजरात लॉबीने खेळल्याचे म्हटलं जातंय. तसेच सत्ताविरोधी लाटेचा मुद्दा महत्वाचा करून गुजरात लॉबीने भाजपचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले शिवराजसिंह चौहान यांना अद्याप उमेदवारी देण्यात आलेली नाही.

यापूर्वी उत्तर प्रदशातही प्रयोग फसला
त्याचप्रमाणे 2022 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने कऱ्हाल या हायप्रोफाईल मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याविरोधात केंद्रीय राज्यमंत्री एस. पी. सिंह बघेल यांना उमेदवारी दिली होती. अखिलेश यादव यांनी बघेल यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. निवडून आलेल्या खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री असूनही भाजपने प्रतिमा भौमिक यांना त्रिपुरातून निवडणूक लढविण्याची परवानगी दिली. त्यांनी धनपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जिंकले.

News Title : Madhya Pradesh Assembly Election 2023 BJP Politics 27 September 2023.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x