14 January 2025 6:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर तेजीत, रेलिगेअर ब्रोकिंग फर्मने दिले फायद्याचे संकेत - NSE: NTPCGREEN Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरवर मिरे अ‍ॅसेट कॅपिटल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर प्राईस 13 महिन्यांतील नीचांकी पातळीवर, आता जेपी मॉर्गन ब्रोकरेज बुलिश - NSE: TATASTEEL Income Tax Notice | बँक अकाउंटमध्ये चुकूनही 'या' 5 प्रकारचे ट्रान्झॅक्शन करू नका, इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा
x

Madhya Pradesh BJP | आरएसएस'च्या सर्व्हेमुळे भाजपमध्ये हाहाकार, मध्य प्रदेशात काँग्रेसला मोठं बहुमत, भाजपला 55 पेक्षा कमी जागा मिळणार

Madhya Pradesh BJP

Madhya Pradesh BJP | मध्य प्रदेशात या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकीपूर्वी अनेक सर्व्हे समोर आले आहेत. मात्र आता RSS च्या सर्व्हेतील आकड्याने भाजप पूर्णपणे हादरली आहे असं म्हटलं जातंय, ज्यात राज्यात काँग्रेसचे सरकार मोठ्या बहुमताने स्थापन होताना दिसत आहे. तर भाजप 55 पेक्षा कमी जागांवर घसरेल असं या सर्व्हेत म्हटले आहे. २०१८ मध्ये काँग्रेसचा १५ महिन्यांचा कार्यकाळ असून कमलनाथ यांच्यासारख्या निर्विवाद आणि अनुभवी नेत्याचा पाठिंबा आहे. याबाबत ते जनतेपर्यंत पोहोचत आहेत. विशेष म्हणजे एकाबाजूला काँग्रेसचा स्थानिक पातळीवर प्रचार सुरु झाला असताना भाजपात प्रचंड गटबाजी उफाळून आली आहे, तर अनेक मोठे भाजप नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत.

भाजपवर १८ वर्षांची जबाबदारी आणि अपूर्ण घोषणा आहेत, ज्याने सत्ताविरोधी लाटेचे रूप धारण केले आहे. मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2023 संदर्भात गेल्या 5 महिन्यांत 6 वेगवेगळे सर्व्हे समोर आले आहेत. सर्वच सर्व्हेमध्ये भाजपच्या जागा सातत्याने कमी होत आहेत. इतकंच नाही तर भाजपच्या सर्वेक्षणातही पक्षाचा दारुण पराभव होत आहे असे संकेत मिळाले आहेत. हे सर्वेक्षण आल्यानंतर मध्य प्रदेश भाजपमध्ये खळबळ उडाली असून भाजपच्या ६० टक्के आमदारांची तिकिटे कापण्यात यावीत, असेही सुचविण्यात आले आहे.

पाहुयात आतापर्यंतचे 6 सर्व्हे :

जानेवारी २०२३
संघाचा एक सर्व्हे सोशल मीडियावर व्हायरल झाला ज्यात भाजपचा मोठा पराभव होणार असे संकेत मिळेल आहेत.

फेब्रुवारी 2023
काँग्रेसच्या अधिकृत सर्व्हेनुसार भाजप ९५ जागांवर घसरल्याचे दिसून आले होते.

मार्च 2023
मध्य प्रदेश गुप्तवार्ता सर्वेक्षण लीक झाले होते, ज्यात भाजपला ८० पेक्षा कमी जागा मिळतील असे संकेत मिळाले होते.

एप्रिल 2023
दैनिक भास्कर आणि ईएमएससह अनेक वृत्तसमूहांनी केलेले सर्वेक्षण प्रशासकीय वर्तुळात व्हायरल झाले आणि त्यात भाजप ७० जागांवर घसरेल असे संकेत मिळाले आहेत.

मे 2023
एके मोठ्या स्थानिक ऑनलाइन डिजिटल प्लॅटफॉर्मवर एक सर्वेक्षण करण्यात आले, ज्यात भाजपला केवळ ६५ जागा मिळतील असे दिसले होते.

जून 2023
नवभारत समाचारने एक सर्व्हे प्रसिद्ध केला असून त्यात भाजप केवळ ५५ जागा मिळतील आणि काँग्रेस मोठ्या फरकाने सत्तेत येईल असे म्हटले होते.

वरील सर्व सर्वेक्षणांचा कल पाहता काँग्रेस झपाट्याने जोर पकडत असून जनतेचा आवाज बनत असल्याचे दिसून येते. त्याचवेळी भाजपची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. म्हणजेच यावेळी भाजप ५० पेक्षा कमी जागांवर घसरणार हे स्पष्ट झाले आहे.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Madhya Pradesh BJP RSS Survey for upcoming assembly election check details on 06 June 2023.

हॅशटॅग्स

#Madhya Pradesh BJP(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x