राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मराठी जनता आणि मराठी पत्रकार देखील संताप व्यक्त करताना एकवटले
राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या मुंबईबद्दलच्या विधानानंतर राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत. विविध राजकीय पक्षातील नेते आपल्या प्रतिक्रिया देत आहे. यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजपचे नेत्यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कारण आमदार नितेश राणे, विधान परिषद आमदार प्रसाद लाड यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप आमदार आशिष शेलार यांनी असहमत असल्याचे म्हटले आहे.
राज्यपालांच्या समर्थनार्थ काय म्हणाले नितेश राणे :
राज्यपालांचे समर्थन करत नितेश राणेंनी ट्विट केले होते. ”राज्यपालांकडून कोणाचा ही अपमान झालेला नाही. त्यांनी फक्त त्या-त्या समाजाला त्यांच्या योगदानाचे श्रेय दिले आहे. कालच्या कार्यक्रमाला मी स्वतः होतो आणि इतर लोक प्रतिनिधी उपस्थित होते. राजस्थान, गुजराती समाज त्या ठिकानी होता, त्या ठिकाणी जे भाषण केले त्यात अपमान झाला असता तर आम्ही गप्प बसलो असतो का?” असे नितेश राणे म्हणाले.
प्रसाद लाड काय म्हणाले :
प्रसाद लाड यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते म्हणाले ”राज्यपालांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला आहे. ज्याला घरात ठेवायचं का बाहेर काढायचं उद्धव ठाकरे यांना अधिकार नाही त्यांनी राज्यपालांचा मान ठेवला नाही असे म्हणत प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरेंवरती टीका केली आहे.
राज्यपालांच्या वक्तव्यावर आशिष शेलारांचं स्पष्टीकरण :
भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी ट्विट करत राज्यपालांच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचे सांगितले आहे. शेलार आपल्या ट्विटमध्ये म्हणाले ”राज्यपाल महोदयांनी केलेल्या वक्तव्याशी आम्ही अजिबात सहमत नाही. महाराष्ट्र आणि मुंबई मराठी माणसाच्या परिश्रमातून, घामातून आणि हौतात्म्यातून उभी राहीली आहे. आमचा तेजस्वी इतिहास पानोपानी हेच सांगतो. त्याला कुणीही कुठल्याही पदावरून नख लावण्याचा प्रयत्न करु नये!’
सर्व अनुभवी मराठी पत्रकार देखील समाज माध्यमांवर एकवटले :
106 हुतात्मे देऊन मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र हा मराठी माणसाने शिवसेना स्थापन होण्याच्या सहा वर्ष आधी मिळवलाय. त्यामुळे महाराष्ट्राची अस्मिता ऊपजत आहे. कोणी शिकवलेली नाही.तिची परीक्षा नका बघु.
— Raju Parulekar (@rajuparulekar) July 30, 2022
राज्यपाल भगतसिंह कोशियारी महात्मा फुले- सावित्रीबाईंबद्दल बोलताना, आत्ता मुंबई बद्दल बोलताना ज्या पद्धतीने हसत होते.. हे हास्य नीट ओळखा.
खूप सनातनी हास्य आहे ते, हजारो वर्षांचं आहे.
— Prashant Kadam (@_prashantkadam) July 30, 2022
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी जोवर महाराष्ट्र व मराठी जनतेची जाहीर माफी मागत नाहीत किंवा केंद्र सरकार त्यांना हटवत नाही तोवर शिंदे गटाच्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेणार नाही,असे जाहीर करावे! नाही तर या आमदारांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्याचा अधिकार गमावलेला असेल!
— ASHISH JADHAO आशिष जाधव 🇮🇳 (@ashish_jadhao) July 30, 2022
गुजराती-मारवाड्यांचा बराचसा पैसा हा खोटेपणाचा, टॅक्सचोरीचा, शोषणाचा आहे. मराठी माणसाच्या व इतर श्रमजीवी स्थलांतरीतांच्या जीवावर गुजराती-मारवाडी गब्बर झाले. अस्मिता असणं चुकीचं नाही पण ती राक्षसी असू नये.
— Ravindra Ambekar (@RavindraAmbekar) July 30, 2022
महामहीम राज्यपाल महोदय,
आमच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नजरेतून मुंबई पाहा
“मुंबईत उंचावरी,
मलबार हिल इंद्रपुरी,
कुबेराची वस्ती तिथं सुख भोगती,
परळात राहणारे,
रातदिवस राबणारे,
मिळेल ते खाऊन घाम गाळती”साहेब,फक्त घामच नाही #मुंबई साठी स्वतचं रक्तही सांडलयं #मराठी माणसाने! pic.twitter.com/qZXIZsZ7ZR
— Kamlesh Sutar (@kamleshsutar) July 29, 2022
महाराष्ट्राच्या, मुंबईच्या अस्मितेचे वारंवार दाखले देणारे मुख्यमंत्री @mieknathshinde सर आणि DCM @Dev_Fadnavis सर राज्यपाल महोदयांच्या गुजराती, राजस्थानीबद्दलच्या वक्तव्याशी नक्कीच सहमत नसतील. मराठी माणसाचा एवढा उघड अपमान ते सहन करून घेणार नाहीत.
ते यावर बोलतील अशी अपेक्षा आहे
— Nilesh Zalte (@nilzalte) July 30, 2022
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari controversial statement check details 30 July 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON
- Post Office Scheme | पोस्टाच्या या योजनेतून मिळेल चांगलाच फायदा, प्रत्येक महिन्याला मिळतील 9,250 रुपये - Marathi News