17 April 2025 12:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

ग्रामपंचायत निवडणुकीत ती मतं एकनाथ शिंदे या चेहऱ्याला नव्हे | तर मतदारांच्या पारंपारीक धनुष्यबाण चिन्हाला व स्थानिक उमेदवाराला

Maharashtra Gram Panchayat Election 2022

CM Eknath Shinde | २१ जून २०२२ ला शिवसेनेत सर्वात मोठं बंड झालं. एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी शिवसेनेच्या नेतृत्वाविरोधात अर्थात उद्धव ठाकरेंच्या विरोधात हे बंड पुकारलं आहे. शिवसेनेला बंडाळी होणं हे काही नवं नाही. मात्र एकनाथ शिंदे यांचं बंड सर्वार्थाने वेगळं ठरलं कारण शिवसेना सत्तेत असताना हे बंड झालं. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं. ३० जूनला एकनाथ शिंदे हे भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले. त्यानंतर राज्यातील मोजक्या ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या आहेत.

भाजप – 80 पेक्षा जास्त ग्रामपंचायतींवर विजय
राष्ट्रवादी काँग्रेस – 50 पेक्षा जास्त ग्रामपंचायतींवर विजय
शिंदे गट – 40 ग्रामपंचायत ताब्यात
शिवसेना (उद्धव ठाकरे) – 27 ग्रामपंचायतींवर विजय
काँग्रेस – 22 ग्रामपंचायत ताब्यात

शिंदे मुख्यमंत्री होऊनही भाजपनंतर राष्ट्रवादी मोठा पक्ष :
शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊनही आपण निवडणुकीत चौथ्या क्रमांकावर गेल्याचा आरोप शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला होता. तसेच राष्ट्रवादी वाढत असल्याचा दुहेरी आरोप सुद्धा त्यांनी केला होता. मात्र शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर आणि जवळपास ७० टक्के शिवसेना (आमदार, खासदार, पदाधिकारी) आपल्याकडे खेचल्यानंतरही मूळ शिवसेना (उद्धव ठाकरे) चौथ्या क्रमांकावरच आहे आणि राष्ट्रवादी पक्ष द्वितीय म्हणजे शिंदे गटाच्या वरच्या क्रमांकावर आहे. त्यामुळे शिंदे यांच्या फुटीर गटामुळे शिवसेनेच्या एकूण जागा ५७ (शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना मिळून) झाल्या असत्या आणि पक्ष द्वितीय क्रमांकावर गेला असता असं राजकीय तज्ज्ञ सांगतात. तसेच शिवसेनेतील फुटीने राष्ट्रवादीला काहीच फरक पडला नसला तरी (शिंदेंच्या आरोपाच्या उलट) भाजपाला मात्र या वादाचा फायदा झाल्याचं स्पष्ट होतंय.

धनुष्यबाणाशिवाय लढल्यास ०४ जागांची खात्री देणं अवघड होईल :
एकनाथ शिंदे यांना सुद्धा धनुष्यबाण या चिन्हाचं महत्व पहिल्यापासून माहिती असल्याने ते बंड केल्यापासून आम्हीच खरी शिवसेना या दाव्याला खिळून राहिले आहेत. एकनाथ शिंदे हे राज्यातील जनतेचा राजकीय दृष्ट्या आकर्षित करणारा चेहरा नव्हे हे वास्तव आहे. त्यामुळे त्यांना राजकारणात टिकून राहायचे असल्यास धनुष्यबाण चिन्हं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठीच ते स्वतःचा गट म्हणजेच खरी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ते ‘गट’ म्हणून भासवत आहेत. त्यांच्या आजच्या ट्विटमध्ये त्यांनी तो प्रयत्न केला आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत चिन्हं आणि स्थानिक उमेदवाराला मतदान होतं :
ग्रामपंचायत निवडणुकीत कोणताही उमेदवार कोणत्या पक्षाच्या चिन्हावर आणि स्थानिक उमेदवार कोण आहे यावर मतदान होतं. महाराष्ट्रात भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना याच 4 प्रमुख पक्षांची चिन्हं ही पारंपरिक मतदारांच्या नजरेसमोर असतात. मात्र जेथे अपक्ष निवडून येतो तेथे उमेदवार महत्वाचा ठरतो आणि त्यामुळेच या ग्रामपंचायत निवडणुकीत ४७ अपक्ष निवडून आले आहेत. त्यामुळे मतदारांनी ते मतदान शिंदेंना नव्हे तर धनुष्यबाण या चिन्हाला आणि स्थानिक उमेदवाराला पाहून केलं आहे असं राजकीय विश्लेषक सांगतात. त्यामुळेच सुप्रीम कोर्टाच्या ‘पक्ष बाजूला ठेवून विचार केल्यास ते लोकशाहीला घातक ठरेल’ या विधानानंतर शिंदेंना प्रचंड थकवा जाणवू लागला होता असं म्हटलं जातंय.

एकनाथ शिंदे शिवसेना ताब्यात घेण्याच्या तयारीत :
एकनाथ शिंदे यांची शिवसेना ताब्यात घेण्याची तयारी सुरू आहे असंच दिसतं आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे लोकसभेतले १२ खासदारही शिंदे गटासोबत आले आहेत. तसंच कल्याण डोंबिवली, नवी मुंबई आणि ठाणे इथल्या माजी नगरसेवकांनीही शिंदे गटात जाणं पसंत केलं आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढे घेऊन जात आहोत त्यामुळे आम्हीच खरी शिवसेना आहोत हा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. आता तर त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत जे यश मिळालं त्याबाबत उमेदवारांचं अभिनंदन करत असताना उद्धव ठाकरेंचा गट असा उल्लेख केला आहे. त्यामुळे मूळ कारण वेगळं असताना ते बरोबर संधीचा फायदा घेत आपल्याला मतदारांनी स्वीकारल्याचा राजकीय आव आणत आहेत अशी चर्चा सुरु झाली आहे

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Maharashtra Gram Panchayat Election 2022 check details 06 August 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या