18 November 2024 3:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

हिंसाचाराचे संकट तीव्र होणार? मणिपूरप्रमाणे संपूर्ण ईशान्य भारतात लाव्हा भडकतोय, मिझोराम आणि आसाममध्ये वातावरण तापलं

Manipur Effect

Manipur Effect in Northeast | दोन महिन्यांहून अधिक काळ पेटलेली मणिपूरमधील आग अद्याप ही आटोक्यात आलेली नाही. दरम्यान, ही आग विझवण्याचे प्रयत्न झाले नाहीत, तर ईशान्य भारतातील इतर भागातही ही आग पसरेल, असा इशारा आता तज्ज्ञांकडून दिला जात आहे. ३ मेपासून मणिपूरमधील कुकू आणि मैतेई यांच्यात सातत्याने हिंसक संघर्ष सुरू आहे. सुमारे १५० जणांना आपला जीव गमवावा लागल्याचे सरकारी आकडेवारी सांगते, पण वास्तविक आकडा मोठा असल्याचं म्हटलं जातंय.

मिझोराममध्ये नेमकं काय घडतंय?
मिझोराममध्ये मैतेई समाजातील लोक मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होऊ लागले आहेत. वास्तविक, माजी नक्षली संघटनेच्या वतीने एक अॅडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शनिवारपासून मिझोराममधून एक हजारांहून अधिक मैतेई आसामच्या बराक खोऱ्यात दाखल झाले आहेत.

आसाममध्येही कारवाईची प्रतिक्रिया
आसाम सरकारने कछार येथे मदत छावण्या उभारल्या आहेत. जिल्हा प्रशासनाबरोबरच स्थानिक नागरिकही येथे सुरक्षा पुरवत आहेत. आता ऑल आसाम मणिपुरी स्टुडंट्स युनियननेही (एएएमएसयू) सोमवारी एक सल्ला जारी केला आहे, ज्यामध्ये बराक खोऱ्यातील जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या मिझो लोकांना हे ठिकाण सोडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, एएएमएसयूने म्हटले आहे की, “मिझोराममध्ये राहणारे बहुतेक मैतेई आसाममधील आहेत. अशा तऱ्हेने मिझोरामच्या या वागण्यामुळे आसाममधील मैतेई समाजाचा संताप वाढला आहे. त्यामुळे आम्ही मिझो लोकांना स्वतःच्या सुरक्षेसाठी बराक खोरे लवकरात लवकर रिकामे करण्याचा सल्ला देतो. ‘

मणिपूर : महिलेला नग्न अवस्थेत नेल्याप्रकरणी आणखी एकाला अटक
मणिपूरमध्ये दोन महिलांना नग्न अवस्थेत नेल्याप्रकरणी पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली. १९ जुलै रोजी या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला सोमवारी सायंकाळी थौबल जिल्ह्यातून अटक करण्यात आली.

या प्रकरणी आतापर्यंत एकूण सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. ४ मे रोजी दोन आदिवासी महिलांना नग्न करण्याच्या कृत्यात सहभागी असलेल्या १४ जणांची ओळख पोलिसांनी सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या व्हिडिओवरून केली होती.

News Title : Manipur Effect in Northeast check details on 25 July 2023.

हॅशटॅग्स

#Manipur Effect(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x