14 January 2025 6:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर तेजीत, रेलिगेअर ब्रोकिंग फर्मने दिले फायद्याचे संकेत - NSE: NTPCGREEN Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरवर मिरे अ‍ॅसेट कॅपिटल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर प्राईस 13 महिन्यांतील नीचांकी पातळीवर, आता जेपी मॉर्गन ब्रोकरेज बुलिश - NSE: TATASTEEL Income Tax Notice | बँक अकाउंटमध्ये चुकूनही 'या' 5 प्रकारचे ट्रान्झॅक्शन करू नका, इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा
x

VIDEO | मणिपूर हिंसाचार! मोदींच्या 'मन की बात' वरून घरातील रेडिओ तोडल्यानंतर आता जनतेकडून भाजपचे झेंडे जाळण्यास सुरुवात

Manipur violence

Manipur Women Case | हिंसाचारग्रस्त ईशान्येकडील मणिपूर राज्यातून एक हृदयद्रावक व्हिडिओ समोर आला आहे. शेकडो लोकांचा जमाव रस्त्यावर दोन आदिवासी महिलांना नग्न अवस्थेत फिरवल्याचं दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून देशभरातून लोक संतप्त झाले असून प्रशासनाकडून कठोर शिक्षेची मागणी केली जात आहे. सर्वत्र नग्न परेड केल्यानंतर शेजारच्या शेतात या दोन महिलांवर जमावाने सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप एका स्थानिक आदिवासी संघटनेने केला आहे. इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरमने (आयटीएलएफ) दिलेल्या निवेदनानुसार, राज्याची राजधानी इंफाळपासून सुमारे 35 किमी अंतरावर असलेल्या कांगपोकपी जिल्ह्यात 4 मे रोजी ही घटना घडली.

तीन महिन्यांपासून हिंसाचाराच्या आगीत मणिपूर जळतंय

कॅमेऱ्यात कैद झालेली ही भीषण घटना मणिपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचाराच्या दरम्यान घडली आहे. मैतेईंच्या अनुसूचित जमातीच्या (एसटी) दर्जाच्या मागणीवरून खोऱ्यातील बहुसंख्य मैतेई आणि डोंगरीबहुल कुकी जमातीत संघर्ष झाला होता. तेव्हापासून आतापर्यंत १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून हजारो लोक विस्थापित झाले आहेत.

मणिपूरच्या जनतेकडून भाजपचे झेंडे जाळण्यास सुरुवात

पंतप्रधान मोदींच्या मन की बात कार्यक्रमाच्या १०२ व्या भागाच्या प्रसारणादरम्यान मणिपूरमध्ये रेडिओ निदर्शने करण्यात आली होती. त्यावेळी आणीबाणीचा उल्लेख करत मोदी म्हणाले की, भारत लोकशाहीची जननी आहे, परंतु त्यांनी मणिपूरच्या हिंसाचाराचा कोणताही उल्लेख केला नव्हता. भाजपाची मणिपूर आणि देशात सत्ता असताना मोदींनी तब्बल तीन महिने यावर चाकर शब्द काढला नव्हता.

तसेच महिलांनी हायवेच्या दोन्ही बाजूला उभे राहून मोदी आणि सत्ताधारी भाजपविरोधात घोषणाबाजी केली होती. त्यांनी ‘मन की बात’ला आमचा विरोध आहे, असे लिहिलेले पोस्टर्स दाखवले; ‘मोदी साहेब, तुमची लाज वाटते. मन की बातमध्ये मणिपूरचा एकही शब्द नाही”; ‘मन की बात ला नाही, मणिपूर की बातला महत्व द्या’ आणि ‘मिस्टर पीएम मोदी, आता मन की बात ही नाटक बंद करा’ असे पोष्टर्स सर्वत्र झळकले होते. आता दोन आदिवासी महिलांना नग्न करून त्यांची धिंड काढून नंतर जमावाने शेतात त्यांच्यावर बलात्काराची घटना घडल्यानंतर मणिपूरमध्ये जागोजागी भाजप पक्षाचे झेंडे जाळण्यास सुरुवात झाली आहे.

नरेंद्र मोदी इस्तीफा दो! सोशल मीडियावर तुफान ट्रेंड

दरम्यान, या भीषण घटनेनंतर संपूर्ण देशभरात “बीजेपी हटाओ आदिवासी बचाओ” आणि “नरेंद्र मोदी इस्तीफा दो!” सोशल मीडियावर तुफान ट्रेंड करत असून नेटिझन्समध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणावर व्हिडिओ शेअर करून मोदी सरकारप्रति स्वतःचा संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. सुप्रीम कोर्टाच्या अल्टिमेटम नंतर आणि देशभर रोष उमटल्याचे पाहून अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी ३ महिन्यांहून अधिक काळाले बोलल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील जोर धरू लागली आहे. विशेष म्हणजे गोडी मीडिया यावर तोंड बंद करून बसल्याने जनतेचा संताप असून शिगेला पोहोचला आहे.

News Title : Manipur violence peoples are throwing BJP Flag in fire check details on 20 July 2023.

हॅशटॅग्स

#Manipur BJP Flag(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x