15 January 2025 2:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN
x

भाजपाची डोकेदुखी वाढली | सिसोदियांवरील CBI कारवाई, केजरीवाल यांच्या थेट गुजरातमध्ये पत्रकार परिषदा आणि सभा

Manish Sisodia

Gujarat Assembly Election 2022 | दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा भाजप आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. गुजरातला पोहोचलेल्या अरविंद केजरीवाल यांनी मनीष सिसोदिया यांच्याबद्दल सांगितलं की, दिल्लीच्या शिक्षणात सुधारणा करण्यासाठी ज्या व्यक्तीने एवढं काम केलं, त्या व्यक्तीवर सीबीआयकडून धाडी टाकण्यात येत आहेत, तर त्याला भारतरत्न मिळायला हवा. अरविंद केजरीवाल म्हणाले की, देशाच्या शिक्षणासाठी मनीष सिसोदियांसारख्या लोकांची गरज आहे.

प्रचारासाठी गुजरातमध्ये दाखल झालेल्या अरविंद केजरीवाल यांनी मनीष सिसोदिया यांची बाजू मांडताना म्हटलं की, मनीष सिसोदिया यांनी दिल्लीच्या शाळा पूर्णपणे बदलल्या. ही अशी गोष्ट आहे जी ७० वर्षांतही कोणताही पक्ष करू शकला नाही. अशा व्यक्तीला भारतरत्न मिळाला पाहिजे. संपूर्ण देशाच्या शिक्षणाची कमान मनीष सिसोदिया यांच्याकडे सोपवली पाहिजे. जेणेकरून शिक्षणपद्धतीत बदल होऊन देशाचा फायदा होईल. कारण त्यांनी दिल्लीत काय केलं, याकडे साऱ्या जगाचं लक्ष आहे.

यानंतरही त्यांच्यावर ईडी आणि सीबीआयचा वापर केला जात आहे. अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी गुजरातच्या विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहेत. गुजरातमध्ये भाजपला पराभूत करण्याची क्षमता आम आदमी पक्षाकडे आहे, त्यामुळेच सीबीआयचा छापा टाकला जात असल्याचा अरविंद केजरीवाल यांचा दावा आहे.

कथित दारू घोटाळ्याप्रकरणी मनीष सिसोदिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआयने मनीष सिसोदिया आणि इतर १५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणावरून भाजप आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल करत आहे. ही बाब आता चांगलीच चिघळत चालली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Manish Sisodia should get Bharat Ratna but they conducted CBI raids on him see details 22 August 2022.

हॅशटॅग्स

#Manish Sisodia(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x