21 February 2025 3:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा कंपनी शेअर तेजीत, यापूर्वी 310% परतावा दिला - NSE: GTLINFRA IREDA Share Price | इरेडा शेअरमध्ये तुफान तेजी, अप्पर सर्किट हिट, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA TATA Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्समध्ये मजबूत तेजीचे संकेत, 89% कमाई होईल - NSE: TATAMOTORS Yes Bank Share Price | येस बँक शेअर ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, पुढे किती घसरणार स्टॉक - NSE: YESBANK EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी खुशखबर, आता UPI ने झटपट EPF चे पैसे काढता येणार, अपडेट जाणून घ्या Mutual Fund SIP | पगारदारांनो, 3, 4 आणि 5 हजारांची मासिक SIP सुरू करून 2.5 कोटींचा परतावा मिळवा, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा Business Idea | घरबसल्या होईल लाखोंची कमाई, या व्यवसायातून महिन्याला कमवाल हजारो रुपये, इथे जाणून घ्या योग्य माहिती
x

मनोज जरांगे पाटील यांची धडाकेबाज पत्रकार परिषद, मराठा समाज फडणवीसांना लक्ष करण्याची शक्यता, काड्या करणारा उपमुख्यमंत्री कोण?

Manoj Jarange Maratha morcha

Maratha Reservation | शांततेत सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला काही ठिकाणी गालबोट लागलं. विशेषतः बीडसह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात हिंसेचा भडका उडाला. आमदार, लोकप्रतिनिधींची घरं, कार्यालये आणि वाहने जाळण्यात आली. गृहविभागाने अनेकांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांची धडाकेबाज पत्रकार परिषद पार पडली. यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या काही विधानांवरून मराठा समाज फडणवीसांवर तुटून पडण्याची शक्यता वर्तविण्यात येतं आहे. तसेच राज्यातील तो ‘एक काड्या करणारा उपमुख्यमंत्री कोण?’ याची देखील चर्चा सुरु झाली आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना मी स्पष्टपणे सांगितलं होतं, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे. पण त्यांनी असा कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे मराठा समाज हे अर्धवट प्रमाणपत्र घेणार नाही. पण आणखी अन्याय सहन करणार नाही.

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे आणि ओबीसीमध्ये सामील करावे, बीडची संचारबंदी मागे घ्या, एकाही मराठा तरुणावर गुन्हा दाखल होता कामा नये अन्यथा उद्यापासून माझं पाणी बंद करेन, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

पण जर उद्या दिवसभरात किंवा आज रात्री ठोस निर्णय घेतला नाही, तर उद्या पाणी बंद करणार आहे. सरकारला अंदाज आहे, त्यांना माहिती आहे सगळं, त्यांनी वर्षांनुवर्ष अन्याय केला आहे. आणखी अन्याय सहन करणार नाही. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे आणि ओबीसीमध्ये सामील करावे, अन्यथा उद्यापासून माझं पाणी बंद करेन.

बीडमध्ये कुणी काय केलं, हे आम्हाला माहिती नाही. पण तुमचे जिल्हाधिकारी आणि बीडच्या एसपींना सांगतोय, त्यांना तातडीने हटवा. आंदोलन आधी आहे, नंतर तुमची संचारबंदी आहे. संचारबंदी बाजूला ठेवा, एखाद्या पोरावर गुन्हा दाखल केला तर मी इथून उठेन आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर येऊन बसेल. मग तिथे 10 लाख मराठे येतील की 5 लाख लोक येणार हे मला माहिती नाही. मी तिथ येऊन बसलो तर मग तुमची फजिती होईल. पण जर माझ्या माणसाला कुणालाही त्रास झाला तर सरकारसह संबंधी प्रशासनाने तुम्ही आम्हाला त्रास दिला तर आम्ही गप्प बसू देणार नाही.

केजच्या माणसांना उचलायची गरज नव्हती, मी तुमच्याकडे पाहीन, मग जनता आणि मराठे काय आहे तुम्हाला कळेल. बीडचे एसपी आणि जिल्हाधिकारी
काय आहे आम्हाला चांगलं माहिती आहे. इतके जातीयवादी अधिकारी आम्ही कधी पाहिले नाही.

आम्ही शांतते आंदोलन करतो, आम्हाला त्रास दिला तर आमचा नाईलाज आहे. तुम्ही तुमच्या माणसांना तंबी द्या, संचारबंदी काढून टाका. बीडसह महाराष्ट्रातील कुठेच कारवाई करू नका, उद्या दुपारपर्यंत तुम्ही निर्णय घ्या, संध्याकाळी आम्ही भूमिका जाहीर करू.

News Title : Manoj Jarange Maratha morcha govt role providing reservation issue 31 October 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Manoj Jarange(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x