15 November 2024 7:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News
x

राज्य सरकारच्या प्रशासनाचा किळसवाणा कारभार, लहान मुलांच्या पोषण आहाराच्या सिलबंद गव्हाच्या पोत्यात सडलेला भलामोठा उंदीर

Mid Day Meal Food Quality

Mid Day Meal Food Quality Maharashtra State | निविदा कंत्राटदाराने जिल्हा परिषदेच्या शाळांना मध्यान्ह भोजनात देण्यात येणाऱ्या आहारातील साहित्य निकृष्ठ दर्जाचे पुरविल्याचा ठपका यापूर्वी अनेक कंत्राटदारांवर ठेवण्यात आल्याचं पाहायला मिळालं आहे. यासंदर्भात अनेक तक्रारी राज्य शासनाकडे करण्यात आल्याचा इतिहास आहे. मात्र, लहान मुलांना किती निकृष्ठ दर्जाचे अन्न साहित्य पुरवलं जातं त्याचा पुरावा समोर आला आहे.

मध्यान्ह भोजनात कडधान्यामध्ये तांदूळ, चवळी, चना, तूरडाळ असे साहित्य यांचा समावेश असतो. यात मिरची पावडर, हळदी पावडर, मसाला पावडर व मीठ सुद्धा दिले जातात. आधीच मध्यान्ह भोजनाची चव मिरची पावडरने घसरली आहे. अन्य साहित्याच्या दर्जाच्या बाबतीतही असेच चित्र दिसून आले आहे. विशेष सध्याचा समोर आलेला प्रकार अत्यंत किळसवाणा आणि संतापजनक आहे.

पोषण आहारासाठी आणलेल्या धान्यात भलामोठा उंदीर
आता पोषण आहारासाठी आणलेल्या धान्यात भलामोठा उंदीर निघाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. वारंवार मुलांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. पोषण आहारातील धान्यात कधी अळ्या तर कधी पाली तर आता चक्क भलामोठा उंदीर असे भयंकर प्रकार समोर येत आहेत. सिल्लोड तालुक्यातील धोत्रा इथे ही धक्कादायक घटना घडकीस आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभाग आयुक्तालय एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत अंगणवाडीत देण्यात येणाऱ्या सिलबंद गव्हाच्या पोत्यात सडलेला भलामोठा उंदीर निघाल्याने पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

rat found in Mid Day Meal

विश्वजित प्रमोदसिंग जाधव या लहान बाळाचे पोषण आहार अंतर्गत मिळणारे धान्य 2 दिवसा आधी घरी आणले होते. लहान मुलांना मिळणाऱ्या पोषण आहार अंतर्गत धान्य आणलं. गव्हाचं पाकीट शंका आली म्हणून फोडून पाहिले असता त्यामध्ये सडलेला भलामोठा उंदीर निघाला. याबाबत वरिष्ट अधिकारी काय निर्णय घेता ते पाहणे महत्वाचे ठरेल. आता सिलबंद गव्हाच्या पोत्यात भलामोठा मेलेला उंदीर सापडला म्हणजे हे धान्य पॅक करण्याने ते माहिती असूनही सील बंद केलं आणि लहान मुलांच्या जीवाशी खेळ केल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे शासन कसा डोळे झाकून कारभार करतंय ते देखील पाहायला मिळतंय.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Mid Day Meal Food Quality Maharashtra State check details on 26 April 2023.

हॅशटॅग्स

#Mid Day Meal Food Quality(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x