15 January 2025 6:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

Milind Deora | बुडत्यांना शिंदेंचा आधार? अनेक वर्ष जनतेच्या संपर्कात नसलेले मिलिंद देवरा शिंदेंच्या संपर्कात, 2 वेळा दारुण पराभव

Milind Deora

Milind Deora | आतापर्यंत शिवसेनेत जाणार नसल्याचे सांगणाऱ्या मिलिंद देवरा यांनी सर्व पदांसह काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. कोणत्या पक्षात प्रवेश करणार, याबद्दल त्यांनी भाष्य केलेलं नसलं, तरी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले आहे. मिलिंद देवरा हे आज रविवारी मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर सेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

काँग्रेसची प्रतिक्रिया
आजपासून सुरु होणाऱ्या राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला भाजप आणि त्यांचे सहकारी पक्ष घाबरले आहेत. त्यामुळेच यात्रेपासून दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठी ED, CBI, IT यासारख्या केंद्रीय संस्थांची भिती दाखवून आमच्या काही सहकाऱ्यांना आपल्यासोबत घेत असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

काँग्रेस फुटणार अशा आवया उठवणारे भाजप आणि त्यांचे फुटीर सहकारी दोनवेळा पराभूत झालेल्या उमेदवाराला सोबत घेऊन भारत जोडो न्याय यात्रेच्या शुभारंभावरून दुसरीकडे लक्ष वळवण्याचा प्रयत्न करतायेत. पण तो यशस्वी होणार नाही. या यात्रेची समाप्ती मुंबईतच होणार असून यात्रेच्या समाप्ती सोबतच असंवैधानिक भाजप, शिंदे, अजित पवार सरकारचाही शेवटही होणार आहे.

अरविंद सावंत दोन वेळा लोकसभेवर
इंडिया आघाडीत सध्या जागा वाटपावरुन चर्चा सुरु आहे. अरविंद सावंत हे दक्षिण मुंबई मतदार संघातून दोनदा निवडून आले होते. त्यांनी मिलिंद देवरा यांचा पराभव केला होता. आता ही जागे उद्धव ठाकरे गट सोडण्याच्या मनस्थितीत नव्हता. तर देवरा यांना दक्षिण मुंबईतूनच लोकसभा लढवायची असल्याचे स्पष्ट झाले होते. ठाकरे गटाने महाविकास आघाडीतील काँग्रेसला ही जागा सोडण्यास नकार दिला. कोणत्याही परिस्थितीत प्रतिष्ठेची जागा इतर कोणत्याही पक्षाला न सोडण्याचा निर्धार सावंत यांनी शनिवारी बोलून दाखवला होता. त्यामुळे देवरा अस्वस्थ होते.

मिलिंद देवरांचा जमिनीवरील संपर्क नगण्य
दक्षिण मुंबई मतदार संघात मिलिंद देवरांचा सामान्य जनतेशी जमिनीवरील संपर्क नगण्य असल्याचे पाहायला मिळते. विशेष म्हणजे पक्षाच्या राजकीय कार्यक्रमांकडे कानाडोळा करणारे मिलींद देवरा हे वारंवार केवळ रॉयल गिटार वाद्य कार्यक्रमांकडे अनेकदा हजेरी लावत असतात हे अनेकदा पाहायला मिळतं. तसेच सामान्य लोकांपेक्षा त्यांची उच्चभ्रू लोकांमध्येच उठ-बस असते हे देखील अनेकदा पाहायला मिळते.

News Title : Milind Deora may join Shinde Camp after resigning from congress party 14 January 2024.

हॅशटॅग्स

#Milind Deora(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x