22 January 2025 10:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025 Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO
x

सामान्य लोकांच्या घरी बारशाच्या कार्यक्रमाला सुद्धा अधिक गर्दी होते | पण मंत्री संदीपान भुमरेंच्या कार्यक्रमाकडे लोकांची पाठ, खुर्च्या खाली

Minister Sandipan Bhumre

Minister Sandipan Bhumre | पैठणमध्ये संदीपान भुमरे यांना नुकत्याच झालेल्या कॅबिनेट विस्तारात रोहयो व फलोत्पादन मंत्रीपद मिळालं. त्यानंतर जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शनिवारी मंत्र्यांची उपस्थितीसोबत रक्तदानाचा शिबिर देखील आयोजित करण्यात आला. आपल्या मतदारसंघातील आमदाराला मंत्रीपद मिळाल्याने कार्यकर्त्यांचे उत्सुक्ता अपेक्षित होती. मात्र हजार लोकांची गर्दीची अपेक्षा असताना केवळ शंभर ते दीडशे लोक उपस्थित राहिल्याने शिंदे गटाला विचार पडला आहे. विशेष म्हणजे अगदी सामान्य लोकांच्या घरी बारशाच्या कार्यक्रमालाही अधिक लोकं जमतात आणि तेवढीही गर्दी मंत्रिपद मिळ्यानंतरही मंत्री महोदयांना जमवता आलेली नाही. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या कार्यक्रमाची पुन्हा चर्चा रंगली आहे.

पैठणमध्ये आदित्य ठाकरे यांची जोरदार सभा :
औरंगाबादमध्ये आदित्य ठाकरे यांनी दौरा केला होता. यावेळी ज्या ठिकाणी आमदार शिंदे गटात आले तिथेच आदित्य ठाकरेंनी शिवसेना मेळावा घेतला. त्यामुळे पैठणमध्ये ही आदित्य ठाकरे यांची जोरदार सभा झाली होती. सभेसाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांनी देखील जोरदार तयारी केली होती. त्यामुळे सभेला मोठी गर्दी जमली होती. मात्र भुमरे यांच्या कार्यक्रमालाकेवळ शंभर लोकांची गर्दी पाहून जमलेल्यांना आदित्य ठाकरे यांच्या मेळाव्यातील गर्दी आठवत आहे.

पैठणचे आमदार संदिपान भुमरे हे शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. त्यामुळे त्यांना औरंगाबाद जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. नुकतंच 15 ऑगस्ट रोजी त्यांना ध्वजारोहणाचाही मान मिळालाय. याआधी संजय शिरसाट हे औरंगाबादचे पालकमंत्री होणार अशी चर्चा होती. मात्र मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना स्थान न मिळाल्याने पालकमंत्री पदी भुमरेंची वर्णी लागणार अशी चर्चा आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Minister Sandipan Bhumre Program check details 27 August 2022.

हॅशटॅग्स

#Minister Sandipan Bhumre(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x