पत्नीच्या प्रसिद्धीसाठी फडणवीसांच्या घरात रिल स्टार रियाझ अली सोबत गाण्यावर ठेका चालतो, तर पाणी प्रश्नावर घराबाहेर येण्यापूर्वीच आमदाराला असं उचललं
MLA Nitin Deshmukh | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे प्रसिद्धीत राहण्यासाठी आटापिटा करताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच अमृता फडणवीस यांचं ‘आज मुड बना लिया’ गाणं प्रदर्शित झालं होतं. अमृता फडणवीस यांच्या पहिल्या पंजाबी गाण्याला अधिक प्रेक्षकांनी पाहावं म्हणून सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मार्केटिंगचा देखील वापर करण्यात आला होता. त्यासाठी रिल स्टार रियाझ ली याच्यासोबत तयार केलेला व्हिडीओ खुद्द अमृता फडणवीस यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. विशेष म्हणजे हा व्हिडिओ एखाद्या स्टुडिओमध्ये नव्हे तर थेट उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी रेकॉर्ड करण्यात आला होता. त्यावेळी स्वतः उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिल स्टार रियाझ ली याच्यासोबत फोटो काढला होता. विशेष म्हणजे मुंबईतील या सरकारी निवास्थानावर जनतेचा पैसा खर्च होतं असतो आणि त्याचा उपयोग जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी करणे अपेक्षित आहे.
View this post on Instagram
मात्र आता त्याच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील निवास्थानी सामान्य लोकांच्या पाणी प्रश्नावरून संघर्ष यात्रा पोहोचणार होती, त्यावरून मात्र उपमुख्यमंत्री भलतेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
नागपूरच्या वेशीवर आज सकाळी सकाळीच प्रचंड थरार पाहायला मिळाला. ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी पाणी प्रश्नावर संघर्ष यात्रा सुरू केली होती. अकोल्याहून निघालेली ही संघर्ष यात्रा नागपूरकडे निघाली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा नितीन देशमुख यांनी दिला होता. मात्र, पोलिसांनी नागपूरच्या वेशीवरच ही संघर्ष यात्रा अडवली. त्यामुळे देशमुख आणि इतर आंदोलकांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केलं. त्यानंतर देशमुख हे जमिनीवर झोपले.
मात्र, काही पोलिसांनी देशमुख यांचे हात तर काहींनी पाय पकडून त्यांना अक्षरश: उचलून नेले. पोलिसांनी नितीन देशमुख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं असून त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली जात आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: MLA Nitin Deshmukh detained by Nagpur police today check details on 20 April 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो इकडे लक्ष द्या, 'ही' म्युच्युअल फंड योजना 1 लाखांवर देईल 6,13,521 रुपये परतावा
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC