23 February 2025 10:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

मनसेची उद्धव ठाकरेंवर नेहमीच राजकीय आगपाखड | पण आज ते पूर्वीपासून शिंदेच मनसे फोडत होते, मनसे कार्यकर्त्यांचं विलीनीकरण सुरु

CM Eknath Shinde

CM Eknath Shinde | एकिकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षावर संकटं येत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतःच्या पक्षविस्तारात लक्ष घालून आहेत. शिवसेनेचे आमदार, खासदार शिंदे गटात दाखल होत असताना आता एकनाथ शिंदे यांनी ठाणे, उल्हसनगर, नवी मुंबई पासून कल्याण-डोंबिवली पट्ट्यात मनसे संपविण्यासाठी पावलं टाकली आहेत. मनसेचे नेतेही शिंदे गटात दाखल होत आहेत. नवी मुंबईतील पनवेल, उरण, खारघरमध्ये मनसेला खिंडार पडले आहे. येथील माजी जिल्हाध्यक्षांसह 100 जणांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे नवी मुंबईतील आगामी महापालिका निवडणुकांमध्ये शिंदे गटाचं बळ वाढलेलं दिसत आहे.

शिंदे धूर्त नेते, म्हणून राज ठाकरेंशी संवाद ठेवला :
एकनाथ शिंदे हे देखील अत्यंत धूर्त राजकरणी असून त्यांच्या अत्यंत टोकाच्या राजकीय महत्वाकांक्षा देशाने आणि राज्याने पाहिल्या आहेत. शिवसेना फोडल्यावर ‘इतर ठाकरे कुटुंबीय’ आपल्याविरोधात बोलू नयेत म्हणून ते राज ठाकरे यांच्या संपर्कात राहून हेडलाईन मॅनेजमेंट करत होते असं राजकीय जाणकार सांगतात. त्यासाठीच कधी शिवसेना, कधी काँग्रेस आणि कधी शिंदे गटात अशा राजकीय उड्या मारणाऱ्या आ. सदा सरवणकर यांना राज ठाकरेंच्या भेटीसाठी पाठविले होते. शिंदे गट मनसेत सामील होईल ही राजकीय पुडी सोडणारे देखील एकनाथ शिंदेच होते. ज्यांनी उद्धव ठाकरेंना जुमानले नाही ते राज ठाकरेंना विचारतील का असा साधा प्रश्न देखील राज ठाकरेंच्या मनात आला नसावा आणि त्यामुळेच त्यांनी एका मुलाखतीत शिंदे गटाच्या मनसेतील विलीनीकरणावर हास्यास्पद प्रतिक्रिया दिली होती.

मुळात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे ही जोडी एकत्र मिळून सर्व स्क्रिप्टेड घडवून आणत आहेत हे राज ठाकरे यांच्यासारख्या नेत्याला कळालं नाही हे विशेष म्हणावे लागेल. अन्यथा ‘मोदी इस देश के प्रधानमंत्री हो’ या विधानाची किंमत जसा आज देश भोगत आहे, तसंच ‘शिंदे हेच या राज्याचे मुख्यमंत्री राहू देत’ विधानानंतर मनसेच संपून जाईल आणि उद्धव ठाकरेंची सेना कालांतराने होती त्याच स्थितीत जाईल. पण राज ठाकरेंचा एकमेवं आमदार देखील शिंदेंमुळे जायचा अशी वेळ आल्यास आश्चर्य मानायला नको.

नितीन नांदगावकर यांनी सेनेत आणण्यात शिंदेंचा हात होता :
दरम्यान, २०१९ मधील विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेच्या संपर्कात असणारे नितीन नांदगावकर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळचे संबंध प्रस्तापित केले होते. त्यानंतर निवडणुकीच्या तोंडावर सामान्यांसाठी काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची मनसेत काय अवस्था आहे, असा भ्रम सर्वत्र आणि विशेष करून महाराष्ट्र सैनिकांमध्ये निर्माण करण्यामागे एकनाथ शिंदे हेच होते. ज्यासाठी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे स्वतः ठाण्यातून मुंबईत आले, त्यानंतर समाज माध्यमांवरून नितीन नांदगावकर यांच्या प्रवेशाचे फोटो व्हायरल करण्यात आले. स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यामध्ये कुठेही नव्हते. त्यांना केवळ उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश देण्यात आला होता. मात्र मनसेने शिंदे सोडून उद्धव ठाकरे यांच्यावर आगपाखड केली होती. सध्याच्या बदलत्या राजकीय समीकरणात नितीन नांदगावकर उद्धव ठाकरे यांच्यासोबत असले तरी त्यांचा शिंदेंना राजकीय फायदा नसल्याने त्यांनी हा विषय गांभीर्याने घेतला नाही आणि त्यांना सेनेतच राहू दिलं.

ठाणे महानगरपालिकेत मनसेचे नागसेवक शिंदेनी फोडले होते :
२०१६ मध्ये मध्ये ठाणे महानगरपालिकेत मनसेचे तत्कालीन नगरसेवक शैलेश मनोहर पाटील आणि सुनीता मुंडे यांना मनसेतून फोडण्यातही एकनाथ शिंदे यांचाच सहभाग होता. मात्र त्यांना उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश दिल्याने मनसेने तेव्हा सर्व आगपाखड शिवसेनवर केली होती.

मनसेचे मुंबई महानगरपालिकेतील तत्कालीन ६ नगरसेवक फोडणातही एकनाथ शिंदे आणि तत्कालीन मुंबई महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांचा सहभाग होता. त्यामुळे शिंदे गट फुटल्यावर यामिनी जाधव, यशवंत जाधव आणि दिलीप लांडे हे शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे शिंदे यांनी स्वतःचं राजकीय प्रस्त वाढविण्यासाठी मनसे फोडली होती, पण मनसेने त्याचे खापर उद्धव ठाकरेंवर फोडलं होतं. आता पुन्हा तेच घडू लागलं आहे. आता ठाणे, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबईतील मनसे एकनाथ शिंदे संपवतील यात काहीच वाद नाही. कारण आता एकनाथ शिंदे यांच्या राजकीय अस्तित्त्वाची लढाई आहे. दुसरीकडे, राज ठाकरे ठाकरे यांना जेव्हा ईडीने चौकशीला बोलावलं होतं तेव्हा त्यावरून शिवसेनेच्या सामनामध्ये भाजपवर टीका केली होती. मात्र आज उद्धव ठाकरे आणि संजय राऊत राजकीय संकटात असताना राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे सोडा, रश्मी ठाकरे यांना देखील अप्रत्यक्षरीत्या लक्ष केल्याने त्यांचा दुप्पटी राजकीय चेहरा देखील महाराराष्ट्राने पाहिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: MNS Party workers join Eknth Shinde group check details 02 August 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CM Eknath Shinde(90)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x