15 November 2024 12:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमधून फायद्याचे संकेत - GMP IPO Horoscope Today | रखडलेली कामे पूर्ण होतील, आजचा दिवस 'या' राशींसाठी अत्यंत खास, आजचे राशीभविष्य काय सांगते पहा Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर रॉकेट होणार, फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेटिंग अपग्रेड, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS
x

Monsoon Alert | उष्णेतेपासून लवकरच सुटका | मान्सून केरळात दाखल आणि महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल

Monsoon Alert

Monsoon Alert | कडाक्याच्या उन्हामुळे ज्या मान्सूनची प्रतिक्षा देशभरातील प्रत्येक नागरिकाला आहे तो मान्सून अखेर केरळात दाखल झाला आहे. मान्सूनच्या आगमनासाठी पोषक वातावरण झाले आहे. केरळातील पर्जन्यमापकांची तपासणी केल्यानंतर हवामान विभाग या निकषावर पोहचला असून केरळात मान्सूनचे आगमन झाले आहे.

मान्सून रविवारी केरळात दाखल :
मान्सून रविवारी केरळात दाखल झाला आहे. असेच पोषक वातावरण राहिले तर 7 ते 8 जून पर्यंत हा पाऊस महाराष्ट्रात दाखल होणार आहे. मान्सूनच्या आगमनासाठी पोषक वातावरण झाले असून हंगामाच्या सुरवातीलाच समाधानकारक पाऊस बरसणार असल्याचे सांगितले जात आहे. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर पुढील 6 ते 7 दिवसांमध्ये त्याचे तळकोकणात आणि महाराष्ट्रात आगमन होईल असा अंदाज आहे.

सर्वकाही वेळेवर :
त्यामुळे यंदा सर्वकाही वेळेवर होणार असल्याचे संकेत आहेत. यंदा वेळेपूर्वीच मान्सून दाखल होण्याचा अंदाज वर्तवला जात होता. त्याच प्रमाणे मे महिन्याच्या अंतिम टप्प्यात केरळात मान्सून पावसाला सुरवात झाली आहे. त्यामुळे आता 8 जूनपर्यंत तो महाराष्ट्रात सक्रीय होईल यामध्ये शंका नाही.

त्याआधीची मान्सून अपडेट काय होती :
यंदा नेहमीपेक्षा मान्सून लवकर येणार असे हवामान खात्याकडून सांगण्यात येत होते परंतु नैऋत्य मोसमी वाऱ्याचा वेग मंदावल्याने मान्सूनची वाटचाल संथ गतीने सुरू होती. मान्सून अरबी समुद्रात तब्बल सहा दिवसांपुर्वी दाखल झाल्यानंतर श्रीलकेजवळ थांबला होता. दरम्यान मान्सूनची वाटचाल पुढे सुरू झाली आहे. श्रीलंकेच्या निम्म्या भागासह, अरबी समुद्र, मालदीव, कोमोरिन भाग, बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत मॉन्सूनने प्रगती केली असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Monsoon Alert from IMD check details here 29 May 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x