15 November 2024 4:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News
x

ED म्हणजे काय ते शहर-गाव खेड्यातील लोकांनाही भाजपमुळे समजलं, परिणामी सर्व्हेनुसार गैरवापर होत असल्याचं लोकांचं मत

Mood of the Nation

Mood of The Nation | एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत असलेली उभी फूट समोर आली. या सगळ्या स्थितीबाबत तसंच बिहारमध्ये जे सत्तानाट्य घडलं त्याबाबत इंडिया टुडे आणि सी व्होटर्स यांनी एक सर्व्हे केला आहे. या सर्व्हेमध्ये लोकांनी आज घडीला लोकसभा निवडणूक झाली तर महाराष्ट्रात काय चित्र असेल याचं उत्तर दिलं आहे.

लोकसभेच्या ४८ जागांपैकी ३० जागा युपीएला मिळतील :
आज लोकसभा निवडणुका झाल्या तर महाराष्ट्रातल्या ज्या लोकसभेच्या ४८ जागा आहेत त्यापैकी ३० जागा युपीएला मिळतील म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मिळतील. असं इंडिया टुडे आणि सी व्होटर्सच्या सर्व्हेमध्ये लोकांचं म्हणणं आहे. तसंच १८ जागा या एनडीएला म्हणजेच भाजपला आणि त्यांच्या मित्र पक्षांना मिळतील असं लोकांना वाटतं आहे. असं घडलं तर हे चित्र भाजपसाठी धक्कादायक आहे यात शंकाच नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रचंड प्रभाव २०१४ मध्ये दिसून आला होता. तसंच २०१९ मध्येही तो कायम राहिला. एनडीएचे जास्त खासदार या दोन्ही वर्षांमध्ये निवडून आले. मात्र आत्ता जे सत्तानाट्य महाराष्ट्रात घडलं आहे त्यानंतर जर आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर हे चित्र भाजपसाठी धक्कादायक ठरेल असं लोकांचं म्हणणं आहे. तसेच प्रचंड महागाई आणि बेरोजगारीवरून मतदारांच्या मनात मोदी सरकार विरोधात प्रचंड संताप देखील आहे.

शिंदे गटाला आणि भाजपला मोठा धक्का बसणार :
एकंदरीत सर्व्हेचा फटका बसेल तर तो शिंदे गटाला आणि भाजपला आहे. हा अत्यंत धक्कादायक सर्व्हे आहे असंच समोर येतं आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र आले आहेत. त्याच काळात घेतलेला हा सर्व्हे आहे. भाजप आणि शिवसेना यांच्याकडे ४२ जागा होत्या. आता भाजपकडे ४८ पैकी ३७ जागांचं बळ आहे. मात्र याचं नुकसान होऊन त्या १८ वर येऊ शकतं असं लोकांना वाटतं आहे. त्यामुळे आज लोकसभा निवडणूक झाली तर भाजपला मोठा फटका बसू शकतो.

केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर :
केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजेच ईडी, सीबीआय तसंच अनेकदा आयटी म्हणजेच आयकर विभाग अशा यंत्रणांचा वापर भाजपकडून केला जातो आहे. केंद्र सरकार म्हणजेच मोदी सरकार हा गैरवापर करत आहे असा आरोप महाराष्ट्रातून, पश्चिम बंगालमधून केला गेला. ममता बॅनर्जी हा आरोप करतात. महाराष्ट्रात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनीही हा आरोप केला. नेमका हाच प्रश्न इंडिया टुडे आणि सी व्होटर्सने लोकांना विचारला.

भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करते आहे का? – इंडिया टुडे आणि सी व्होटर्सचा सर्व्हे काय सांगतो?
* याबाबत ३८ टक्के लोकांनी होय असं उत्तर दिलं आहे.
* तर २१ टक्के लोकांनी माहित नाही हे उत्तर दिलं आहे
* ४०.९ टक्के लोकांनी सगळीच सरकारं करतात असं म्हटलं आहे
* तर २१ टक्के लोकांनी माहित नाही असं उत्तर दिलं आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Mood of the Nation survey on ED action from Modi government check details 12 August 2022.

हॅशटॅग्स

#Mood of The Nation(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x