लिलावती इस्पितळातील नवनीत राणांचा MRI एक प्री-फिक्स राजकीय स्टंट होता? | त्या प्रश्नाने इस्पितळही निरुत्तर
Navneet Rana | खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या अडचणी वाढल्या आहेत. न्यायालयाने राणा दाम्पत्याला नोटीस बजावली आहे. मुंबई पोलिसांनी नवनीत राणा यांच्या पत्रकार परिषदेतील काही मुद्दे अधोरेखित करत जामीन रद्द करण्याची मागणी केली आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांचा जामीन रद्द करण्याची मागणी करणारा अर्ज मुंबई पोलिसांनी दाखल केला आहे. नवनीत राणा यांनी लिलावती रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर लगेच उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती.
दरम्यान, आज मुंबईतील लिलावती रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरत पेडणेकर आणि आमदार मनिषा कायंदेंनी नवनीत राणांना एमआयआरवरून एकप्रकारे इस्पितळ प्रशासनाला उघडं पाडलं आहे. राणांचा एमआरआय झाला की नाही? या मूळ प्रश्नापासूनच शिवसेनेच्या प्रश्नांना सुरुवात झाली. त्यानंतर रुग्णालय प्रशासनावर अनेक प्रश्नांचा भडीमार करण्यात आला. गंभीर बाब म्हणजे या प्रश्नांची उत्तरं देताना रुग्णालय प्रशासनाकडे कोणतीही उत्तरं नव्हती. अगदी सामान्य माणूस देखील एखाद्या इस्पितळात अशा वैद्यकीय चाचण्यांना सामोरे जातात तेव्हा देखील जे नियम असतात ते नवनीत राणा प्रकरणात याठिकाणी पूर्णपणे धाब्यावर बसवले गेले होते हे त्यांनीच आणि भाजपच्या नेत्यांनी फोटो-व्हिडिओ माध्यमांना पुरवून सिद्ध केले होते. मात्र शिवसेनेने उपस्थिती केलेल्या प्रश्नावरून लीलावती रुग्णालयात एक प्री-फिक्स राजकीय स्टंट झाला होता अशी चर्चा त्या प्रश्नांवरून सुरु झाली आहे.
शिवसेनेने उपस्थित केलेले 20 प्रश्न कोणते :
* नवनीत राणांचा MRI दरम्यानचे फोटो कसे बाहेर आले?
* MRI रुममध्ये रुग्ण आणि डॉक्टरांशिवाय इतर कुणालाही जाण्याची परवानगी नसते, तिथं इतके लोक का?
* ही रुम निर्जंतुक असणं गरजेची असते, तरीही बाहेरचा व्यक्ती आत कसा?
* MRI मशीनजवळ कुठलाही धातू वा इलेक्ट्रॉनिक वस्तू नेण्यास परवानगी नसते, तरीही मोबाईलने फोटो कसे क्लिक केले?
* नवनीत राणांचा MRI सुरु असताना फोटो काढले, त्यावेळी अपघात झाला असता तर त्याला जबाबदार कोण?
* फोटो काढताना MRI मशीन बंद नव्हती कशावरुन? फक्त फोटोसेशनसाठीच नवनीत राणा तिथं गेल्या नसतील हे कशावरुन?
* लिलावतीत नातेवाईकांनाही जाताना अनेक निर्बंध लावले जातात, मात्र इथं सर्रास सगळं कसं सुरु होतं?
* MRI सुरु असताना सगळे लांब असतात, इथं सगळे जवळ कसे उभे दिसतात?
* नवनीत राणांचा MRI रिपोर्ट अद्याप कसा आला नाही?
* नवनीत राणा घाबरल्या होत्या, तर त्यांचे पाय का बांधण्यात आले नाहीत?
* पोटाचा MRI काढला गेला असेल, तर त्यांच्या पोटाला बेल्ट का नव्हता?
* नवनीत राणांना जर मानही उचलत नव्हती, तर त्या लगेच बाहेर येऊन कशा बोलल्या?
* स्पॉन्डिलीसीसाठी खरंच MRI ची गरज होती का?
* मानदुखीचा त्रास होत असेल, तर नवनीत राणांना उशी कशी दिली?
* राणांचे फोटो बाहेर आल्यानंतरही लिलावतीत दोषींची चौकशी का झाली नाही?
* MRI वेळी रुग्णालयाचे सिक्युरिटी हेडही रुमध्ये होते, मग हे कसं घडू दिलं?
* लिलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्यांनी घेतलेल्या शपथेचं उल्लंघन केलं, त्यांच्यावर कारवाई का होऊ नये?
* बाहेरचा व्यक्ती फोटो काढत होता, तेव्हा त्याला बाहेर का काढलं नाही?
* फोटो काढल्याचं लक्ष्यात आल्यानंतर, त्याचा मोबाईल का नाही घेतला?
* जो पॅरामेडिक स्टाफ MRI करत होता, तो आता हजर का नाही?
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: MP Navneet Rana in Lilavati Hospital for MRI Scan was political prefixed stunt said Shivsena leaders 09 May 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सरकारी स्कीम, महिना कमवाल 20,000 रुपये, जबरदस्त फायद्याची योजना