शिंदेंना मुख्यमंत्री करून फडणवीसांना दुय्यम स्थान | फडणवीसांचे राजकीय पंख 3 प्रमुख नेतेच छाटणार? - सविस्तर वृत्त

Devendra Fadnavis | शिवसेनेतील बंडखोरीनंतर राज्यात राजकीय भूकंप झाला. त्यानंतर सरकार पडणार हे निश्चित होतं. २९ जूनला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर चर्चा सुरू झाली ती शिंदे आणि भाजप यांचं सरकार येणार याची. या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील अशी चर्चा रंगली होती. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील हे जाहीर केलं. यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
देवेंद्र फडणवीस यांचं नाव चर्चेत असताना अचानक एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री होतील हे स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीच जाहीर केलं.मी सत्तेत सहभागी होणार नाही मात्र सरकार योग्य पद्धतीने चालेल याकडे लक्ष देईन असंही त्यांनी सांगितलं. मात्र त्यानंतर अवघ्या दीड तासात देवेंद्र फडणवीस हे सत्तेत सहभागी होतील तसंच ते राज्याचे उपमुख्यमंत्री असतील हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी जाहीर केलं ज्यानंतर एकच खळबळ उडाली.
शिवसेनेच्या व्हिपचा प्रश्न अजूनही तसाच :
एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पण शिवसेनेच्या व्हिपचा प्रश्न अजूनही तसाच कायम आहे. सर्वोच्च न्यायालयात ११ जुलै रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. याचाच अर्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अजूनही व्हिप काढण्याचा अधिकार आहे. शिवाय, अपात्रतेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. शिंदे यांच्या मार्गातील हा सर्वात मोठा अडथळा आहे. कारण शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. सुप्रीम कोर्टाच्या मते, सभागृहाबाहेर पक्षविरोधी कारवाई झाली तरी लोकप्रतिनिधी अपात्र ठरू शकतात.
पक्षप्रमुखांकडून व्हीप काढला जाईल :
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. पण त्यांना सभागृहात बहुमत सिद्ध करावं लागेल. त्यासाठी आमदारांना मतदान करावे लागते. त्यावेळी पक्षप्रमुखांकडून व्हीप काढला जाईल. या अर्थाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या विरोधात मतदान करण्यासाठी शिवसेनेला व्हीप दिला गेला किंवा नाही तर आज जो कोणी बंडखोर आमदार आणि शिवसेनेचा सदस्य असेल त्याला तो व्हीप पाळावा लागेल.
शिंदे गट भाजपात विलीन करण्याची योजना :
दरम्यान, संपूर्ण शिंदे गट भाजपात विलीन करून देवेंद्र फडणवीस यांचं महत्व कमी करण्याची योजना भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठांनी आखल्याचे म्हटले जाते आहे. त्यामुळेच अमित शहा आणि जेपी नड्डा यांनी आगामी काही मिनिटांपूर्वी अधिकृत ट्विट करून फडणवीसांना तसे आदेश देऊन दुय्यम स्थान घेण्यास भाग पडल्याचं म्हटलं जातंय. पत्रकार परिषदेनंतर आणि अगदी शेवटच्या मिनिटात अधिकृत आदेश देऊन देवेंद्र फडणवीस यांना कोणताही राजकीय पर्याय उरणार नाही याची पूर्ण काळजी मोदी, शाह आणि जेपी नड्डा यांनी घेतल्याचं म्हटलं जातंय. फडणवीस यांचं भाजपमधील वाढलेलं वजन आणि महाराष्ट्रातील भाजपवर बसलेली एकहाती पकड दिल्लीतील वरिष्ठांच्या डोळ्यात खुपत होती असं राजकीय निरीक्षण सांगत आहेत.
त्यामुळे २०२४ मधील निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवून त्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडून होऊ दिली आणि त्यानंतर काही मिनिटात अधिकृत ट्विट आणि फोनाफोनी करून त्यांना दुय्यम स्थानी बसवून एक मेसेज दिल्याचं म्हटलं जातंय. हा गट भाजपकडे आल्याने महाराष्ट्रातील ४० लोकसभा मतदारसंघात आणि जवळपास २०० विधानसभा मतदारसंघात भाजपचं वर्चस्व वाढणार आहे. त्यामुळे साहजिकच फडणवीस दिल्लीतील लोकांवर २०२४ मध्ये दबाव बनवू शकले असते. त्यामुळे योग्य वेळी दिल्लीतील भाजप वरिष्ठांनी देवेंद्र फडणवीस यांना दुय्यम स्थान देत त्यांना योग्य संदेश दिला आहे. हे फडणवीसांच्या सुद्धा लक्षात आल्याने त्यांच्या समर्थकांनी अमित शहा यांना अनेक ठिकाणी बॅनर्सवरून हटवले आहे. तसेच आजच्या मुंबई भाजपच्या कार्यक्रमातील फडणवीसांसहित महत्वाच्या नेत्यांच्या गैरहजेऱ्या बरंच काही सांगून गेल्या आहेत.
मराठा विरुद्ध ब्राह्मण वाद फडणवीसांच्या सांगण्यावर ?
यावर विविध चर्चा होत असतानाच ब्राह्मण महासंघाने भाजपमध्ये ब्राह्मणांचं खच्चीकरण केलं जातं आहे असं म्हटलं आहे. नितीन गडकरींपाठोपाठ आता देवेंद्र फडणवीस यांनाही डावललं गेल्याचा आरोप ब्राह्मण महासंघाने केला आहे. आता देवेंद्र फडणवीस यांचं खच्चीकरण केलं जातं आहे. देवेंद्र फडणवीस यांची घोडादौड अडविण्याकरीता पूर्ण बहुमतापेक्षा अधिक संख्या आमदारांना निवडून आल्यानंतर सरकार न बनविण्याचा षड्यंत्र आखून योजनाबद्ध पद्धतीने देवेंद्र फडणवीस याना सत्तेपासून लांब ठेवण्यात आलं असं गंभीर आरोप ब्राह्मण महासंघाने केला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: National BJP politics against Devendra Fadnavis check details 01 July 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल