21 January 2025 3:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Vs PPF Scheme | सर्वाधिक पैसा कुठे मिळेल, वार्षिक 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून कुठे अधिक परतावा मिळेल Wipro Share Price | आयटी शेअरमध्ये सुसाट तेजीचे संकेत, विप्रो शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: WIPRO IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, PSU स्टॉक फोकसमध्ये, तेजीचे संकेत - NSE: IREDA HFCL Share Price | एचएफसीएल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HFCL Quant Mutual Fund | पगारदारांसाठी मार्ग श्रीमंतीचा, फंडाची ही योजना 4 पटीने पैसा वाढवते, संधी सोडू नका Jio Finance Share Price | तेजीने कमाई होणार, जिओ फायनान्शियल शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करतोय, तेजी कायम राहणार का, ब्रोकरेज बुलिश - NSE: APOLLO
x

National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास

National Education Day

National Education Day | शिक्षण हा समाजाचा आणि प्रबोधनाचा मूळ पाया आहे. आपल्या गुणवत्तेचे प्रमाण शिक्षणावरूनच ठरवले जाते. त्याचबरोबर एखादा देश किंवा एखादी संस्कृती किती प्रमाणात प्रगतशील आहे हे देखील त्या देशाच्या किंवा राज्याच्या शिक्षण संस्थेवरच आधारित असते.

आज 11 नोव्हेंबर 2024 संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर हा दिवस जागतिक शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. परंतु तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की, शिक्षण दिनाचं आणि 11 नोव्हेंबरचं महत्व काय आहे. शिक्षण दिन याच दिवशी का साजरा केला. आज या लेखातून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे.

शिक्षण दिनाची स्थापना 2008 रोजी सुरू झाली आहे. 11 नोव्हेंबर 2008 या दिवसापासून शिक्षण दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. या वर्षापासून प्रत्येक वर्षाला याच दिवशी जागतिक शिक्षण दिन साजरा केला जातो. हा दिवस संपूर्ण देशात साजरा होत असून अनेक मोठमोठ्या शाळांमध्ये, कॉलेजमध्ये त्याचबरोबर शैक्षणिक संस्था आणि कंपन्यांमध्ये देखील शैक्षणिक दिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवसाच्या इतिहासाबद्दल थोडक्यात माहिती जाणून घ्या.

शिक्षण दिनाची सुरुवात कशी आणि कधी झाली जाणून घ्या :
स्वतंत्र भारताचे सर्वात पहिले शिक्षणमंत्री तुम्हाला सर्वांनाच माहिती असतील. ज्यांचं नाव मौलाना अबुल कलाम आझाद असं होतं. मौलाना अबुल कलाम आझाद यांनी 5 ऑगस्ट 1947 पासून ते 2 फेब्रुवारी 1958 पर्यंत शिक्षण मंत्री या पदाची धुरा सांभाळली. त्याकाळी मौलाना आझाद यांच्या कार्यकिर्दीत विविध कला साहित्य, शैक्षणिक संस्था, संगीत नाटक, कला विद्या, ललित कला अकादमी यांची स्थापना झाली. 11 नोव्हेंबर हा दिवस मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्याची सुरुवात केली गेली.

मौलाना अबुल कलाम आझाद यांची थोडक्यात माहिती जाणून घ्या :
मौलाना अबुल कलाम आझाद हे एक पत्रकार, एक उत्कृष्ट लेखक, शिक्षणतज्ञ आणि स्वातंत्र्यसैनिक म्हणून ओळखले जायचे. त्यांचा जन्म 1888 साली 11 नोव्हेंबर या तारखेला झाला. त्यांचे गांधीजींवर अपार प्रेम आणि त्यांच्यासाठी श्रद्धावान होते. स्वातंत्र्यलढ्यानंतर त्यांनी पुढील दहा वर्ष शिक्षण मंत्री या पदाची धुरा सांभाळली होती. त्याचबरोबर ते उत्तर प्रदेशचे खासदार देखील राहिले होते. अशा महान शिक्षणतज्ञाचे 1958 रोजी 22 फेब्रुवारी या तारखेला निधन झाले. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत प्रचंड लौकिकता आणि जनतेचे प्रेम प्राप्त केलं होतं.

शिक्षण दिनाचे खास महत्व :
देशाच्या उज्वल भवितव्यासाठी भारताचे सरकार गेले 6 ते 14 वर्ष मोफत शिक्षण ही मोहीम राबवत आहेत. प्रत्येक व्यक्तीने शाळा, कॉलेज त्याचबरोबर शैक्षणिक संस्थांच्या शैक्षणिक दर्जाची सुधारणा करण्याकडे लक्ष देण्यात अत्यंत गरजेचे आहे.

Latest Marathi News | National Education Day 11 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#National Education Day(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x