22 January 2025 1:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या
x

राणा दाम्पत्याच्या आडून डीजीपी महाराष्ट्र आणि मुंबई पोलिस आयुक्तांवर 'त्या' प्रकरणातून दबाव तंत्र?

Navneet Rana arrest

Navneet Rana Arrest Case | लोकसभेच्या खासदार नवनीत राणा यांच्या अटकेप्रकरणी संसदेच्या विशेषाधिकार आणि नीतिमत्ता समितीने महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना तोंडी पुराव्यासाठी १५ जून रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. या प्रकरणी डीजीपी महाराष्ट्र, मुंबई पोलिस आयुक्त आणि महिला जिल्हा कारागृह अधीक्षक भायखळा (मुंबई) यांनाही समितीने १५ जून रोजी हजर राहण्याचे समन्स बजावले आहे.

तत्पूर्वी अपक्ष खासदार नवनीत राणा 23 मे रोजी संसदीय विशेषाधिकार समितीसमोर आपली बाजू मांडण्यासाठी हजर झाल्या होत्या. मुंबईतील पोलीस ठाण्यात आपल्याला बेकायदेशीररित्या अटक करून अमानुष वागणूक देण्यात आल्याचा आरोप राणाने केला होता. नवनीत राणा यांनी आपली तक्रार लोकसभेच्या विशेषाधिकार समितीकडे दिली होती आणि समितीने त्यांना हजर राहण्यासाठी बोलावले होते.

नवनीत राणा यांनी काय माहिती दिली होती :
मी माझी बाजू समितीसमोर मांडली आणि सर्व तपशील त्यांना सांगितला, माझ्यावर कसा अत्याचार केला गेला आणि माझ्यावर जातीयवादी टीका केली गेली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपासून ते मुंबई पोलीस आयुक्तांपर्यंत सगळ्यांची नावं मी घेतली आहेत. मी समितीकडे न्याय मागितला आहे.

पोलीस स्थानकात चहा-कोफी – फिल्मी नौटंकी कॅमेऱ्यात कैद :
नवनीत राणा यांनी केलेल्या गैरवर्तनाच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी पुराव्यासहित पलटवार केला होता. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी हा व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला होता. हा व्हिडिओ पोलीस ठाण्याच्या सीसीटीव्हीतला होता. नवनीत राणा आणि रवी राणा पोलीस ठाण्यात गप्पा मारत चहा घेताना दिसले होते. हे दोघंही पोलीस ठाण्यात अगदी आरामात बसून सल्ला सलामत करत होते हे लोकांनी पाहीलं होतं.

नवनीत राणांच्या बाजूला मिनरल वॉटर बॉटल :
तो व्हिडिओ मुंबई पोलीस आयुक्तांनी प्रसिद्ध केला होता, त्यावेळी नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून पोलिसांनी आपल्याला पाणी प्यायला दिलं नाही किंवा शौचालयातही जाऊ दिलं नाही असा आरोप केला होता. मात्र प्रत्यक्षात त्यांच्या टेबलवर चहा आणि मिनरल वॉटर बॉटल स्पष्ट दिसली होती. त्यामुळे अगदी फिल्मी आणि स्क्रिप्टेड नौटंकी कॅमेऱ्यात सर्वांनी पहिली होती.

संसदीय समिती मार्फत नेमका कोणावर दबाव?
संसदेच्या विशेषाधिकार आणि नीतिमत्ता समितीने महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना, डीजीपी महाराष्ट्र, मुंबई पोलिस आयुक्त आणि महिला जिल्हा कारागृह अधीक्षक भायखळा (मुंबई) यांनाही समितीने तोंडी पुराव्यासाठी १५ जून रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. मात्र यामध्ये मुख्य सचिव, डीजीपी महाराष्ट्र, मुंबई पोलिस आयुक्त यांच्यावर राणा दाम्पत्याच्या आडून वेगळ्याच विषयावर राजकीय दबाव टाकला जातोय का याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

फोन टॅपिंग प्रकरणात स्वतः देवेंद्र फडणवीस अडचणीत सापडले आहेत. राज्य सरकार तसेच मुंबई पोलीस याप्रकरणात कसून चौकशी आणि पुरावे उभे करून न्यायालयातील मोठी तयारी करत आहे. त्यामुळे जसजसे फोन टॅपिंग प्रकरण पुढे सरकेल तसतसे राज्यात अचानक ईडी आणि CBI कारवाया समोर येतील अशी चर्चा सुरु झाली आहे. अनिल परब यांच्यावरील कारवाई देखील त्याच विषयाला अनुसरण मुख्यमंत्र्यांवर टाकलेला राजकीय दबाव असल्याचं म्हटलं जातंय. राज्यातील भाजपच्या एका मोठ्या नेत्याला वाचविण्यासाठी दिल्लीतून राजकीय दबावासाठी अचानक काही कारवाया सुरु होतं आहेत अशी चर्चा सुरु झाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Navneet Rana arrest case with parliaments privileges committee check details 28 May 2022.

हॅशटॅग्स

#Navneet Rana arrest(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x