18 November 2024 6:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

उपमुख्यमंत्री पद नव्हे तर मुख्यमंत्री पदासाठी अजित पवारांची फिल्डिंग? शिंदे गटातील आमदार-खासदारांना तिकीटही मिळणार नाहीत | Marathi News

NCP Leader Ajit Pawar

NCP Political Crisis | महाराष्ट्राच्या राजकारणात रविवारची मोठी खळबळ उडाली आहे. राज्याच्या राजकारणात भीष्म पितामह अशी प्रतिष्ठा असलेल्या शरद पवार यांना मोठा धक्का बसला असून त्यांचे पुतणे अजित पवार 9 आमदारांसह एकनाथ शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यांना राष्ट्रवादीच्या किमान ४० आमदारांचा पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे. काल ते आमदारांसह अचानक राज्यपाल भवनात पोहोचले आणि सरकारला पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर एकूण 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. आता या आमदारांवर कारवाईची मागणी करत राष्ट्रवादीने विधानसभा अध्यक्षांच्या दारात धाव घेतली आहे.

३ वर्षात ३ मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली उपमुख्यमंत्री पदी

अजित पवार यांनी काल उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याचं समोर आलं असलं तरी ते तात्पुरतं असल्याचं म्हटलं जातंय. कारण सुप्रीम कोर्टाने शिवसेना फुटीवर दिलेल्या निकालावर अधिक वेळ घेता येणार नाही. तसेच सुप्रीम कोर्टाने निकालात आखून दिलेल्या गाईडलाईन्स विरुद्ध कोणताही राजकीय खोडसाळपणा शक्य नसल्याने भाजपने सावध भूमिका घेत अजित पवारांना पुढे मुख्यमंत्री पद देण्याच्या अटीवर सोबत घेतल्याचं म्हटलं जातंय.

सुप्रीम कोर्टाचा निकाल हा पूर्णपणे शिंदे गटाच्या विरोधात होता म्हणूनच त्यावर चालढकल करण्यात आल्याचं कायदे तज्ज्ञ सांगत आहेत. तसेच जर सुप्रीम कोर्टाचा निर्णय शिंदे गटाच्या बाजूने असला असता तर भाजपने एकदिवसाचा देखील वेळ न घेता सर्वांना निलंबित केले असते असं तज्ज्ञांचं मतं आहे. तसेच त्या १६ आमदारांमध्ये स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आणि १६ आमदार निलंबित झाले तर पुढे उरलेले आमदारही निलंबित होतील असं म्हटलं जातंय. तसेच हा निर्णय घेण्याची वेळ पुन्हा सुप्रीम कोर्टात गेल्यास सुप्रीम कोर्टाचा अवमान प्रकरणी या आमदारांवर काही वर्ष निवडणूक लढण्यावर देखील बंदी आल्यास आश्चर्य वाटू नये असं तज्ज्ञ सांगत आहेत. कारण असीम सरोदे यांनी तशी मागणी आधीच सुनावणीत केली होती.

अजित पवारांमुळे शिंदे गटातील अनेकांचं राजकीय आयुष्य टांगणीला

अजित पवारांमुळे शिंदे गटातील अनेकांचं राजकीय आयुष्य टांगणीला गेल्याच म्हटलं जातंय. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक लढवताना अजित पवार आणि भाजपमध्ये मोठी डील होणार असल्याचं म्हटलं गेलं. तसेच भाजपच्या गळ्याशी आलेली शिंदे गटाची जवाबदारी कमी करून त्यांना तिकीट वाटपात अधिक महत्व दिलं जाणार नाही असं भाजपच्या अंतर्गत गोटातून वृत्त आहे. शिंदे जरी माध्यमांच्या समोर हसऱ्या चेहऱ्याने उत्तर देतं असले तरी आतील वास्तव दुसरंच आहे. शिंदे देखील समर्थकांसासाठी विशेष काही करू शकत नसल्याने ते सध्या स्वतःच्या स्वार्थाकडे अधिक फोकस असून ते आपल्या आणि भाजपमधील संवादाच्या अनेक गोष्टी समर्थकांपासून लपवत असल्याचं म्हटलं जातंय.

News Title : NCP Leader Ajit Pawar in BJP Alliance check details on 03 July 2023.

हॅशटॅग्स

#NCP Leader Ajit Pawar(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x