महत्वाच्या बातम्या
-
Viral Video | समोर अनेक पुरुष-महिला कार्यकर्ता, 'आय लव्ह यू टू' म्हणत मुख्यमंत्री शिवराज सिंह यांचा फ्लाइंग किस, नेटिझन्सचा भाजपवर हल्लाबोल
Viral Video | संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अविश्वास प्रस्तावावरील दुसऱ्या दिवसाच्या चर्चेला बुधवारी राहुल गांधी यांच्या भाषणाने सुरुवात झाली. राहुल गांधी यांनी आक्रमक पवित्रा घेत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या केल्याचा आरोप त्यांनी सरकारवर केला आणि सत्ताधारी पक्षाला देशद्रोही ठरवले. मणिपूरमधील महिलांवरील घृणास्पद अत्याचारावरून राहुल गांधी मोदी सरकारवर तुटून पडले.
1 वर्षांपूर्वी -
Brand Rahul Gandhi | राहुल गांधी मणिपूरमधील महिला अत्याचारांवरून संसदेत कडाडले, तुम्ही मणिपूरमध्ये आपल्या 'भारत-मातेचीच' हत्या केली
Brand Rahul Gandhi | पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच लोकसभेत बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला. सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत भाग घेताना राहुल म्हणाले की, रावणाने कुंभकर्ण आणि मेघनाद या दोनच व्यक्तींचे ऐकले, मोदींनी सुद्धा अमित शहा आणि अदानी या दोनच व्यक्तींचे ऐकले. लंका हनुमानाने नव्हे तर रावणाच्या अहंकाराने जाळली होती. मणिपूरमध्ये भाजपने देशाची हत्या केली असून तुम्ही देशद्रोही आहात असा घणाघात त्यांनी केला.
1 वर्षांपूर्वी -
BJP Vs JJP in Haryana | NDA ला धक्का! हरयाणात हिंदू-मुस्लिम तेढ भाजपाला भोवणार, जेजेजी फारकत घेण्याच्या तयारीत, स्वबळाची तयारी सुरु
BJP Vs JJP in Haryana | हरियाणातील नूह जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या हिंसाचारामुळे राज्यातील सत्ताधारी आघाडीतील संघर्षात आणखी भर पडली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जननायक जनता पक्षाचे नेते दुष्यंत चौटाला यांनी नूंहमधील परिस्थितीचा आढावा घेण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचे सांगत आपल्याच सरकारसमोर अडचणी निर्माण केल्या आहेत. ३१ जुलै रोजी नूंह मध्ये एका धार्मिक मिरवणुकीदरम्यान जातीय हिंसाचार उसळला होता. त्यानंतर राज्यातील अनेक भागात धार्मिक उन्माद निर्माण झाल्याच्या बातम्या येत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Onion Price Hike | हिंदू-मुस्लिम मुद्द्यांमध्ये व्यस्त असलेल्या मतदारांसाठी आनंदाची बातमी, लवकरच टोमॅटोप्रमाणे कांद्याचे भावही रडवणार
Onion Price Hike | टोमॅटोपाठोपाठ आता कांदादेखील तुमच्या घराचं बजेट बिघडवू शकतो. देशातील अनेक मोठ्या बाजारपेठांमध्ये कांद्याचा पुरवठा होत नसल्याने कांद्याचे दर काही दिवसात सर्वसामान्यांनाही रडवू शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. टोमॅटोचे दर आधीच गगनाला भिडले आहेत. राजधानी दिल्लीत ते मुंबईत सध्या टोमॅटो २०० रुपये किलोदराने विकला जात आहे. त्यामुळे सरकारने सुमारे अडीच लाख टन साठवलेला कांदा बाहेर काढावा अशी मागणी होतेय.
1 वर्षांपूर्वी -
Brand Rahul Gandhi | संसदेचं पावसाळी अधिवेशन संपताच मल्लिकार्जुन खर्गे राहुल गांधींसोबत निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, मेगा प्लान तयार
Brand Rahul Gandhi | छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांमध्ये या वर्षाच्या अखेरीस निवडणुका होणार आहेत. या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांना अवघे काही महिने शिल्लक आहेत. या पाश्वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी संसदेचे चालू पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर लगेचच पुढील आठवड्यापासून मैदानात उतरण्याची योजना आखली आहे. मीडिया सूत्रांनी मंगळवारी ही माहिती दिली. या वर्षाच्या अखेरीस ज्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत, त्या राज्यांमध्ये अनेक सभा घेण्यात येणार आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Bharat Jodo Yatra 2 | भाजपाला धसका! राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा लवकरच, सुरुवात गुजरातमधून, यूपीतून 25 दिवस यात्रा
Bharat Jodo Yatra 2 | काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा गुजरातमधून सुरू होऊन मेघालयला जाणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी ही माहिती दिली. तेथे यात्रा सुरू झाल्यावर महाराष्ट्रातही पदयात्रा सुरू करण्याचे नियोजन केले आहे.
1 वर्षांपूर्वी -
KPA Exit NDA | भाजपाप्रणित NDA ला धक्का, कुकी पीपल्स अलायन्सन NDA मधून बाहेर तर मणिपूरमधून समर्थन काढलं
Kuki Peoples Alliance Exit NDA | कुकी आणि मैतेई समाजात तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या जातीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मणिपूरमधील भाजप सरकारला आणि NDA ला मोठा धक्का बसला आहे. राज्यात तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या हिंसाचारात दीडशेहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. शेकडो गावे रिकामी करण्यात आली. हजारो लोकांना मदत छावण्यांमध्ये विस्थापित जीवन जगावे लागत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Tomato Price Hike | राजा तुपाशी प्रजा उपाशी! जुलै महिण्यापासून हॉटेलमधील साधी शाकाहारी थाळी 28% महाग झाली
Tomato Price Hike | देशात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून महागाईने उच्चांकाचा इतिहास रचला आहे. मात्र दुसरीकडे भाजपने शिस्तबद्धपणे सामान्य लोकांना धार्मिक तेढ वाढवणाऱ्या बातम्यांमध्ये अडकवून ठेवलं आहे. पण त्याचे गंभीर परिणाम सामान्य माणसाला त्यांच्या दैनंदिन विषयांमधून भोगावे लागत आहेत. तो गंभीर विषय म्हणजे प्रचंड वाढलेली आणि वाढत जाणारी महागाई आहे.
1 वर्षांपूर्वी -
MP Election 2023 | मध्य प्रदेशात बाबा-महाराजांनाही राजकीय हवेची दिशा समजली? बागेश्वर शास्त्री महाराज प्रवचनासाठी काँग्रेसच्या मंचावर
MP Election 2023 | मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतशी बाबा-महाराजांना सध्या मोठी मागणी आहे. मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ यांनी आपला मतदारसंघ छिंदवाडा येथील बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्री यांचे तीन दिवसीय कथा पठण आयोजित केले आहे. धीरेंद्र शास्त्री यांनी नुकतेच आपल्या हिंदु राष्ट्राच्या ध्येयाविषयी आवाज उठवला आहे आणि त्यासाठी ते देशभर फिरत आहेत. यावर्षी मे महिन्यात पाटण्यात त्यांच्या कथेदरम्यान भाजपचे सर्व बडे नेते व्यासपीठावर उपस्थित होते.
1 वर्षांपूर्वी -
Brand Rahul Gandhi | राहुल गांधी पुन्हा खासदार, लोकसभेत 'मोदाणी' मुद्दा पुन्हा गाजण्याची शक्यता, INDIA चा 'डरो मत' आवाज पुन्हा संसदेत
Brand Rahul Gandhi | काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे लोकसभेचे सदस्यत्व आजपासून बहाल करण्यात आले आहे. लोकसभा सचिवालयाकडून आज यासंदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आली आहे. लोकसभेचे सरचिटणीस उत्पलकुमार सिंह यांनी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राहुल गांधी यांचे सदस्यत्व पुन्हा बहाल करण्यात आले आहे.
1 वर्षांपूर्वी -
भाजपसाठी सत्ता नसल्याने मोदी सरकारने प. बंगालचा 1 लाख 17 हजार कोटीचा निधी रोखला, TMC ची राज्यभर आंदोलनं, भाजप आमदाराचीही साथ
TMC Protest Against Modi Govt | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार यांच्यातील संघर्ष नवीन नाही. पश्चिम बंगाल राज्य सरकारला अनेक कल्याणकारी योजनांचा निधी न दिल्याने आता ममता बॅनर्जींच्या पक्षाने मोदी सरकारवर थेट रस्त्यावर उतरून हल्लाबोल केला आहे. पश्चिम बंगाल राज्यातील सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसने रविवारी संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये निदर्शने केली. यावेळी पश्चिम बंगाल राज्यातील भाजप नेत्यांच्या सल्ल्यानुसार केंद्राने हा निधी थांबवल्याचा आरोप पक्षाच्या नेत्यांनी केला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Viral Video | शिंदे पिता-पुत्रच काय, तुम्ही सुद्धा न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरवर पैसे मोजून पेड जाहिरात करू शकता, हे आहे बिलबोर्ड रेट कार्ड
Viral Video | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात सुरु केलेल्या विविध उपक्रमांची माहिती न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरच्या स्क्रीनवर झळकली. याचे व्हिडीओ आता समोर आले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह खासदार श्रीकांत शिंदे आणि राहुल कनाल यांचाही फोटो या स्क्रीनवर दिसला. राज्यातील विविध उपक्रमांची माहिती स्क्रीनवर दाखवली गेली.
1 वर्षांपूर्वी -
हरियाणा नूंह मध्ये जमिनीचा ताबा आणि बिल्डर्ससाठी हिंदू-मुस्लिम दंगली घडवल्या? 2.5 एकर जमीन बुलडोझरराजने ताब्यात घेतली
Haryana Nuh violence | हरियाणातील नूंह मधील हिंसाचारानंतर हळूहळू शांतता परत येत आहे. दरम्यान, सरकार कडक मूडमध्ये दिसत आहे. शुक्रवारी प्रशासनाने १५० झोपडपट्ट्या आणि पाच बेकायदा घरांवर बुलडोझर डागला होता. शनिवारी पुन्हा एकदा पाडण्याची कारवाई करण्यात आली आहे. एसएचकेएम शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाजवळ ही कारवाई करण्यात आली. येथील बेकायदा बांधकाम पाडण्यात आले आहे. प्रशासनाने अडीच एकर जागा रिकामी केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Viral Video | विषारी सापाला चाटताना दिसली गाय, मग काय झालं?..हा व्हिडिओ पाहून लोक हैराण
Viral Video | वन्यजीवांशी संबंधित व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण यादरम्यान एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात साप आणि गाय यांच्यातील प्रेम दिसून येतंय. गाय सापाला वासराप्रमाणे चाटत असते, पण साप त्याच्या स्वभावानुसार तिच्यावर हल्ला करत नाही किंवा चावत ही नाही. लोक या व्हिडिओला भरभरून लाईक्स करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Brand Rahul Gandhi | भाजपाला धक्का! राहुल गांधींच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, लवकरच खासदारकी बहाल होणार
Brand Rahul Gandhi | काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ‘मोदी आडनाव प्रकरणा’त मोठा दिलासा मिळाला आहे. मानहानी प्रकरणी दोषी आढळल्यास त्यांना सुनावण्यात आलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. आता ते संसदेत जाऊन सहभागी होऊ शकतील आणि त्यांची संसद पूर्ववत होईल. ही शिक्षा थांबवली नसती तर राहुल गांधी संसदेतून अपात्र ठरले असते आणि पुढची ८ वर्षे निवडणूक लढवू शकले नसते. अशा तऱ्हेने सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय म्हणजे राहुल गांधी, काँग्रेस आणि भारताच्या रूपाने तयार झालेल्या संपूर्ण विरोधी आघाडीसाठी दिलासादेणारी बातमी आहे.
1 वर्षांपूर्वी -
INDIA Vs NDA | विरोधकांच्या आघाडीला 'UPA'च म्हणा तर कधी 'घमंडिया' म्हणण्याचा सल्ला! मोदींनी 'इंडिया' आघाडीची धास्ती घेतल्याची चर्चा
INDIA Vs NDA 2024 | 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातत्याने बैठका घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी बिहारमध्ये युतीच्या घटक पक्षांची भेट घेतली. यावेळी त्यांनी नव्या विरोधी आघाडी ‘इंडिया’ वरही निशाणा साधत हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदीयांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीए पक्षांच्या खासदारांची वेगवेगळ्या क्लस्टरमध्ये विभागणी केली आहे. जुलै महिन्याच्या अखेरीपासून या सर्वांची बैठक सुरू आहे.
1 वर्षांपूर्वी -
जयपूर एक्स्प्रेस घटना! मोदी-योगींचं नाव घेत RPF जवान प्रवाशांना गोळ्या झाडू लागल्याने यापुढे RPF जवानांना AK-47 घेऊन रेल्वेत जाण्यास बंदी
Jaipur Express Firing | जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये एका जवानाने केलेल्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाल्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) मोठा निर्णय घेतला आहे. आता आरपीएफ जवानांना प्रवासादरम्यान एके-47 रायफल बाळगण्याची परवानगी मिळणार नाही. त्याऐवजी ते आता पिस्तूल बाळगणार आहेत. सध्या रेल्वेच्या दोन झोनने हा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने रेल्वे एस्कॉर्ट पार्टीला यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. विशेष म्हणजे यावेळी संबंधित जवानाने थेट मोदी-योगीचं नाव घेत हा धक्कादायक प्रकार केल्याचा व्हिडिओ एकाप्रवाशानेच व्हायरल केल्यानंतर केंद्र सरकार तसेच गोदी मीडियावर देखील प्रचंड टीका झाली होती. ३१ जुलै रोजी झालेल्या हृदयद्रावक घटनेनंतर रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. जयपूर-मुंबई सेंट्रल सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये […]
1 वर्षांपूर्वी -
INDIA Vs NDA | अजब दावा! 'इंडिया' या नावामुळे हिंसा होऊ शकते, विरोधकांच्या आघाडीविरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल
INDIA Vs NDA | इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लूसिव्ह अलायन्स (INDIA) या नावाच्या संक्षिप्त स्वरूपाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळात देशातील कायदा व सुव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो, असा अजब दावा याचिकाकर्त्याने याचिकेत केला आहे. निवडणूक आयोगाकडून (ईसीआय) उत्तर न मिळाल्याने याचिकाकर्त्याने न्यायालयात धाव घेतल्याचे समजते. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. सदर याचिकाकर्ता भाजप पुरस्कृत असावा याची देखील त्यानंतर चर्चा रंगलेली असताना दुसऱ्या बाजूला भाजपने किती राजकीय धास्ती घेतली आहे याची देखील चर्चा सुरु झाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Lok Sabha Election 2024 | सतत इव्हेंटमध्ये व्यस्त राहणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा NDA खासदारांना माइकपासून दूर राहण्याचा सल्ला
Lok Sabha Election 2024 | लोकसभा निवडणूक 2024 च्या तयारीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या खासदारांसोबत बैठकांची फेरी सुरू केली आहे. यावेळी त्यांनी खासदारांना विवादित वक्तव्यांपासून दूर राहण्याचा आणि विरोधकांच्या प्रतिक्रियेला टाळण्याचा सल्ला दिल्याचे समजते. मात्र, भारतीय जनता पक्षाकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. बुधवारी पंतप्रधानांनी पूर्व उत्तर प्रदेशातील खासदारांसोबत पहिली बैठक घेतली.
1 वर्षांपूर्वी -
सतर्क राहा! लोकसभा निवडणुकीपूर्वी पुलवामा-बालाकोट 2 आणि अयोध्या-काशी-मथुरेतील मंदिरावर हल्ला घडवून आणण्याची तयारी सुरु आहे
Lok Sabha Election 2024 | सर्वोच्च न्यायालयाचे वकील प्रशांत भूषण यांनी 2024 मध्ये पुलवामा आणि बालाकोटसारखे काही घडू शकते अशी भीती व्यक्त केली आहे. इतकंच नाही तर अयोध्येच्या राम मंदिरावर किंवा देशातील कोणत्याही प्रसिद्ध मंदिरावर दहशतवादी हल्ला घडवून आणला जाईल अशी त्यांनी धक्कादायक माहिती उपस्थितांना संबोधित करताना दिली. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या भीतीने पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये हल्ल्यासाठी काही सैनिकही पाठवले जाऊ शकतात. हाच प्रकार 2019 मध्ये एअर स्ट्राईकच्या रूपात झाला होता आणि तोच मुद्दा निवडणुकीच्या प्रचारात भाजपने वापरला होता याची देखील त्यांनी आठवण करून दिली.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Smart Investment | स्मार्ट गुंतवणुकीचा हा फॉर्म्युला तुम्हाला 2 कोटी रुपये परतावा देईल, समजून घ्या आणि श्रीमंत व्हा
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- RVNL Share Price | RVNL आणि Just Dial शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, मिळेल 190% परतावा - NSE: RVNL
- Life Insurance Policy | लाईफ इन्शुरन्सचे एकूण प्रकार किती; तसेच जनरल आणि लाइफ इन्शुरन्समधील नेमका फरक काय लक्षात ठेवा
- BEL Vs Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत मिळेल परतावा - NSE: TATAMOTORS
- EPF Withdrawal | पगारदारांनो EPF च्या पैशांतून होम लोन फेडत आहात का; तुम्ही जे करताय ते योग्य आहे की अयोग्य, इथे जाणून घ्या