महत्वाच्या बातम्या
-
राज्यात भाजपचं लोकसभा मिशन 48 | शिंदे गट भाजपात विलीन होणार किंवा राजकीय विश्वासघात होणार? | दानवेंच्या विधानाने खळबळ
एकनाथ शिंदे गटाने भाजपसोबत युती करून राज्यात सत्ता स्थापन केली आहे. इथून पुढच्या सर्व निवडणुका भाजपसोबत युती करूनच लढणार असल्याचं शिंदे गटाकडून सांगितलंही जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे राज्याती महत्त्वाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबद्दल महत्त्वाची माहिती दिली. आगामी लोकसभा निवडणूक शिवसेना-भाजप युतीमध्ये लढणार असल्याचं फडणवीस म्हणाले आहेत. त्याचबरोबर १६ लोकसभा मतदारसंघांवर भाजपने लक्ष्य केंद्रीत केल्याबद्दलही त्यांनी माहिती दिली.
2 वर्षांपूर्वी -
कर्जत तरुणावरील हल्ला प्रकरण | नितेश राणेंचा धामिर्क रंग देण्याचा कांगावा फसला, पीडित तरुण गुन्हेगारी पार्श्वभूमीचा
कर्जत तालुक्यातील तरुणावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात पोलिसांनी महत्त्वाची माहिती गिली आहे. यानुसार, नुपूर शर्माच्या स्टेटसमुळे आणि हिंदुत्वाचा प्रचार केल्यामुळे हा हल्ला झाला, याबाबतचे कोणतेही पुरावे आतापर्यंतच्या तपासात समोर आलेले नाहीत. पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, पीडित प्रतीक पवार हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. प्रतिक पवार याच्यावर एकूण 3 गुन्हे दाखल आहेत. तो रागीट स्वभावाचा आहे, विनाकारण लोकांसोबत वाद करतो आणि त्याला डॉन व्हायचं आहे.
2 वर्षांपूर्वी -
OnePlus Nord CE 2 Lite 5G | होय खरंच वनप्लसचा स्मार्टफोन फक्त 4999 रुपयांमध्ये मिळतोय, 10 ऑगस्टपर्यंत ऑफर
वनप्लसचा फोन त्याच्या अनोख्या फिचर्स आणि डिझाइनसाठी लोकप्रिय आहे, पण जर तुम्हाला वनप्लसचा फोन महाग असल्यामुळे खरेदी करता आला नाही तर अॅमेझॉन सेलमध्ये तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. आम्ही हे सांगत आहोत कारण वनप्लसचा सर्वात स्वस्त फोन आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत उपलब्ध आहे. आम्ही वनप्लस नॉर्ड सीई २ लाइट ५ जी बद्दल बोलत आहोत जे कंपनीने एप्रिलमध्ये वनप्लस एक्स नंतर सर्वात स्वस्त डिव्हाइस म्हणून भारतात लाँच केले होते. हे डिव्हाइस लाँच झाल्यानंतर चार महिन्यांच्या आत अॅमेझॉनवर सर्वात कमी किंमतीत उपलब्ध आहे.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | आपल्या मालकाचा एक पाय फ्रॅक्चर झाल्याने हा कुत्राही 3 पायांवर धावतो, या व्हायरल व्हिडिओवर नेटिझन्स फिदा
कुत्रा आणि माणूस यांच्यातली मैत्री तुम्ही अनेककदा ऐकली असेल. असाच एक व्हिडिओ आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. व्हिडिओत तुम्हाला दिसेल की, त्याचे चार पाय सुधृढ असूनही कुत्रा तीन पायांवर धावत आहे आणि त्याचं कारण त्याचा मालक आहे.
2 वर्षांपूर्वी -
Shinde Vs BJP | भाजप नेत्याने शिंदे गटाच्या प्रवक्त्याची लायकी काढली, थेट ड्रायव्हर पदासाठी अर्ज करण्याची ऑफर
शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणेंवर थेट आरोप केले. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरेंची नाहक बदनामी करण्यात आली. नारायण राणेंच्या कुटुंबाकडून आदित्य ठाकरेंच्या बदनामीचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाला. नारायण राणेंच्या पत्रकार परिषदेत याचा वाटा फार मोठा होता. ठाकरे कुटुंबावर प्रेम करणारे लोक यामुळे दुखावले गेले. उद्धव साहेब आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट झाली. त्यानंतर कुटुंब प्रमुख कसा असावा हे नरेंद्र मोदींनी दाखवून दिलं, असं वक्तव्य दीपक केसरकरांनी केलं.
2 वर्षांपूर्वी -
IRCTC Tour Package | सुट्ट्यांचा महिना, शिर्डी'सह शनी शिंगणापूर दर्शन करा, एअर टूर पॅकेज ऑफर जाणून घ्या
शिर्डी साईबाबांसोबत शनी शिंगणापूर दर्शन घेण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी आयआरसीटीसीच्या खास टूर पॅकेजचा लाभ घेता येईल. खरं तर आयआरसीटीसीने यासाठी स्वस्त एअर टूर पॅकेज लाँच केलं आहे. या धार्मिक टूर पॅकेजचे भाडे प्रति व्यक्ती १८,१९० रुपयांपासून सुरू होते.
2 वर्षांपूर्वी -
संपूर्ण महाराष्ट्राचा कारभार अजुन काही दिवस केवळ शिंदे-फडणवीसांचं 'अति सूक्ष्म कॅबिनेट मंत्रिमंडळच' सांभाळणार?, कारण काय?
महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाची सुनावणी पुन्हा लांबण्याची दाट शक्यता आहे. खरंतर सुप्रीम कोर्टात राज्याच्या सत्तासंघर्षाशी संबंधित याचिकांवर 4 ऑगस्टला सुनावणी पार पडली. विशेष म्हणजे या आठवड्यात सलग दोन दिवस सुनावणी झाली. त्यानंतर ही सुनावणी पुढच्या आठवड्यावर ढकलण्यात आली होती.
2 वर्षांपूर्वी -
ग्रामपंचायत निवडणुकीत ती मतं एकनाथ शिंदे या चेहऱ्याला नव्हे | तर मतदारांच्या पारंपारीक धनुष्यबाण चिन्हाला व स्थानिक उमेदवाराला
२१ जून २०२२ ला शिवसेनेत सर्वात मोठं बंड झालं. एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी शिवसेनेच्या नेतृत्वाविरोधात अर्थात उद्धव ठाकरेंच्या विरोधात हे बंड पुकारलं आहे. शिवसेनेला बंडाळी होणं हे काही नवं नाही. मात्र एकनाथ शिंदे यांचं बंड सर्वार्थाने वेगळं ठरलं कारण शिवसेना सत्तेत असताना हे बंड झालं. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं. ३० जूनला एकनाथ शिंदे हे भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले. त्यानंतर राज्यातील मोजक्या ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Vastu Tips | तुमच्या वास्तूमध्ये या 10 गोष्टी ट्राय करा, घराला लक्ष्मी मातेचे आशीर्वाद मिळतील
घर बांधताना किंवा खरेदी करताना वास्तूचे नियम पाळावेत. वस्तुत: वास्तुचे नियम घरात सुख-समृद्धी आणतात. या टिप्स दिसल्या नाहीत तर अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं. या वास्तु टिप्स बरकत आणि घरातील संपत्तीसाठीही महत्त्वाच्या मानल्या जातात. या टिप्ससाठी तुम्हाला घरातलं काही बांधकाम तोडण्याची गरज नाही, फक्त घरात काही छोटे छोटे उपाय करून तुम्ही घरात सुख-समृद्धी मिळवू शकता.
2 वर्षांपूर्वी -
Government Bank Recruitment 2022 | पंजाब नॅशनल बँकेत विविध पदांसाठी भरती, पगार 69 हजार रुपये
पंजाब नॅशनल बँकेने अधिकृत भरती अधिसूचना प्रकाशित केली आहे आणि १०३ अधिकारी आणि व्यवस्थापक पदासाठी अर्ज मागवले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार ३० ऑगस्ट २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी पीएनबी भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि पीएनबी भरतीसाठी अर्ज कसा करावा यासारखे अधिक तपशील खालील लेखात देण्यात आला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Chanakya Niti | मुलं संस्कारी आणि यशस्वी होण्यासाठी पालकांनी अशा चुका करू नयेत, काय सांगते चाणक्य नीती
आचार्य चाणक्यांनी सांगितले आहे की, मुलांना आई-वडिलांकडूनच चांगले संस्कार मिळतात. चाणक्यांनी लोकांच्या प्रत्येक पैलूशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यांचे पालन करून तुम्ही तुमचे आयुष्य अधिक चांगले बनवू शकता. चाणक्यांनी सांगितले आहे की, मुलांच्या यशात पालकांची भूमिका महत्त्वाची असते. मुले आपल्या पालकांकडून खूप काही शिकतात. प्रत्येक पालक आपल्या मुलांना चांगले संस्कार देत असतो. चाणक्य म्हणतात की, आई-वडिलांच्या वागण्याचा मुलांवर खूप लवकर परिणाम होतो, अशा प्रकारे त्यांनी नेहमी सौम्य आणि आदर्श वागणूक मुलांसमोर मांडली पाहिजे.
2 वर्षांपूर्वी -
सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचा धक्का | आठवा वेतन आयोग येणार नाही, मोदी सरकारचे स्पष्टीकरण
केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांचे वेतन, भत्ते आणि निवृत्ती वेतन सुधारण्यासाठी सरकार आठवा वेतन आयोग लागू करण्यात येणार नसल्याचे स्पष्टीकरण मोदी सरकारकडून करण्यात आले आहे. आठव्या वेतन आयोगाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. पण तो लागू होणार की नाही याबाबत साशंकता होती. परंतु या संदर्भात मोदी सरकारने महत्त्वाची माहिती दिली आहे. या माहितीनुसार, आठवा वेतन आयोग येणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
2 वर्षांपूर्वी -
देशातील ८० टक्के हिंदू प्रचंड महागाई आणि बेरोजगारीने त्रस्त | पण भाजप नेत्यांच्या पत्रकार परिषदेत धार्मिक मुद्यांवर जोर
महागाई, बेरोजगारी ते ढासळलेली अर्थव्यवस्था यावर मोदी सरकार पूर्णपणे नापास झालं आहे हे सर्व देशाला आता कळून चुकलं आहे. परिणामी ‘हर घर महंगाई’ भाजपचा २०२४ मधील लोकसभा निवडणुकीतील मार्ग खडतर असल्याने भाजपमध्ये भीतीचं वातावरण असल्याचं वरिष्ठ पत्रकार सांगत आहेत. त्यामुळे देशभरातील विरोधकांवर मोठ्या प्रमाणात ईडी – सीबीआयचा बडगा उगारण्यात आला आहे. तसेच २०२४ मध्ये सामान्य लोकांना महागाई, बेरोजगारी ते ढासळलेली अर्थव्यवस्था या गंभीर मुद्यांवरून परावृत्त करण्यासाठी काही नेत्यांवर धामिर्क मुद्यांना हवा देण्याची जवाबदारी देण्यात आहे असं खात्रीलायक वृत्त आहे. टीव्ही वृत्त वाहिन्यांवर धार्मिक मुद्दे कसे प्रकाशझोतात राहतील याची पूर्ण खबरदारी घेतली जाणार आहे. राज्यातही त्याची अंमलबजावणी झाली आहे असं म्हणावं लागेल. कारण केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार आल्यानंतरही धामिर्क विषयात हिंदूंवर कसा अन्याय होतोय याचा पाढा भाजप नेते वाचू लागले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | महिलेवर सी-लायनचा अचानक हल्ला, गप्पा मारत असताना पाण्यात खेचलं, व्हायरल व्हिडिओ पहा
सोशल मीडियावर सर्व प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होतात. त्यातले काही अगदी गमतीदार तर काही इतके घातक असतात की, कुणालाही ते धक्कादायक वाटू शकतात. आता असाच आणखी एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये समुद्राच्या पाण्यात उभ्या असलेल्या जहाजासारखे काही दिसत आहे. त्याचवेळी जहाजाच्या बाजूला बसून एक महिला स्वत:चे काही फोटो काढत असते. त्यावेळी अचानक घडलेल्या एका प्रकारची समाज माध्यमांवर जोरदार चर्चा सुरु आहे आणि त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल होतं आहे.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | महिलेला धक्काबुक्की आणि शिवीगाळ, दादागिरी करणाऱ्या भाजप नेत्याच्या व्हायरल व्हिडिओवर देशभरातून संताप
भारतीय जनता पक्षाच्या नेत्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये हा भाजप नेता एका महिलेला शिवीगाळ करताना दिसत आहे. इतकंच नाही तर भाजप नेत्यानं यावेळी महिलेला धक्काबुक्की करण्याचाही प्रयत्न केला, हे प्रकरण नोएडा सेक्टर 93 मधील ओमेक्स सोसायटीशी संबंधित आहे. महिला आणि भाजप नेत्यामध्ये झाड लावण्यावरुन वाद झाल्याचं बोललं जात आहे.
2 वर्षांपूर्वी -
देशात महागाई आणि बेरोजगारीच्या विरोधात वातावरण तापताच अमित शहा यांनी राम मंदिराचा मुद्दा काढला | नेटिझन्स संतापले
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या दोघांनाही दिल्ली पोलिसांनी काल ताब्यात घेतलं. महागाई आणि बेरोजगारीच्या विरोधाता काँग्रेसने काल जोरदार आंदोलन केलं. काल मोठ्याप्रमाणावर देशव्यापी आंदोलन करण्यास सुरूवात झाली होती. देशभरात महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर आंदोलन जोर पकडत आहेत. त्यामुळे मोदी सरकारचं टेन्शन वाढल्याची चर्चा आहे. देशभरात वाढलेल्या महागाईमुळे जनतेमध्ये संताप असल्याचं स्पष्ट दिसत आहे. मात्र महागाई आणि बेरोजगारीचा आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत फटका बसू नये म्हणून भाजपने पुन्हा धार्मिक मुद्दे पुढे रेटण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर नेटिझन्सनी भाजपाला झापताना आता हे असले राजकीय धंदे बस करा आणि आम्हाला सगळं कळून चुकलं आहे असं अनेकांनी अमित शहांच्या प्रतिक्रियेवर व्यक्त होताना म्हटले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | हा श्वान व्हॉलीबॉल खेळण्यात किती तरबेज आहे पहा, खतरनाक टाईमिंगचा व्हायरल व्हिडिओ पहा
खेळ आपल्या सर्वांना प्रिय आहेत. खेळात मन असे रंगून जाते की आपण सर्वजण आपले दु:ख आणि टेन्शन विसरतो. खेळणारा जोडीदार चांगला मित्र असेल तर खेळाची मजा अनेक पटींनी वाढते. तसे पाहिले तर भारतातील बहुतेक लोकांना क्रिकेट आवडते, त्यामुळे येथे क्रिकेटला धर्माचे नाव देण्यात आले आहे. पण असे अनेक खेळ आहेत ज्यावर लोक प्रचंड प्रेम करतात. विशेषत: अशा वेळी जेव्हा राष्ट्रकुल स्पर्धा सुरू आहेत आणि भारताचे खेळाडू पदक जिंकून देशाचे नाव उज्ज्वल करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Long weekends | ऑगस्टच्या लाँग विकेंडसाठी बुकिंगला वेग, ट्रॅव्हल कंपनीच्या प्रवाशांना दमदार ऑफर्स
रोजच्या दिनचर्येतून काही दिवसांची विश्रांती घ्यायची असेल तर हा महिना अधिक चांगला आहे. सणांमुळे या महिन्यात तीन लाँग विकेण्ड असतात. मोहरम, रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिनामुळे या महिन्यातील तीन लाँग विकेंड तुम्हाला भेटीची संधी देत आहेत. ते कॅश करण्यासाठी बाजारात अनेक ऑफर्सही उपलब्ध आहेत, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या सुट्ट्यांची मजा वाढवू शकता. यंदा ऑगस्टनंतर दसरा, दिवाळी, गुरुनानक यांचा वाढदिवस आणि नववर्षानिमित्त लाँग विकेंडचा आनंदही लुटता येणार आहे. ऑनलाइन ट्रॅव्हल एजन्सीजने बर् याच उत्कृष्ट ऑफर आणल्या आहेत ज्या खाली स्पष्ट केल्या जात आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | ट्रॅफिक सिग्नलवरच प्रेमी युगल एकमेकांना आलिंगन देऊन उभे राहिले, या अजब प्रकारात काय घडलं व्हिडिओत पहा
इंटरनेटच्या जगात दररोज शेकडो, हजारो व्हिडिओ अपलोड केले जातात. त्यातल्या काही व्हिडिओ हृदय पिळवटून टाकणारे असतात. पण असे काही व्हिडिओ आहेत जे प्रचंड हसवून देखील जातात. आता एका बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडचा एक व्हिडिओ समोर आला आहे,
2 वर्षांपूर्वी -
हर घर महंगाई | ज्या महागाई - बेरोजगारीच्या मुद्द्यामुळे मोदी सरकार सत्तेत, तेच मुद्दे 2024 भाजपाला भोवणार?
काँग्रेसने महागाई विरोधात देशभरात आंदोलन सुरूच ठेवले आहे. दिल्ली पोलिसांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ताब्यात घेतलं आहे. काँग्रेसचे अनेक खासदार विजय चौकात ठाण मांडून बसले आहेत. खरंतर राहुल गांधी हे काँग्रेसच्या खासदारांना घेऊन संसद भवन ते राष्ट्रपती भवन असा मोर्चा काढत होते. पण पोलिसांनी त्यांना विजय चौकात अडवलं आणि राहुल गांधींसह अनेक नेत्यांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी काँग्रेसला मोर्चा काढू दिला नाही. या भागात कलम १४४ लागू आहे. तर दुसरीकडे काँग्रेस कार्यालयातून मोर्चा काढणाऱ्या प्रियांका गांधी यांनाही ताब्यात घेण्यात आलं.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सरकारी स्कीम, महिना कमवाल 20,000 रुपये, जबरदस्त फायद्याची योजना
- Shukra Rashi Parivartan | डिसेंबरच्या 'या' तारखेपासून शुक्र गोचरमुळे काही राशींना भोगावे लागू शकतात गंभीर परिणाम