24 April 2025 12:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसमध्ये 3000 रुपये जमा केल्यास 5 वर्षांत किती मिळतील? अशी ठरवा बचत रक्कम SBI Car Loan | कार खरेदी करण्यासाठी हा आहे सर्वोत्तम बँक पर्याय, 7 लाखाच्या कार लोनवर इतका EMI द्यावा लागेल HDFC Mutual Fund | पगारदार महिना केवळ 1,000 रुपये SIP वर मिळवत आहेत 2 कोटी रुपये परतावा, बिनधास्त पैसा कमवा Horoscope Today | 24 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 24 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rattan Power Share Price | पेनी स्टॉकमध्ये जबरदस्त तेजीचे संकेत; मार्केट तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: RTNPOWER SJVN Share Price | मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या पीएसयू शेअरबाबत फायद्याचे संकेत, रेटिंग सह टार्गेट अपडेट - NSE: SJVN
x

Phone Tapping Case | रश्मी शुक्ला फोन टॅपिंगप्रकरणी फडणवीसांना चौकशीला हजर राहण्याचे पोलिसांचे आदेश

Phone Tapping Case

मुंबई, 12 मार्च | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवली असल्याची माहिती दिली. पोलीस बदल्यांच्या महाघोटाळ्यातील संवेदनशील माहिती बाहेर कशी आली, याबद्दल चौकशी करण्यासाठी बोलावलं (Phone Tapping Case) आहे. मी राज्य सरकारचं षडयंत्र उघडं पाडल्यानं हे केलं जात आहे, असा आरोप फडणवीसांनी केला आहे.

Leader of Opposition Devendra Fadnavis told a press conference here today that Mumbai Police had sent a notice over Phone Tapping Case :

मुंबई पोलिसांनी मला सीआरपीसी १६० नोटीस पाठवली आहे. याच बदल्यांच्या घोटाळा प्रकरणात त्यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांसंदर्भात मला त्यांनी बीकेसीच्या सायबर पोलीस ठाण्यात बोलवलं आहे. पहिल्यांदा स्पष्ट करतो की, जरीही मला अधिकार असला आणि माहिती स्त्रोत विचारला जाऊ शकत नाही. ही सर्व माहिती मी थेट केंद्रीय गृह सचिवांना दिली आहे. त्यातील कुठलीही माहिती बाहेर येऊ दिली नाही. जी काही माहिती बाहेर आली, ती राज्य सरकारच्या मंत्र्यांनी माध्यमांना दिली आणि त्याचे पुरावे माझ्याकडे आहे”,अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला दिली. अधिकृतरित्या सगळी माहिती राज्य सरकारला सीबीआयकडे द्यावी लागली. विशेषतः परवा षडयंत्राचा भांडाफोड मी केला आहे, त्यामुळे राज्य सरकार आणि पोलिसातील अधिकाऱ्यांना उत्तर सुचत नसल्याने ही नोटीस दिली गेलीये. मी उद्या ११ वाजता पोलीस ठाण्यात हजर राहिन”, असं विरोधी पक्षनेते फडणवीस म्हणाले.

फोन टॅपिंग कोणाचे करता येते?
यासंदर्भात केंद्र सरकारने काही नियम दिले आहेत. त्यात कोणत्या प्रकारात फोन टॅप करता येतात याविषयी सांगण्यात आले आहे. यात राष्ट्र घातक कृत्य, परकीय देशातील अतिरेकी संघटनेशी संबंध या प्रकारांशिवाय इतर परिस्थिती फोन टॅपिंग करता येत नाही. याला अपवाद येथील शांतता भंग करणाऱ्या व्यक्तीचा फोन टॅप करु शकतो. त्यामुळे रश्मी शुक्ला यांनी जी कारणे दिली होती ती संयुक्तिक नव्हती. त्यांनी ज्या फोन टॅपिंगच्या परवानग्या घेतल्या त्या चुकीच्या नावाने घेतल्या होत्या. परवानगी एकाच्या नावाची आणि फोन टॅपिंग दुसऱ्याची असा प्रकार करण्यात आला. यात अनेक मंत्र्यांचेही फोन टॅप करण्यात आले. हा राईट टू प्रायव्हसीचा भंग आहे. हे अनेकवेळा करण्यात आले, असे आरोप यापूर्वी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले होते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Phone Tapping Case Mumbai Police sent notice to Devendra Fadnavis.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या