26 April 2025 2:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
x

महागाई, बेरोजगारीने जनतेच्या मरण यातना, विरोधकांनी घेरताच मोदींचा उलटा प्रचार, म्हणाले 'बघा बघा विरोधक मला मारण्याची सुपारी देतं आहेत'

PM Narendra Modi

PM Narendra Modi | एकाबाजूला देशात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून महागाईने प्रचंड रौद्र रूप धारण केले आहे. तर दुसऱ्या बाजूला बेरोजगारीने तरुण वर्ग रडकुंडीला आला आहे. मागील १० वर्षात सत्तेत राहूनही मोदी सरकारने सामान्य लोकांचे प्रश्न कमी केले नाहीत, पण उलट अधिक अवघड करून ठेवल्याचं पाहायला मिळत आहे. याच सामान्य लोकांच्या महागाई, बेरोजगारी आणि अदानी ग्रुपच्या भ्रष्टाचारावर राहुल गांधींनी प्रश्न विचारताच त्यांना थेट संसदेतून बाहेर करण्यात आलं आहे. तर विरोधकांनी आता महागाई, बेरोजगारी अशा मुद्यांवर मोदी सरकारला घरातच आता प्रचार सभांमध्ये पंतप्रधान मोदींनी सामन्यांच्या प्रश्नांवर दुर्लक्ष करत, स्वतःच्या संबंधित निरर्थक प्रश्न सभांमध्ये उपस्थित करून सर्व लक्ष स्वतःवर केंद्रित करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु केल्याचं पाहायला मिळतंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह विरोधी पक्षांवर निशाणा साधत म्हटले आहे की, काही लोकांनी मला मारण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना सुपारी दिली आहे, परंतु गरीब, मध्यमवर्गीय, आदिवासी, दलित, इतर मागासवर्ग (ओबीसी) सह भारतातील प्रत्येक भारतीय आजही मोदींची संरक्षक ढाल आहे. 2014 मध्ये या लोकांनी मोदींची प्रतिमा मलिन करण्याची शपथ घेतली होती आणि आता या लोकांनी शपथ घेतली आहे ‘मोदी तेरी कबर खुदेगी’. राणी कमलापती रेल्वे स्थानक ते हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानक (नवी दिल्ली) दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर मोदी बोलत होते. ते मध्य प्रदेश दौऱ्यावर आले होते.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘आपल्या देशात असे काही लोक आहेत जे 2014 पासून ठाम आहेत आणि जाहीरपणे बोलले आहेत. त्यांनी आपला निर्धार जाहीर केला आहे. आम्ही मोदींची प्रतिमा मलीन करू, असा निर्धार त्यांनी जाहीर केला आहे. त्यासाठी या लोकांनी विविध प्रकारच्या लोकांना सुपारी दिली असून ते स्वत: त्या आघाडीचे नेतृत्वही करत आहेत. या लोकांना पाठिंबा देणारे काही लोक देशातील आहेत तर काही देशाबाहेर बसून आपलं काम करत आहेत. हे लोक सातत्याने कोणत्या ना कोणत्या मार्गाने मोदींची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण गरीब, मध्यमवर्गीय, आदिवासी, दलित, मागासवर्गांसह भारतातील प्रत्येक भारतीय आज मोदींची संरक्षक ढाल आहेत आणि म्हणूनच या लोकांना धक्का बसला आहे. हे लोक नवनवीन डावपेच अवलंबत आहेत असं मोदींनी म्हटलं. पण या संपूर्ण भाषणात त्यांना स्वतःवर लक्ष केंद्रित करताना ज्या लोकांनी निवडून दिलं त्यांच्या महागाई आणि बेरोजगारी या मुद्द्यावर चकार शब्द काढले नाहीत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: PM Narendra Modi rally speech check details on 02 April 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#PM Narendra Modi(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

close ad x
Marathi Matrimony