17 April 2025 4:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | मल्टिबॅगर PSU स्टॉक मालामाल करणार, जबरदस्त तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NBCC Vedanta Share Price | 27 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, BUY रेटिंग, यापूर्वी 11,485% परतावा दिला - NSE: VEDL Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉकबाबत तज्ज्ञांचे महत्वाचे संकेत, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा शेअर्समध्ये हलकी तेजी, लॉन्ग टर्ममध्ये 400% रिटर्न दिला, अपडेट जाणून घ्या - NSE: GTLINFRA Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, BUY, SELL की Hold करावा? - NSE: SUZLON Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER
x

भारताची लढाई 2024 मध्येच लढली जाईल | राज्याच्या निवडणुकांत नाही | प्रशांत किशोर यांचा मोदींना थेट इशारा

Poll strategist Prashant Kishor

मुंबई, 11 मार्च | निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडलेल्या “खोट्या कथन” विरुद्ध विरोधकांना सावध केले आहे. प्रशांत किशोर म्हणाले की “देशात राजकीय लढाई 2024 मध्येच लढली जाईल आणि निर्णय देखील तेव्हाच होईल”, राज्याच्या निवडणुकांमध्ये नाही. त्यामुळे मोदींच्या या प्रचारतंत्रापासून सावध राहा. ते केवळ विरोधकांवर निर्णायक मानसिक परिणाम करण्यासाठी हे तंत्र अवलंबत आहेत.

राज्याच्या निकालातून उन्माद निर्माण करण्याचा हा चतुर प्रयत्न :
2024 मध्ये भारतासाठी लढाई लढली जाईल आणि कोणत्याही राज्याच्या निवडणुकीत नाही हे “साहेबांना” माहीत आहे. त्यामुळे विरोधकांवर निर्णायक मानसिक दबाव निर्माण करण्यासाठी राज्याच्या निकालातून उन्माद निर्माण करण्याचा हा चतुर प्रयत्न करत आहेत. त्याला बळी पडू नका किंवा या खोट्या कथेचा भाग होऊ नका,” असं प्रशांत किशोर यांनी आज सकाळी ट्विट केले.

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या चार राज्यांमध्ये भाजपच्या विजयानंतर गुरुवारी भाजप कार्यकर्ते आणि समर्थकांना संबोधित करताना – पंतप्रधान मोदींनी 2024 मध्ये होणाऱ्या पुढील लोकसभा निवडणुकीचा उल्लेख केला आणि ते म्हणाले की त्यांना आशा आहे की राजकीय पंडित त्यांच्या पक्षाचा विजय लक्षात घेतील. विशेष म्हणजे मोदींनी 2019 मधील विजयाचा संबंध 2017 मधील उत्तर प्रदेश निवडणुकांशी असाच जोडला होता. तेच तंत्र ते पुन्हा अवलंबत आहेत.

2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या चार राज्यांमधील विजयाने त्यांची स्थिती मजबूत केली आहे अशा प्रचार करणं हे मोदींच तंत्र आहे. मात्र वास्तव हे आहे की उत्तर प्रदेशमधील जागा टिकवून ठेवण्यासाठी देखील भाजपाला संघर्ष करावा लागला असून त्यांच्या जागा मोठ्या प्रमाणात घटल्या आहेत.

काँग्रेस, आता फक्त राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सत्तेवर आहे. काँग्रेसने पंजाब गमावला आणि गांधी भावंड म्हणजे राहुल आणि प्रियंका यांच्या उच्च-डेसिबल प्रचाराणे सुद्धा यूपीमध्ये फक्त दोन जागा जिंकता आल्या आहेत. आता काँग्रेसप्रमाणेच ‘आप’चीही दोन राज्यांत सत्ता असेल.

प्रशांत किशोर 2014 मध्ये चर्चेत आले, जेव्हा त्यांनी भाजपच्या नेत्रदीपक राष्ट्रीय निवडणूक मोहिमेला मदत केली. वर्षानुवर्षे, त्यांनी अनेक प्रादेशिक क्षत्रपांसोबत काम केले आहे, त्यांना सत्तेवर येण्यास मदत करण्यासाठी त्यांच्या मोहिमा आखल्या आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Poll strategist Prashant Kishor cautioned the opposition against the false narrative being set by PM Narendra Modi.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Prashant Kishore(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या